Posts

Showing posts from April, 2021

पत्रकारांच्या वेतनश्रेणीचे शिल्पकार म. प्र. अंधारे

Image
  पत्रकारांच्या वेतनश्रेणीचे शिल्पकार म. प्र. अंधारे चाळीस वर्षांपूर्वी देशभरातील वर्तमानपत्रांमध्ये काम करणारे पत्रकार-पत्रकारेतर कर्मचारी पगार घेत असले तरी त्यांना निश्चित अशी वेतनश्रेणी लागू नव्हती. प्रत्येक संस्था स्वत:च्या हिशेबाने पगार देत असे. त्यामुळे वर्तमानपत्र कर्मचाऱ्यांच्या वेतनात समानता नव्हती. १९८० मध्ये पालेकर लवाद लागू झाला आणि पहिल्यांदा पत्रकार-पत्रकारेतरांना वेतनश्रेणी मिळाली. याचे श्रेय भारतीय श्रमिक पत्रकार महासंघाला (IFWJ)  आहे. त्यातही नागपूरचे पत्रकारनेते मनोहरराव (म. प्र.) उपाख्य बाबासाहेब अंधारे यांना जास्त आहे. तेच अंधारे आज शुक्रवारी सायंकाळी वयाच्या ८७ व्या वर्षी निजधामास गेले.   त्यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत पत्रकारांना वेतनश्रेणी, आँल इंडिया रिपोर्टरला व्रुत्तपत्र ठरविणे आणि पत्रकार सहनिवासाची उभारणी हे तीन मैलाचे दगड ठरणारे कार्य करून दाखविले. पालेकर लवादापुढे भूमिका मांडण्यासाठी महासंघाने राष्ट्रीय वेतन निर्धारण समिती स्थापन केली होती. अंधारे या समितीचे अ. भा. संयोजक होते आणि त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेण्यांचा आर

कोरोनाचा आजही उद्रेक

 गत २४ तासात १४१५ कोरोनामुक्त, १६६७  पॉझिटिव्ह तर २८ मृत्यू  आतापर्यंत ४२८२३ जणांची कोरोनावर मात   ॲक्टीव पॉझिटिव्ह १६५८४ चंद्रपूर, दि. ३० एप्रिल : जिल्ह्यात मागील २४ तासात १४१५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर १६६७ कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून २८ बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ६० हजार ३१२ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ४२ हजार ८२३  झाली आहे. सध्या १६ हजार ५८४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३ लाख ७६ हजार ७२२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ३ लाख ११ हजार ६६२ नमुने निगेटीव्ह आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा आजही उद्रेक! आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील रामनगर येथील ७० वर्षीय महिला व ७४ वर्षीय पुरुष, छत्रपती नगर येथील ४९ वर्षीय पुरुष, ३७ व ६१ वर्षीय पुरुष, विश्वकर्मा नगर येथील ५२ वर्षीय महिला, म्हाडा कॉलनी परिसरातील ६२ व ७२ वर्षीय पुरुष, रयतवारी कॉलनी परिसरातील ४३ वर्षीय पुरुष, इंदिरा नगर येथील २७ वर्षीय पुरुष, दुर्गापूर येथील ५५ वर

लसिकरणासाठी महाराष्ट्रात १५तारखेपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार!

 केंद्र सरकारने १८वर्षावरील नवतरुणांसाठी १मेपासून लसिकरणाची घोषणा केली, त्यानंतर महाराष्ट्र सरकारने या सगळ्यांना मोफत लसिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्य सरकार केंद्राकडून उपलब्ध होणाऱ्या लसीच्या साठ्याबाबत पूर्ण समाधानी नसल्याने महाराष्ट्रात उद्यापासून सुरु होणाऱ्या लसिकरणाची नोंदणी करून ही तरुणाईला अजून किमान १५तारखेपर्यंत तरी प्रतिक्षाच करावी लागणार आहे,असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. * इंतजार का फल मिठा होता है,असे म्हणतात ना?* बघू या ही प्रतिक्षा कधी संपणार? सगळ्यांना मोफत लसिकरण करण्याचा निर्णय कितपत यशस्वी होईल आणि तो किती कालावधी घेऊन पूर्णत्वास जाईल. कारण एकिकडे कोरोनाची वाढती साखळी त्यामुळे बाधितांची वाढणारी संख्या रुग्णालयात जागा व औषधोपचार करण्यात येणाऱ्या अडचणी आणि तिसरी चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि अजूनही ४५ते६० वयोगटातील नागरिकांचे ही लसिकरण पूर्ण झालेले नाही आणि त्यापूर्वीच तरुणाईच्या लसिकरणाची घोषणा करण्यात आली असून त्याची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. आजच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले  की ही मोहीम १५मे नंतर सुरू केली

सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेकडून पंचायत समिती मूलला वाहन सुपूर्द:*

 **सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेकडून पंचायत समिती मूलला वाहन सुपूर्द:*        मूल, डीडीबातमीपोर्टल न्यूजडेस्क.                                                               मूल येथे नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत असे लक्षात आले की अनेक लोक ग्रामीण भागातून कोविड +व होत असून त्यांना त्यांच्या घरी विलगिकरणाची सोय नाही, त्याचप्रमाणे त्यांना मूल येथे विलगीकरन कक्षात येण्यास खूप गैरसोय होत आहे, याचा विचार करून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या समस्येवर तोडगा म्हणून स्वतःकडून चारचाकी वाहन ग्रामीण जनतेसाठी देण्याची घोषणा केली होती, आज नगर परिषद मूल चे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांनी सदर वाहन मूल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मयूर कलसे यांच्याकडे सुपूर्द केले, यामुळे ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळणार असून प्रशासनाची पण ग्रामीण भागातुन रुग्ण आणतांना ची दमछाक थांबणार आहे.  धन्यवाद आमदार सुधीरभाऊ  .               

सराहनिय सामाजिक उपक्रम.

 *मूल व ग्रामीण भागातील  कोरोणाग्रस्त जनतेसाठी पून्हा सेवा कार्याचा हातभार* ...................... ................  राईस मील असोशिएशन मूल यांनी कोवीडचे रुग्णसेवेकरिता यापूर्वीच  अद्यावत ५०बेड ( पलंग, गादी , चादर , उशी ) व सरकारी दवाखान्यात रुग्ण/ नातेवाईकांसाठी बसण्यासाठी बेंच ची व्यवस्था केली असतानाच.   मा.स्थानिक प्रशासकीय अधिकारी मूल यांनी मूलमधील वाढते रुग्णांची संख्या लक्षात घेता असोशिएशनकडे पून्हा ५० नवीन बेडची मागणी केली.  मूल मधील वाढते कोरोनाचे रुग्णांचेपरिस्थितीचे गांभीर्य ओळखून  राईस मीलर्स संचालक मंडळ व सदस्य यांनी एस एम लॉन ( चामोर्शी रोड )येथे सुरू असलेल्या कोवीड सेंटर मध्ये  तात्काळ ५० बेडची मागणीस होकार दर्शवून मागणी पूर्ण करून  संपूर्ण नवीन ५० बेड आज रुग्णसेवेत दाखल करण्यात येत आहे. राईस मिल असोसिएशनचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

माझं मतं

 माझं मतं दीपक देशपांडे. मागील कित्येक वर्षे मी सातत्याने डिजिटल मिडिया च्या माध्यमातून लिखाण करीत आहो आणि आपल्या सहकार्याने व पाठिंब्यामुळे बुरसटलेल्या विचारांच्या डबक्यात राहून डरांव डरांव करीत ,व एका वेगळ्याच दडपणाखाली आपल्या मताला बंदिस्त करून ठेवण्यापेक्षा त्या मताला अधिक मोकळेपणाने व्यक्त करण्यासाठी मी माझाच एक ब्लॉग ,मग वेबसाईट ,अधिक आधुनिक वेबसाईट तयार करून आपल्यासमोर माझं मतं व्यक्त करीत होतो. हे सारं कसं व्यवस्थित सुरू असताना काहींच्या पोटात गोळा उठला आणि मग नंतर एक दोन तीन करीत अनेक जण स्पर्धा करीत जणू समरांगणात उतरल्यागत  या क्षेत्रात उतरले होते, केवळ आपणच एकट्याने या क्षेत्रात राहाण्यापेक्षा स्पर्धा सुरू झाल्याने आम्हालाही आनंदच झाला मात्र काही काळानंतर ही स्पर्धा  *नेमकं लक्ष ठरवून* सुरू झाल्याने काही प्रमाणात त्रासही झाला मात्र याला न डगमगता आम्ही आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली होती. ही बाब ही काही मंडळींनी एकत्र येऊन काम करत केवळ एकट्यालाच लक्ष करीत वेगवेगळ्या प्रकारे आमच्या प्रखर व सडेतोड विचारांना रोखण्यासाठी वापराचे षडयंत्र रचले,व त्यात ते यशस्वीही झाले,मात्र आमच्या क