मूल शहरात ही तरुणाई आहे हो!



तरुणाईच्या लसिकरणाची मोहीम, कुठं ढेपाळली?

दीपक देशपांडे

सारं जग कोरोनाच्या सावटाखाली आहे,अशा स्थितीत शक्य असेल नसेल तरीही दूरवरून मदतीचा ओघ शासनस्तरावर प्रयत्न करुन सर्वसामान्य जनतेला पुरविण्यासाठी शासनव्यवस्था कार्यरत आहे.

एकीकडे दररोज कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढत आहे, लहानथोर सारेच कसे याच्या विळख्यात सापडत आहेत .राज्य सरकारने आधी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने १मे पासून सुरू होणारी लसिकरणाची मोहीम १५मेपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला, आणि अशी कोणती जादू झाली की दिवसभरात ला निर्णय रात्र होता होता बदलल्या गेला , आणि प्रायोगिक तत्त्वावर लसिकरणाची मोहीम सुरू केली जाणार असल्याचे सांगितले गेले.

वेळेवर घाईगडबडीत त्रास होऊ नये म्हणून तरुणांनी आपली नोंदणी करून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शासनाला सहकार्य करण्यासाठी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला तर दिवस उलटूनही अद्याप कोणतीही लसिकरण केंद्राची नावे दिसत नव्हती , तरीही धिर धरला आज नाही तर नाही उद्या तरी दिसेल म्हणत दूसऱ्या दिवशी प्रयत्न केला तेंव्हाही तीच स्थिती तर दुसरीकडे जिल्ह्यातील नेमक्या काही केंद्रावर लसिकरण सुरू झाले म्हणून प्रयत्न केला गेला तर एका जिल्ह्यातील एका तालुक्यातील व्यक्तीला दूरवरच्या दूसऱ्याच तालुक्यातील केंद्रावर नंबर लागला असल्याचे कळवले गेले.असाही प्रकार सुरू झाला.

चंद्रपूर जिल्ह्यात १५तालुके आहेत तर प्रायोगिक तत्त्वावर लसिकरणाची मोहीम आधी मर्यादित  र्केंद्रावरच करायची होती तर ती वेगवेगळ्या ७ तालुक्यात व्हायला हवी होती तर ती तशी झाली नाही मात्र वाढिव केंद्र देतांना तरी दूसऱ्या तालुक्याला द्यायला हवे होते ना?

पण तसेही घडले नाही.जिथे आधीच एक केंद्र आहे तिथेच दूसरे ही केंद्र ! 

तरुणाईच्या बाधितांची संख्या अधिक वाढत असतानाच मृत्यू दरही वाढतच आहे त्यामुळे या तरुणाईला लसिकरणाची गरज आहे त्यामुळे शासनाने व शासनकर्त्यांनी हा माझा प्रभावशाली तालुका आणि तो विरोधकांचा असा भेदभाव न करता प्रत्येक तालुक्यात किमान एक लसिकरण केंद्र सुरू करुन तरुणाईला सहकार्य करावे अशी मागणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील तरुणाईने आमच्याकडे केली आहे आणि सध्या घडत असलेला प्रकार व विनाकारण प्रतिक्षा करण्यात  व्यर्थ वाया जात असलेल्या वेळेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

तरुणाईच्या या सामंजस भुमिकेकडे कुणी दुर्लक्ष करु नये अशी समंजस प्रतिक्रिया कुठल्याही प्रकारचा आततायीपणा न करता याच तरुणाईने दिली आहे व नको तिथे राजकारण करण्याचा प्रयत्न कुणी केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा गर्भित इशारा दिला आहे.

सारे कसे शांतपणे व सामंजस्याने पार पडावे ही या तरुणाईची भुमिका नक्कीच स्वागतार्ह व चिंतनीय आहे यात वादच नाही.

शासनकर्ते व राजकीय मंडळी ही बाब गांभीर्याने घेतील व योग्य तो निर्णय घेतीलच याची आम्हाला जाणीव व खात्री आहे.

माहितीसाठी हा लेख संपवण्यापूर्वी एक सांगतो,मूल येथिल उपलब्ध लस २८-२९एप्रिल रोजी संपल्यापासून आजपर्यंत उपलब्ध झालीच नाही त्यामुळे वय वर्षे १८-४४तर सोडाच परंतू ४५-६०च्या नागरिकांनाही ही लस उपलब्ध नाही आणि मूल हे शहर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि आमदार तथा लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या पसंतीस उतरलेले शहर आहे आणि तेच तर याबाबतीत दुर्लक्षित राहिले आहे त्यामुळे नागरिक वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चाही करु लागले आहेत.

बघा तुमची आवड,तुमचे कार्य जनमताचा कौल तर ढासळू देणार नाहीत याची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे आम्ही केवळ जनमताचा कौल तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचे माध्यम आहोत.

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

गावातील वादातून वाघाचा शिकारी अडकला जाळ्यात!