Posts

Showing posts from May, 2021

नेमकं चाललंय तरी काय?

  नुसताच घोळ! दीपक देशपांडे. पटतंय का बघा.......! पटलंच तरीही तुमचाच अधिकार. आधी प्लास्मा साठी पेशंटच्या नातेवाईकांना भटकवलं, डोनर्स शोधता शोधता अक्षरशः नाकी नऊ आले, हाता पाया पडून डोनर जमा केले, प्लास्मा दान करवून घेतले, काही पेशंट बरे देखील झाले आणि घरी सुखरूप सुध्दा पोहोचले. नंतर ICMR ने प्लास्मा थेरपी बंद केली. रेमडेसिव्हीर आणा, रेमडेसिव्हीर आणा असे प्रिस्क्रिप्शन काढून पुन्हा एकदा पेशंटच्या नातेवाईकांना वेड लावून सोडलं हॉस्पिटल वाल्यांनी.गल्ली पासून दिल्ली पर्यंत आकाश पाताळ एकत्र केलं, एक एक रेमडेसिव्हीर जमा करायला, कधी नांदेड तर कधी बेंगलोर तर कधी गुजरात, कुठून कुठून जमा केले रेमडेसिव्हीर... अमृताचा थेंब आपल्याला मिळालाय असं वाटायचं जेंव्हा रेमडेसिव्हीरचं एक इंजेक्शन हातात पडायचं. ६ हजार पासून ते ८० हजार पर्यंत पैसे मोजताना लोकांना बघितलं, जीवाचा आटा पिटा करून कधी पुण्यातून YCM ला तर कधी वाक्कड ला तर कधी सकाळी ६ वाजता ससून, पूना हॉस्पिटल, केमिस्ट असोसिएशन शुक्रवार पेठ च्या ऑफिस ला सैरभैर होऊन पळताना लोकांना बघितलं. पेशंटची बायको, आई, वडील, मुलगा, नातू असे अनेक लोक फोन करायचे, काह

कोरोनाला..... विनंती!

आज जागतिक पातळीवर कोरोनाचा शिरकाव झाला असून तो विश्वात हाहा:कार माजवत आहे अशा स्थितीत आलेला हा लेख..... आमच्या वाचकांसाठी... दीपक देशपांडे. हे परमेश्वरा.... साष्टांग दंडवत 🙏 हे विधात्या, तू इतका कठोर का झालास? कोरोनाच्या निमित्ताने तू आम्हाला धड़ा द्यायचं ठरवलसं, ते चांगले झाले. आम्हाला चांगला धडा मिळाला आहे. पण आता मात्र तू क़हर करतो आहेस. दयेचा करूणाघन असणारा तू पूर्ण दयामाया विसरलास की काय असे वाटू लागले आहे?  हे मायबापा.... आम्ही सर्व तुमची लेकरे आहोत. तुझ्याशिवाय या सृष्टीतील एक पानही हलणार नाही, याची कल्पना आहे. मात्र, आता तू आम्हाला हतबल केले आहेस. आम्ही वादळाला घाबरत नाही, पण तू होत्याचे नव्हते करू लागला आहेस. त्यामुळे थोड वाईट वाटते. आज अनेकांचा संसार तू मोडलेस!  आलेला व्यक्ती जाणार आहे, हे निश्चित आहे. आम्ही कोणीच अमृताचा प्याला घेऊन आलेले नाहीत. अनंत व्याधींनी ग्रस्त असे कित्येक जण मरणासन्न अवस्थेत मृत्यूची वाट चातकासारखी पाहत आहेत. ते तसेच आहेत, मात्र ज्यांना त्यांची निहीत कर्मे पूर्ण झालेली नाहीत, त्यांना तू पटापट उचलत आहेस. आज त्या कुटुंबांकडे बघणे होत नाही. त्यांनी काय

