Posts

Showing posts from August, 2023

"राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम"(Nation First , Always First)

Image
 " राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम"(Nation First , Always First) "ज्याचं मुकुट आहे हिमालय,जिथे वाहते गंगा, जिथे आहे विविधतेत एकता आणि सत्यमेव जयते चा नारा, तोच आहे भारत देश माझा !!" राधिका देशपांडे. किती ते भारतमातेचे वर्णन, करावे तेवढे कमीच. आजपासून ७६ वर्षांपूर्वी आपण सारे अर्थातचं संपूर्ण भारवर्ष एका मोठ्या मोहिमेला फत्ते करून विजय जल्लोष साजरा करीत होतो. १५ऑगस्ट १९४७ हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा दिवस.दीडशे वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळाले. आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या असंख्य  स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिकारक आणि आपल्या भारतीयांच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.यंदाच्या स्वतंत्र दिनाची theme *Nation First, Always First (राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम)* असणार आहे .केंद्र सरकारने देशभरात *हर घर तिरंगा* अभियानाची दुसरी आवृत्ती सुरु केली आहे .याशिवाय _' माझी माती ,माझा देश_ ' ही मोहीम देखील राबविण्यात येत आहे. राष्ट्रभक्तीची नेमकी व्याख्या करता येण