Posts

Showing posts from November, 2021

*बोलतात सगळेच पण सोबतीला कोण?

Image
  *अजब नगराची गजब गाथा* दीपक देशपांडे. * व्यावसायिकांचे    रस्त्यावर अतिक्रमण अन् अतिक्रमण हटवावे तर दूसरा कुणीतरी जागा बळकावेल ही भिती .* * बळीराजा चा वाली कोण? * * गूजरी बंद.रस्तोरस्ती बाजार सुरू* चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात वर्षोनुवर्षे(तत्कालीन ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या)आता नगरवासियांच्या  सोयीने स्थानिक नगरपरिषद कार्यालयासमोर चौकात दररोजच्या दैनंदिन जीवनातील महत्वाच्या असलेल्या   खाद्यान्न व भाजीपाला खरेदी करताना नगरवासीयांना  विशेष पायपीट करावी लागू नये म्हणून दूकाने थाटून व चौकातील रिकाम्या जागी भाजीबाजार भरविण्यास परवानगी दिली होती ती आजतागायत सुरू होती मात्र संपूर्ण जगाला कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आणि त्याचा परिणाम या मूल नगरातही झाला. सारे व्यवहार बंद करण्यात आले,तसेच भाजीबाजारही बंद करण्यात आले , काही दिवसांनी भाजीविक्री अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करुन भाजी विक्री सुरू झाली मात्र मूल नगरपरिषदेने आधी  नगरपरिषद परिसरातील पाण्याची टाकी तोडून काढण्याचे कारण देत भाजीबाजार भरविण्यास परवानगी नाकारली व ती प्रदिर्घ काळ चालली त्यानंतर काही काळ नगरपरिषद इमारत बांधकामाचे निमि

बहिणभावांच्या प्रेमसंवर्धनाचा दिवस , भाऊबीज.

Image
  भाऊबीज कार्तिक शुद्ध द्वितीयेला । सण आहे भाऊबीजेचा ।। बंधू भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा दिवस । योग बहिणीच्या घरी भोजनाचा ।। दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज, कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलावले होते. यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला अशी पौराणिक कथा आहे।. हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा ‘बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो’, ही त्यामागची भूमिका आहे. आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण साजरा केला जातो. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. ज्या समाजात भगिनींना समाजातील व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील, तो दिवस, म्हणजे दीपावलीतील भाऊबीज पूजनाचा दिवस. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायं

बलिप्रतिपदा हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त.

Image
  बलिप्रतिपदा . कार्तिक शुद्ध प्रतिपदेला । आहे सण बलिप्रतिपदा ।। बळीराजाचे होता पूजन । सुख शांती नांदे सदा ।। दिवाळीचा चवथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा, या दिवशी बळीची पूजा करतात. राक्षस कुळात जन्म घेऊनही बळीच्या पुण्याईने त्याच्यावर वामनदेवाची कृपा झाली. त्याने ईश्‍वरीय कार्य म्हणून जनतेची सेवा केली. तो सात्विक वृत्तीचा व दानी राजा होता. प्रत्येक मानव हा सुरुवातीला अज्ञानी असल्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्य घडत असते; परंतु ज्ञान आणि ईश्‍वरीकृपेमुळे तो देवत्वाला पोहचू शकतो, हे यावरून स्पष्ट होते. बलिप्रतिपदा हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. या दिवसापासून शुभकार्याची सुरवात करण्याची प्रथा आहे. बळीराजाचा हा स्मरणदिन आहे. बळी हा शेतकऱ्यांचा राजा होता. तो दानशूर, प्रजाप्रेमी व सत्यवचनी होता. त्यामुळे तो देवांपेक्षाही मोठा झाला होता. लोक देवांच्या आधी बळी राजाचे नाव घेतं. त्यामुळे देव संतप्त झाले व त्यांनी विष्णू देवाला साकडे घातले. विष्णू वामनावतार धारण करून बळीकडे याचक म्हणून गेला. तेव्हा “तुला काय हवे ते माग” असे बळी राजाने विचारले. यावर “फक्त त्रिपादभूमी हवी मला” वा

लक्ष्मीपूजन! दिवाळीचा असाही एक महत्वाचा दिवस.

Image
  लक्ष्मीपूजन अश्विन अमावस्येला । होत असे लक्ष्मी पूजन ।। व्हावी बरकत धन धान्याची । म्हणून होते कुबेराचेही पूजन || घर असो किंवा कार्यालय….दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी मोठं महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते. दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा असे म्हणत हा मांगल्यपूर्ण सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिव्यांची आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करणारा हा सण राज्यासह देशविदेशात साजरा केला जातो. दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपा-आशीर्वाद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते.या प्रदोषकाली लक्ष्मी-कुबेर पूजन केल्याने आपल्याला ऐश्वर्य प्राप्त होते. अश्विन कृष्ण अमावास्येच्या मुहूर्तावर घरात कुटुंबातील सर्वांच्या उपस्थितीत ही पूजा करावी. यावेळी घरातील लक्ष्मी म्हणजेच धनाची विशेषत्त्वाने पूजा केली जाते. यावेळी देवाला आणि धनाला धने, गूळ,लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी

दिवाळीचा महत्वाचा दिवस *नरकचतुर्दशी*

Image
  नरकचतुर्दशी अश्विन कृष्ण चतुर्दशीला ।। नरक चतुर्दशी आहे सण ।। उठून त्या दिवशी भल्या पहाटे । सूर्योदयापूर्वी करावे अभ्यंगस्नान ।। आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी असे म्हणतात. दिवाळीच्या दिवसांतील हा एक महत्त्वाचा  सण आहे. श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे - पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला. श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार क

दिवाळीचा दूसरा दिवस, धनत्रयोदशी

Image
   धनत्रयोदशी   अश्विन कृष्ण त्रयोदशीला ।   घडले समुद्र मंथन ।।   अमृतकुंभ घेऊन आले ।               झाले धन्वंतरीचे आगमन । आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील १३व्या दिवशी धनत्रयोदशी  हा सण साजरा केला जातो. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी लक्ष्मी मातेसोबत पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. असे म्हणतात की हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो .लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगुन जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीन

दिवाळीचा पहिला दिवस, वसुबारस

Image
                          वसुबारस                       अश्विन कृष्ण द्वादशीला ।    असे सण वसुबारस ।।                        होते आगमन लक्ष्मीचे ।                        पूजले जाते गाई-पाडस ।।"     भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरु होते ती "वसु - बारस" या दिवसापासून. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो. हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी संवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या सणांनी दिवाळी साजरा केली जाते. घर-अंगणात दिवे लावत अंध:कार दूर करणारा, अज्ञात मृत्यूचे भयनिवारण करणारा, इच्छा आकांक्षा बाळगणारा असा हा आल्हाददायक सण आहे. वसुबारस साजरा करण्यामागे अजून एक