वेचलेले चांदणे

 * वेचलेले चांदणे* * चिंतनीय......आणि म्हणूनच......* दीपक देशपांडे *अमेरिकेत  देव नाही ,,,,ना मठ नाही ,,पण पाऊस मात्र वेळेवर आहे ,,व भरपूर आहे,,,.गेल्या २०० वर्षात  दुष्काळ  नाही*, *कुठले होमहवन नाही,,, ना कसली वारी नाही.,,,,कसले अभिषेक नाही ,,,ना ,,अनुष्ठानं नाही,,,,. हरिनाम सप्ताह नाही,,, ना,, पारायणे नाहीत*,,,, *अमेरिकेत लोकसंख्या नियंत्रणात आहे.,, अन्नधान्य विपूल आहे.,,,,सुखसोयी विपूल आहेत,,,, कशाचीच कमतरता नाही.* *माणशी २८७६ वृक्ष आहेत.,,,,, भारतात फक्त माणसी २८ झाडे आहेत, त्याचीही निर्दयपणे कटाई करतांना आमचे हात कचरत नाहीत* *आपल्याकडे वृक्षवल्ली आम्हां सोयरे म्हणतो... पण एकही भारतीय झाड लावत नाही..... जपत नाही.... अमेरिकेत घरासमोर हिरवळ नाही असं घर नाही*.... *भारतात दारात झाड नाही.... तर हिरवळ कुठली. ....स्वातंत्र्य  मिळून ७४ वर्ष होत आली ....साधं पिण्याच पाणी देवू शकत नाही*.....    *अमेरिकेचे क्षेत्रफळ  भारता पेक्षा तिप्पट  आहे ......आणि लोकसंख्या  आहे ३१ कोटी....... भारताची आहे १३५ कोटी ...... ३५ कोटीची १३५ कोटी झाली .....फक्त ८० वर्षात. ...एवढीच जबरदस्त  प्रगती आहे...... इथै ह

दुसरा डोस घेण्यात उशीर झाल्यास घाबरून जाऊ नका! संशोधक म्ह.....

 दीपक देशपांडे      दिनांक :२१ मे २०२१    कोरोना प्रतीबंधक लसिचा दूसरा डोस घेण्यास उशीर झाला म्हणून घाबरण्याचे कारण नाही असे संशोधकांचे म्हणणे आहे.यामुळे शासन स्तरावर आनंद व्यक्त केला जाण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी नागरिकांनी या लसिचा पहिला डोस लवकर घेणे गरजेचे आहे कारण त्याशिवाय दूसरा डोस देऊन कोरोनाविरुद्धचा लढा मजबूत करण्यासाठी  समयसिमा निश्चित करता येणे शक्य नाही व  त्याशिवाय केंद्र व राज्य संघर्ष थोपवून राजकीय मतभेदाचे राजकारण बाजूला सारण्याचा प्रयत्न होणार नाही. नवी दिल्ली, देशात कोरोनाच्या लसींचा मोठा तुटवडा जाणवत आहे .देशातील मोठ्या प्रमाणावरील लोकसंख्येला अद्याप कोरोनावरील लसीचा पहिला डोसही मिळालेला नाही. लसीकरणाला होत असलेल्या उशिरामुळे वाढत असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी एक माहिती समोर आली आहे. एका अहवालानुसार लसीच्या दुसऱ्या डोसमध्ये होणारा उशीर सप्लाय आणि इम्युन सिस्टिम या दोघांसाठीही फायदेशीर ठरू शकतो. संशोधनामधून समजले की, जर लसीचा दुसरा डोस उशिराने प्राप्त झाला तर विषाणूसोबत लढणाऱ्या अँटिबॉडीचा स्तर २० ते ३०० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. अशा परिस्थिती

भारतीय संशोधनातील मैलाचा दगड ठरणार?

