श्रेयासाठी काहीही

श्रेयासाठी काहीही ???

दीपक देशपांडे

 राजकीय लाभ मिळविण्यासाठी स्थानिक नेते ? (की) उच्चपदस्थ नेते  व कार्यकर्ते यांनी  आपल्या पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन अमुकतमुक काम केले हे दाखविण्याचा जणू चंगच बांधलाय असे ऐकायला मिळत होते.,मात्र प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत असे वाटत होते मात्र नुकत्याच घडलेल्या एका घटनेने श्रेय लाटण्यासाठी कार्यकर्ते  कुठल्याही स्तरावर जाऊन केवळ आपल्या नेत्यांचा कसा उदोउदो करतात हे साऱ्या नगरवासियांना लक्षात आले आहे.

राजकारण बाजूला ठेवून कोविड१९चा सामना करण्यासाठी सगळ्या पक्षातील राजकारणी मंडळी , सामाजिक संस्था , आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन कोरोना रुग्णांना मदत करण्याचे आवाहन सगळेचजण करताहेत मात्र आपल्याच नेत्यांनी हे कार्य केले हे दाखविण्याचा प्रयत्न त्यांचे चेलेचपाटे व आगंतुक प्रसिद्धी चे दायीत्व सांभाळणारी मंडळी किती बिनधास्त पणे करताहेत हे बघायला मिळाले की मन सुन्न न झाले तरच नवल.

झालाय असाच प्रकार आताशा कोरोनाच्या काळात झालाय, पहिल्या लाटेत पहिल्या टप्प्यात मदतीचा हात पुढे करताना झाला आणि मदत करायची, फोटो सेशन करायचे, आपल्या नेत्यांचा उदोउदो करायचा त्यांचे नावाने आपलीही प्रसिद्धी मिळवायची असा प्रकार सुरू होता मग कुणितरी वरुन हायकमांडने वगैरे आदेश दिला आणि प्रसिद्धी ला लगाम लावावा लागला ,या काळात एकाच वस्तीतील एकेका कुटुंबाला व कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी मदतीचा हात दिला,पुढे या प्रसिद्धी साठी वापरलेल्या  फोटोंमुळेच ही बाब लक्षात आली.व प्रसिद्धी न करण्याचे फर्मान सोडले गेले आणि जसे काही हे संकटच संपून गेले की काय अशी शंका येऊ लागली व मदतीचा हात बंदच होऊन गेला होता.

आता पुन्हा एकदा कोरोनाच्या दूसऱ्या लाटेत लसिकरणाची मोहीम असो की ऑक्सिजन ची उपलब्धता असो की,बेडची उपलब्धता असो, ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देणे असो वा लसिकरणाची नावनोंदणी करुन देणे असो , डॉ.ची उपलब्धता असो या संपन्न देशातील जनतेला मदत करण्याचे निमित्ताने पुन्हा एकदा उच्च पातळीवरून गावखेड्यापर्यंत सारीकडे राजकारण... राजकारण आणि केवळ राजकारणच सुरू असल्याचे बघायला, ऐकायला मिळत आहे.

अशाच एका प्रकरणात कोविड विलगीकरण केंद्रात अन्नपदार्थ पुरवठ्याचे कंत्राट जूना कंत्राटदार अत्यंत शिघ्रगतीने व कुणाचीही तक्रार येणार नाही याची काळजी घेऊन पुरवठा करीत असतांनाच अचानक कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता एकदम नवीन व्यक्तीला  दिल्या जाते काय? अपुऱ्या व वेळेत पुरवठा न झाल्याने कोविड विलगीकरण केंद्रात उपचारासाठी दाखल रुग्णांना  आपला आवाज बुलंद करण्यासाठी स्थानिक नेते मंडळींना फोनवर माहिती देऊन कोविड केंद्रावर बोलवून परिस्थिती अवगत करुन द्यावी लागते काय. आणि या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोक्यावर पोहोचून परिस्थिती बघून प्रशासकीय यंत्रणा व उच्चपदस्थ अधिकारी व नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय बदलविण्यास भाग पाडले, क्वचित प्रसंगी मोक्यावर उपस्थित रुग्णांच्या चार गोष्टी ऐकून घ्याव्या लागल्या ही बाब ही लक्षात घेणे आवश्यक आहे, आणि तरीही  आम्ही मात्र आमच्या कर्तव्याची व कर्तृत्वाची साक्ष देत आमच्याच नेत्यांनी पुढाकार घेऊन ह्यावर तोडगा काढला अशी शेखी मिरवत समस्त प्रसिद्धी माध्यमांना खोटे ठरविण्यात धन्यता मानतो, हीच आमची आमच्या नेत्यांना खूश करण्याची कामना, आम्हाला नेमकं कुठं नेऊन ठेवतेय याचा विचार आमचा आम्हीच करण्याची गरज नाही काय?

जनतेच्या दरबारात जनता डोळे मिटून शांत बसली असते असे समजण्यात आपण काही चूक तर करीत नाही ना?

कुणाला काय समजायचे ते समजा पण ही भुमिका नक्कीच श्रेयासाठी काहीही,या प्रकारात मोडणारीच नाही काय?

माझ्या प्रश्नांचे उत्तर कुणिही कोणताही संदर्भ देत देण्याचा प्रयत्न करू नये ,वाचकांनी आपले मत आपल्या मनात नोंदवावे आणि आपणच आपला निर्णय घ्यावा ही नम्र विनंती, कारण चर्चा करून तोडगा निघून शकणार नाही असा हा विषय आहे.

ता.क.

माझ्या या लेखनाचा चुकिचा अर्थ काढून कुणी दुखावून घेऊ नये,कारण आपले दुःख आपल्याला च सहन करावे लागते हे कोरोनाकाळात अनेकांनी अनुभवले आहे.

नातीगोती, हितसंबंध , पैसाअडका काहीच मदतीला धावून येत नाही. त्यामुळे मी श्रेयासाठी काहीही करणार नाही , करीत नाही एवढं मात्र लक्षात ठेवावेच लागेल म्हणुनच, सत्यमेव जयते ! आणि सत्य तेच जळते!  एवढेच.



Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*