दुसरा डोस घेण्यात उशीर झाल्यास घाबरून जाऊ नका! संशोधक म्ह.....

 दीपक देशपांडे 

    दिनांक :२१ मे २०२१


   कोरोना प्रतीबंधक लसिचा दूसरा डोस घेण्यास उशीर झाला म्हणून घाबरण्याचे कारण नाही असे संशोधकांचे म्हणणे आहे.यामुळे शासन स्तरावर आनंद व्यक्त केला जाण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी नागरिकांनी या लसिचा पहिला डोस लवकर घेणे गरजेचे आहे कारण त्याशिवाय दूसरा डोस देऊन कोरोनाविरुद्धचा लढा मजबूत करण्यासाठी  समयसिमा निश्चित करता येणे शक्य नाही व  त्याशिवाय केंद्र व राज्य संघर्ष थोपवून राजकीय मतभेदाचे राजकारण बाजूला सारण्याचा प्रयत्न होणार नाही.

नवी दिल्ली,

देशात कोरोनाच्या लसींचा मोठा तुटवडा जाणवत आहे .देशातील मोठ्या प्रमाणावरील लोकसंख्येला अद्याप कोरोनावरील लसीचा पहिला डोसही मिळालेला नाही. लसीकरणाला होत असलेल्या उशिरामुळे वाढत असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी एक माहिती समोर आली आहे. एका अहवालानुसार लसीच्या दुसऱ्या डोसमध्ये होणारा उशीर सप्लाय आणि इम्युन सिस्टिम या दोघांसाठीही फायदेशीर ठरू शकतो. संशोधनामधून समजले की, जर लसीचा दुसरा डोस उशिराने प्राप्त झाला तर विषाणूसोबत लढणाऱ्या अँटिबॉडीचा स्तर २० ते ३०० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. अशा परिस्थितीत हे नवे संशोधन सिंगापूर आणि भारतासह अनेक देशांसाठी फायदेशीर ठरू शकते.

 तर ३०० टक्के अधिक अँटिबॉडी निर्माण होणार

कोरोनावरील लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर हे अधिक असेल तर ३०० टक्के अधिक अँटिबॉडी निर्माण होण्याची शक्यता असते, अशी माहिती संशोधनामधून समोर आली आहे. लसीचा पहिला डोस इम्युन सिस्टिम तयार करतो आणि विषाणूविरोधात अँटिबॉडी तयार करायला सुरुवात करतो. अशा परिस्थितीत या प्रक्रियेला जेवढा अधिक वेळ मिळेल तेवढी चांगली प्रतिक्रिया दुसऱ्या डोसमधून मिळते, असे संशोधनामधून समोर आले आहे. दरम्यान, लसीच्या दोन डोसमधील जास्त अंतर हे सर्वच लसींच्याबाबतीत फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले आहे.

संशोधकांच्या नवीन उपक्रमाचे सगळ्यांनी मिळून स्वागत करणेही आवश्यक आहे.तेंव्हाच तर भारत देशाची प्रगती होणार आहे. यशस्वी व्हा, रोगमुक्त व्हा यासाठी हे गरजेचे आहे.

  




Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*