  भारतीय संशोधनातील मैलाचा दगड ठरणार! दीपक देशपांडे. आरटीपीसीआर चाचणीसाठी नाका-तोंडातील स्वॅबची गरज नाही सलाइन पाण्याच्या गुळणीतील सॅम्पल घेऊन केली जाणार चाचणी. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे महत्त्वाचे संशोधन. नागपूर :  आरटीपीसीआर चाचणीसाठी नाक आणि तोंडातील स्वॅब घेतला जातो. चाचणी करवून घेणाऱ्यांसाठी ही प्रक्रिया त्रासदायक असते. तसेच या चाचणीनंतर अचानक शिंका येतात व चाचणी करवून घेणारा करोना बाधित असल्यास आसपास उपस्थित असलेल्यांचा धोका वाढतो. मात्र, आता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) यावर उपाय शोधला आहे. सलाइन पाण्याने गुळणी केल्यास व हेच पाणी सॅम्पल म्हणून संकलित केल्यास त्याद्वारे चाचणी केली जाऊ शकते. यात रुग्णांना होणारा त्रास कमी होणार असून पैशांची व मनुष्यबळाचीही बचत होणार आहे. ( Saline Gargle RT PCR Test Technique Update ) नीरीच्या व्हायरॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. क्रिष्णा खैरनार याबाबत म्हणाले, ‘नीरीने सलाइन गार्गल आरटीपीसीआर टेस्ट हे तंत्र विकसित केले आहे. यामुळे आता नाका-तोंडातून स्वॅब संकलित करण्याची गरज नाही. चाचणी करणाऱ्या व्यक्तीला स

अनिश्चिततेच्या सावटाखाली जगताना भाग २.

  आताच तर कोरोनाची , राजकारणी मंडळी व राजकारणाची खरी ओळख पटू लागली आहे. दीपक देशपांडे. मागील लेखात आपण मागील वर्षी पावसाळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती इथपर्यंत चा प्रवास बघितला होता,आता पावसाळ्यात जर रुग्णसंख्या एवढी वाढू लागली आहे तर हिवाळ्यात जशी थंडी वाढेल तसतशी रुग्णांच्या संख्येत तिव्र गतीने वाढ होण्याची शक्यता वर्तवली गेली परिणामी पावसाळ्यात पाऊस जाता जाता येणारे गौरी गणपती चे उत्सव साजरा करण्यावर पहिल्यांदा तिव्र बंधने लादली गेली होती. समाज व सामाजिक संस्था मदतीला धावून आले व या स्थितीत सामाजिक दायित्वाची जाण ठेऊन हे उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे केले,मात्र हे उत्सव संपतात न संपतात तो कोरोना बाधितांची संख्या घसरणीवर आली आणि बंधनांवर ढिल दिली जाऊ लागली. काही अटी व शर्ती लागू करुन लग्नसमारंभास परवानगी दिली आणि कोरोनाचे  संकट गेले नाही हे माहित असताना लोक सैराटपणे रस्त्यावर उतरले ,मागील वर्ष सहा महिने खोळंबलेले लग्न समारंभ मोठ्या थाटामाटात साजरे केले जाऊ लागले. काही प्रमाणात दसरा दिवाळी हे उत्सव बंधन पाळून साजरेे करण्यास सांगितले गेले मात्र त्याचे फारसे कुणी पालन केले

एक पत्र असेही

Image
नकाराधिकार ! दीपक देशपांडे  म दत नाकारण्याचे धैर्य दाखविणारा शासकीय कर्मचारी. लोकशाही देशात ह्याचीही आवश्यकता आहेच. शासनाने कोरोनाच्या सावटाखाली जगताना काही लोकांना भरघोस सहाय्यता करतांना आपल्या तिजोऱ्या रित्या केल्या तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिथून मिळेल तिथून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न केले. असाच एक प्रयत्न शासकीय कर्मचारी यांना मिळणाऱ्या वेतनातून माहे मे २०२१च्या एक वा दोन दिवसाचे वेतन कपातीची मागणी करण्यात आली असताना एका शासकीय कर्मचाऱ्याने आपल्या नातेवाईकाला महाराष्ट्र राज्यात उपचारासाठी साधे बेड उपलब्ध झाले नाही परिणामी त्याला शेजारच्या राज्यात धाव घ्यावी लागली , त्यामुळे आपण जेथे कार्य करतो, वेळोवेळी राज्य शासनाने मागणी केली की मदतही करतो तेथे नातेवाईकांना उपचारासाठी दाखल करुन बेड उपलब्ध होऊन उपचार केले जाऊ शकत नाही. परिणामी शेजारच्या राज्यात धाव घ्यावी लागते ही फार मोठी शोकांतिका असल्याचे दाखवून देत वेतनातून कपातीची मागणी रद्द करण्याची मागणी एका पत्राद्वारे केली आहे. ही बाब वरकरणी अत्यंत शुल्लक वाटत असली तरी ती राज्य सरकारच्या  धोरणावर व एकुण कार्यपद्धती वर बोट ठेवून त

