शेणालाही आलीय किंमत! रोजगाराच्या संधी उपलब्ध.

 आता शेण घेणार 2 रु किलो. 

गोंदेडा गो शाळेत सुरू आहे गो कास्ट प्रकल्प.  

अनेकांना मिळणार रोजगार. 


चिमूर , चंद्रपूर, दीपक देशपांडे.

 दिवसेंदिवस ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग पाळीव प्राणी पालन करणे सोडण्याच्या मार्गावर असताना मात्र पाळीव प्राणी मधील गाई ,म्हशी,बैल या पासून मिळणारे शेण एकतर शेण खत म्हणून वापरल्या जात आहे परंतु आता त्या शेणा ला महत्व आले असून चक्क २ रु किलो प्रमाणे घेणार आहे गो कास्ट प्रकल्प गोंदेडा गुंफा येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गो शाळेत सुरू झाला असून ग्रामीण भागातील गोंदेडा च्या आसपास च्या गावातील शेतकऱ्यांनी शेण विक्री साठी आणण्याचे आवाहन गो शाळेचे अध्यक्ष कमल असावा व सचिव प्रवीण दडमल यांनी केलेले आहे 

दिवसेंदिवस जंगल तोड सुरू असल्याने वन विभागाने कडक कायदे केले असल्याने जळाऊ लाकडे मिळणे कठीण झालेले आहे तसेच ग्रामीण भागात जनावरे पोसणे सुद्धा कठीण झालेले आहे अनेक शेतकऱ्यांनी गुरेढोरे पालन करणे बंद केलेले आहे 

परंतु जनावरांपासून मिळणाऱ्या शेणाचे महत्व फक्त शेण खतासाठी होत होते शेणा पासून काही नगदी मिळत नव्हते तेव्हा वृक्ष तोड,वन विभागाचे कडक कायदे यामुळे जनतेला जळाऊ लाकूड मिळत नाही तसेच अंत्यसंस्कार साठी सुद्धा लाकडे मिळत नाही जनतेला त्रास सहन करावा लागत आहे वृक्ष तोड मुळे पर्यावरण चे सुद्धा नुकसान होत आहे तेव्हा अनेक बाबींची तपासणी केली असता शेणा पासून लांब गोवरी करण्याचा संकल्प करण्यात आल्यावर मटेरियल म्हणून भरपूर शेण लागणार आहे.

गोंदेडा व आसपासच्या गावातील शेण जमा करून गो शाळेत पोहचता कोण करेल हा प्रश्न निर्माण झाला  पोहचता शेण २ रु किलो प्रमाणे शेतकऱ्यांकडून घेतल्यास शेतकऱ्यांनाही दररोज चे काही प्रमाणात का होई ना नगदी स्वरूपात रुपये मिळतील जेणेकरून ग्रामीण भागातील गुरेढोरे पालन करणे बंद करणार नाही आणि स्वखुशीने शेतकरी गुरेढोरे चे पालन करणार आहे 

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी पोहचता शेण २ रु प्रमाणे गो शाळा गोंदेडा येथे विक्रीसाठी आणण्यासाठी आवाहन गो शाळा अध्यक्ष कमल असावा ,सचिव   प्रवीण दडमल  यांनी केले आहे..

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*