श्रेयासाठी काहीही

श्रेयासाठी काहीही ??? दीपक देशपांडे  राजकीय लाभ मिळविण्यासाठी स्थानिक नेते ? (की) उच्चपदस्थ नेते  व कार्यकर्ते यांनी  आपल्या पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन अमुकतमुक काम केले हे दाखविण्याचा जणू चंगच बांधलाय असे ऐकायला मिळत होते.,मात्र प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत असे वाटत होते मात्र नुकत्याच घडलेल्या एका घटनेने श्रेय लाटण्यासाठी कार्यकर्ते  कुठल्याही स्तरावर जाऊन केवळ आपल्या नेत्यांचा कसा उदोउदो करतात हे साऱ्या नगरवासियांना लक्षात आले आहे. राजकारण बाजूला ठेवून कोविड१९चा सामना करण्यासाठी सगळ्या पक्षातील राजकारणी मंडळी , सामाजिक संस्था , आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन कोरोना रुग्णांना मदत करण्याचे आवाहन सगळेचजण करताहेत मात्र आपल्याच नेत्यांनी हे कार्य केले हे दाखविण्याचा प्रयत्न त्यांचे चेलेचपाटे व आगंतुक प्रसिद्धी चे दायीत्व सांभाळणारी मंडळी किती बिनधास्त पणे करताहेत हे बघायला मिळाले की मन सुन्न न झाले तरच नवल. झालाय असाच प्रकार आताशा कोरोनाच्या काळात झालाय, पहिल्या लाटेत पहिल्या टप्प्यात मदतीचा हात पुढे करताना झाला आणि मदत करायची, फोटो सेशन करायचे, आपल्या ने

कोविड रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा निषेध.

Image
  कोविड विलगीकरण केंद्र जेव्हा अपुऱा अन्नपुरवठा झाल्याने एकदम चर्चेत येते....... दीपक देशपांडे. आज दूपारच्या जेवणापासून मूलमधिल कोरोना रुग्णांना झालेल्या अपूऱ्या अन्नपुरवठ्यामुळे  निर्माण झालेल्या पेचप्रसंगानंतर मूलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांनी जिल्हा प्रशासनाच्या  या कृतीविरुद्ध   नाराजी व्यक्त केली तर नगरपरिषद चे उपाध्यक्ष नंदू रणदिवे यांनी तर चक्क कोविड रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा निषेधच केला आहे. कोणत्याही पूर्वतयारीची शहानिशा न करता स्थानिक प्रशासनाकडून अतिशय नियोजन बद्धतेने येथील कोविड सेंटर मधील जेवणाची व्यवस्था सुरळीत सुरू असताना अचानक रित्या बदलवून  रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा मी तीव्र निषेध करीत आहे. ...नंदू रणदिवे.  *आजपासून स्थानिक प्रशासनाची सुयोग्य अशी व्यवस्था बदलवून जेवणाचा कंत्राट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्थ समाजकल्याण विभाग मार्फत विद्यानंद रामटेके या कंत्राटदाराला देण्यात आले , त्यांनी हे कंत्राट कुणा मसराम नामक व्यक्तीला* *पेटी तत्वावर* *दिले, आजपासून हे नवीन कंत्राट लागू होणार होते. पण कुठलाही अनुभव नसणाऱ्या

कोरोना केंद्रावर जेवणाचा घोळ

 * ब्रेकिंग न्यूज* * मूल येथील कोरोना सेन्टरवर झाला जेवणाचा घोळ, अनेक रुग्ण उपाशी,अचानक  कंत्राटदार बदलल्याने निर्माण झाला घोळ,रुग्णात प्रचंड असंतोष* *मूल तालुक्यातील कोवीड केअर सेंटर मध्ये स्थानिक  प्रशासनाकडून जेवणाची व्यवस्था सुरळीत असताना जिल्हा प्रशासनाने ही व्यवस्था समाज कल्याण विभागाकडे दिली* *आज मूल तालुक्यात तीनही कोरोंटाइन सेंटरमध्ये जेवणाचा गोंधळ चालू आहे.*

*"मी घरातून बाहेर पडणार नाही..* " ही भिती कितपत योग्य...?

Image
आज जागतिक कुटुंब दिन लेख २.  दीपक देशपांडे.  या विषयात २०  वर्षे पेक्षा जास्त काळ अभ्यास केलेल्या अनुभवी व्यक्तींचा आहे.तेंव्हा..  *"मी घरातून बाहेर पडणार नाही..* "  ही भिती कितपत योग्य...? आपल्याला कोविड-१९  बरोबरच राहायचं आहे, चला घाबरू नका किंवा नाकारू नका:  डॉ. फहीम यांगनस,  संसर्गजन्य रोग क्लिनिकचे प्रमुख, मेरीलँड विद्यापीठ, यूएसए (अमेरिका):   १. आपल्याला कोविड-१९ (COVID-19) बरोबर कदाचित काही महिने किंवा वर्षे जगावे लागेल. घाबरू नका किंवा नाकारू नका, आपले जीवन निरुपयोगी करू नका. चला या वास्तवासह जगायला शिकू या!   २. अधिकाधिक लिटर गरम पाणी पिऊन, पेशीमध्ये  घुसलेल्या/शिरकाव केलेल्या कोविड-१९ (COVID-19) विषाणूचा नाश तुम्ही करू शकत नाही - तुम्हाला फक्त अधिक वेळा बाथरूम/वॉशरूमला जावे लागेल.   ३. आपले हात नियमित धुणे आणि दोन मीटरचे शारीरिक अंतर राखणे ही आपल्या संरक्षणाचा उत्तम मार्ग आहे.  ४. आपल्या घरात कोविड-१९ (COVID-19) रुग्ण नसल्यास, आपले घर निर्जंतुकीकरण करण्याची आवश्यकता नाही.   ५. किराणा साहित्य/सामान, पिशव्या/प्लास्टिक, गॅस सिलेंडर, शॉपिंग कार्ड्स आणि एटीएममुळे हा संसर

आज जागतिक कुटुंब दिन, त्यानिमित्ताने विशेष वृत्त.

Image
  आज जागतिक कुटुंब दिन, त्यानिमित्ताने विशेष वृत्त. आमचे मित्र डॉ.मंगेश गुलवाडे यांच्या मते... * चला जाणून घेऊया ''म्युकोर मायकोसिस बद्दल'' - डॉ. मंगेश गुलवाडे* म्युकोर मायकोसिस हा बुरशीजन्य [फंगस ] संसर्ग रोग आहे,श्यकतो हा रोग 'म्युकोरेल्स' या फंगस मुळे होतो .      आज आपण कोविड १९ या महामारीच्या रोगविरोधात लढत आहोत. या रोगविरोधात लढतांना कोविड पश्चात दुष्परिणाम व उपचार याचा देखील विचार करावा लागणार आहे. कोविड च्या रोगांसाठी वापरण्यात येणाऱ्या बऱ्याच औषध समूहापैकी  स्टिराइड्स  चा देखील वापर मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे.   आणि यामुळेच रुग्णांची प्रतिकार शक्ती देखील कमी होत आहे याचाच  दुर्भाग्यपूर्ण फायदा बुरशी [फंगस] घेतात  व आपले ब्रस्तान मांडतात.    नाकाच्या सर्दीवाटे हि बुरशी नाकामध्ये सायनस मध्ये फुफुसामध्ये तोंडामध्ये डोळ्यापासून  ते मेंदूपर्यंत पोहचते. या बुरशीच्या संसर्गाचा वेग सर्वाधिक असून उपचारासाठी कमी वेळ मिळतो. लवकर निदान झाले तर औषोधोपचाराने इलाज होऊ शकतो , जर उशीर झाला तर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येऊ शकते. डोळ्यांशी संसर्ग पोहचल्यास त्यांना कायम

परशुराम जयंती निमित्त खास माहिती.

Image
                      टांगीनाथ  धाम :- इथे आज सुद्धा आहे परशुरामांचा परशु                                                               दीपक देशपांडे.          भारत हा चमत्कारांनी भरलेला देश आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला काहीना काही चमत्कारिक वस्तू दिसतेच.संस्कृतीने भरलेल्या ह्या देशात खुप अशा घटना ज्यांचा उल्लेख वेद आणि पुराणांत असून त्या कुठे तरी पुराव्यााच्या स्वरूपात आढळतांना दिसतात .आज आपण अशाच एका जागेची माहीती घेणार आहोत जी जागा झारखंड राज्यात असून तिथे आजही भगवान परशुरामांचा परशु दृष्टीस पडतो.हा तोच परशु आहे ज्याने परशुरामांनी पृथ्वीवरील अधर्मीय प्रवृत्तीचा पराभव करून धर्माचे रक्षण केले.      टांगीनाथ धाम झारखंड राज्यात गुमला शहरापासून ७५ कि.मी.आणि रांची शहरापासून १५० कि.मी.अंतरावर वसलेल्या घनदाट जंगलाच्या मधोमध आहे. इथे आज ही भार्गवरामांचा परशु जमिनित गाडलेला आहे.  परशुला झारखंडच्या भाषेत टांगी म्हटल जात. ह्यावरूनच ह्या जागेत नाव टांगीनाथ अस पडल.त्या जागी श्री परशुरामांचे पदचिन्ह सुद्धा दिसतात. श्री परशुराम आणि टांगीनाथ ह्यांची अख्यायिका:-          सितास्वयंवरा वेळी मर्यादा पुर

ब्रेक द चेन, नवीन निर्बंध

 *" ब्रेक द चेन" अंतर्गत निर्बंधास १ जून पर्यंत मुदतवाढ. * * नवीन नियमावली जाहीर.* चंद्रपूर, दि.१४ मे: कोरोना विषाणूचा वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सूचनेनुसार " ब्रेक द चेन"  अंतर्गत जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध व आदेशास जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि.१५ मे २०२१ रोजी सकाळी ७:०० वाजेपासून ते दि.१ जून २०२१ रोजीचे सकाळी ७:०० वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. *" ब्रेक द चेन" अंतर्गत नवीन नियमावली :* इतर राज्यातून कोणत्याही प्रवासी साधनांद्वारे प्रवास करून चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना ४८ तास पूर्वीचा निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक असेल.  महाराष्ट्र शासनाकडील दि.१८ एप्रिल २०२१ व  दि.१ मे २०२१ च्या आदेशान्वये घोषित केलेल्या "सेन्सेटिव्ह ओरिजिन" या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांकरिता असलेली मानक कार्यप्रणाली, देशातील कोणत्याही भागातून चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींकरिता लागू राहतील. मालवाहतूक करणाऱ्या वाहनात केवळ २ व्

कोविड१९प्रतिबंधात्मक लसिचा दूसरा डोज

 दीपक देशपांडे बहुप्रतिक्षित कोविड१९प्रतिबंधात्मक लसिचा दूसरा डोज घेण्यासाठी नागरिक धावपळ करीत होते मात्र लस उपलब्ध नसल्याच्या कारणावरून त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत होते आणि पहिला डोस घेतल्यानंतर ची मुदतही संपत आल्याने शासनाप्रती नाराजी व्यक्त केली जात होती अशा स्थितीत शासनाने निर्णय घेऊन पहिला डोस घेतलेल्यांना कोविड१९लसीचादूसरा डोस तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले व त्याचाच परिणाम म्हणून आज दिनांक १३/५/२०२१ पासून ४५ पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांच्या लसिकरणाचा दुसरा डोज घेणा-याकरिता लसिकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्यात ही मोहीम सर्व लसिकरण केंद्रावर तसेच मूलमधिल मा. सा. कन्नमवार सभागृह तसेच उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे सुरु आहे.  तरी प्रथम लसिकरण झाल्यापासून ४५ पेक्षा जास्त दिवस झालेल्या नागरिकांनी दुस-या डोज चा लाभ घ्यावा.  लसिकरणास येतांना उपाशी पोटी येवू नये. पिण्याचे पाणी सोबत आणावे.  सर्दी, खोकला, ताप, चव वा गंध न समजणे, थकवा जाणवणे वैगेरे लक्षण आढळल्यास नोंदणी करतांना लक्षात आणून द्यावे वा केंद्रातील वैद्यकिय अधिकारी यांचे लक्षात आणून द्यावे.  अस

शेणालाही आलीय किंमत! रोजगाराच्या संधी उपलब्ध.

Image
  आता शेण घेणार 2 रु किलो.  गोंदेडा गो शाळेत सुरू आहे गो कास्ट प्रकल्प.   अनेकांना मिळणार रोजगार.  चिमूर , चंद्रपूर, दीपक देशपांडे.  दिवसेंदिवस ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग पाळीव प्राणी पालन करणे सोडण्याच्या मार्गावर असताना मात्र पाळीव प्राणी मधील गाई ,म्हशी,बैल या पासून मिळणारे शेण एकतर शेण खत म्हणून वापरल्या जात आहे परंतु आता त्या शेणा ला महत्व आले असून चक्क २ रु किलो प्रमाणे घेणार आहे गो कास्ट प्रकल्प गोंदेडा गुंफा येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गो शाळेत सुरू झाला असून ग्रामीण भागातील गोंदेडा च्या आसपास च्या गावातील शेतकऱ्यांनी शेण विक्री साठी आणण्याचे आवाहन गो शाळेचे अध्यक्ष कमल असावा व सचिव प्रवीण दडमल यांनी केलेले आहे  दिवसेंदिवस जंगल तोड सुरू असल्याने वन विभागाने कडक कायदे केले असल्याने जळाऊ लाकडे मिळणे कठीण झालेले आहे तसेच ग्रामीण भागात जनावरे पोसणे सुद्धा कठीण झालेले आहे अनेक शेतकऱ्यांनी गुरेढोरे पालन करणे बंद केलेले आहे  परंतु जनावरांपासून मिळणाऱ्या शेणाचे महत्व फक्त शेण खतासाठी होत होते शेणा पासून काही नगदी मिळत नव्हते तेव्हा वृक्ष तोड,वन विभागाचे कडक कायदे यामुळे जनत

सिंदेवाही पोलिसांनी केली अवैध दारू विरोधातकार्यवाही

Image
 दीपक देशपांडे सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत जंगल परिसरातील विविध ठिकाणी गेल्या महिनाभरापासून सतत अवैध हातभट्टी मोहा दारू विरोधात अभियान सुरू केलेले आहे.     सदर अभियानाअंतर्गत आज दिनांक ११/०५/२०२१ रोजी मौजा  , सिंदेवाही तसेच पेंढरी अशा विविध ठिकाणी गावातील अवैध देशी दारू विक्रेते यांचे घरी तसेच जंगल परिसरामध्ये सिंदेवाही पोलिसांनी सर्च अभियान राबवून हातभट्टी मोहा दारू तसेच देशी , विदेशी दारू उद्ध्वस्त व जप्त  करून दारूबंदी कायद्यांतर्गत आरोपींविरोधात एकूण ४ गुन्हे नोंद केले आहेत. यामध्ये , मोहा दारू,  , देशी तसेच विदेशी दारू व मोपेड मोटार सायकल असे एकूण *१,०८,०००* / -  रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केलेला आहे. सिंदेवाही पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीचे परिसरातील अनेक नागरिकांनी स्वागत व अभिनंदन केले आहे.तर सिंदेवाही पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे अवैध दारू गाळणारे तसेच विक्री करणारे गुन्हेगार यांचेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.  सदरची कार्यवाही माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मिलिंद शिंदे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री योगेश घारे , सफारी नेरल वार , वो हवा सोनुले, राहुल

संस्कृतीरक्षक रवीन्द्रनाथ

Image
  भारताच्या राष्ट्रगीताचे निर्माते आणि देशाचे पहिले नोबेल पारितोषिक विजेते, विश्वकवी गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकुर यांचा आज बांगला पंचांगानुसार पोचिशे (२५) बैशाख (इंग्रजी ७ मे १८६१) हा एकशेसाठावा जन्मदिन. जन गण मन... च्या पहिल्या गायनाला (२७ डिसेंबर १९११) यंदा ११० वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन्हींंच्या निमित्ताने... ***************** संस्क्रुतिरक्षक रवीन्द्रनाथ विनोद देशमुख , नागपूर. ९८५०५८७६२२ जगाच्या पाच ते दहा हजार वर्षांच्या इतिहासात अनेक प्रतिभाशाली व्यक्ती ठिकठिकाणी होऊन गेल्या. ते सारे आपापल्या अधिकारात दिग्गजच होते. परंतु, भारताचे विश्वकवी गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकुर (इंग्रजांनी केलेला अपभ्रंश टागोर) यांच्या तोडीचा, बहुप्रतिभाशाली कलावंत मात्र दुसरा झाला नाही, असे मी ठामपणे सांगू शकतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाएवढे कंगोरे पाचही खंडातील दोनशेवर देशांमधील अन्य कोणत्याही माणसाच्या ठायी आढळून येत नाही. म्हणूनच "जगाच्या पाठीवरील एकमेवाद्वितीय कलावंत" असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. समस्त भारतीयांनी सार्थ अभिमान बाळगावा, असाच हा विषय आहे.  काय नव्हते रवीन्द्रनाथ ? मुळात ते कवी होते

मूल शहरात ही तरुणाई आहे हो!

तरुणाईच्या लसिकरणाची मोहीम, कुठं ढेपाळली? दीपक देशपांडे सारं जग कोरोनाच्या सावटाखाली आहे,अशा स्थितीत शक्य असेल नसेल तरीही दूरवरून मदतीचा ओघ शासनस्तरावर प्रयत्न करुन सर्वसामान्य जनतेला पुरविण्यासाठी शासनव्यवस्था कार्यरत आहे. एकीकडे दररोज कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढत आहे, लहानथोर सारेच कसे याच्या विळख्यात सापडत आहेत .राज्य सरकारने आधी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने १मे पासून सुरू होणारी लसिकरणाची मोहीम १५मेपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला, आणि अशी कोणती जादू झाली की दिवसभरात ला निर्णय रात्र होता होता बदलल्या गेला , आणि प्रायोगिक तत्त्वावर लसिकरणाची मोहीम सुरू केली जाणार असल्याचे सांगितले गेले. वेळेवर घाईगडबडीत त्रास होऊ नये म्हणून तरुणांनी आपली नोंदणी करून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शासनाला सहकार्य करण्यासाठी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला तर दिवस उलटूनही अद्याप कोणतीही लसिकरण केंद्राची नावे दिसत नव्हती , तरीही धिर धरला आज नाही तर नाही उद्या तरी दिसेल म्हणत दूसऱ्या दिवशी प्रयत्न केला तेंव्हाही तीच स्थिती तर दुसरीकडे जिल्ह्यातील नेमक्या काही केंद्रावर लसिकरण सुरू झाले म्हणून प

अनिश्चिततेच्या सावटाखाली जगताना...

  दीपक देशपांडे. मागील वर्षी कोरोना (कोविड१९) चा प्रादुर्भाव झाल्यावर जगभर एक अनामिक भिती प्रत्येकाच्या मनात घर करून बसली होती.परिणामी नेमकं काय करायचं, आणि निघणारा उद्याचा दिवस काय घेऊन पूढे येणार हे माहितच नव्हतं मात्र जणूकाही अचानक होत्याच नव्हत झालं आणि कुणाजवळ खाण्यापिण्याची काही सोय नसल्याप्रमाणे जो तो मदतीचा हात पुढे करून आपल्या सामाजिक दायित्वाची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत होते. शासनाने सुद्धा आपली कोठारे अशी काही रिकामी करायला सुरुवात केली की लाभार्थ्यांना मिळणारे धान्य कुठे ठेवू आणि त्यांचे काय करु असा प्रश्न काही दिवस निर्माण झाला होता.एकएक दिवस पुढे ढकलत होता कोरोनाचे संकट अधिकाधिक तिव्र व्हायला लागले बाधितांची संख्या वाढली त्यांच्यासाठी नवनवीन सुखसुविधा युक्त रुग्णालये ,मोफत औषधोपचार, खाण्यापिण्याची सोय करण्यात आली. याही परिस्थितीत रुग्णालयात उपचार घेणारे जणूकाही सैर करायला गेल्याप्रमाणे रुग्णालयात दाखल होऊ लागले मात्र त्यांच्या निवासस्थानी घरची मंडळी आणि त्या परिसरात निवास करणारी व त्यांच्या संपर्कात आलेली मंडळी मनात भिती बाळगून तपासणी केंद्रावर दाखल