Posts

Showing posts from April, 2024

*००- क्रांतिकारी निर्णय -००*

Image
 *००- क्रांतिकारी निर्णय -००*   *Supreme Court : खटल्यांची माहिती मिळणार व्हॉट्सॲपवर ; सर्वोच्च न्यायालयाचे डिजिटल पाऊल* दीपक देशपांडे  सर्वोच्च न्यायालयाने आज डिजिटायझेशनच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकताना संबंधित खटल्यावर कधी सुनावणी होईल? तो खटला कधी दाखल करण्यात आला? याची माहिती व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विधिज्ञांना पाठविण्यात येईल अशी घोषणा केली आहे. यामुळे न्यायालयीन कामकाजाच्या प्रक्रियेत मोठी सुधारणा होईल तसेच कागदाची देखील बचत होईल. सर्वोच्च न्यायालयाने तयार केलेल्या 'इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी (आयसीटी) सर्व्हिसेस'सोबत व्हॉट्‍सॲपला जोडण्याची घोषणा सरन्यायाधीशांनी आज एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान केली. सरन्यायाधीशांनी या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा व्हॉट्सॲप क्रमांकदेखील शेअर केला. *आदेश, निकालही कळणार* सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यांची नोंद आहे असे वकील आणि याचिकाकर्ते यांना संबंधित खटल्याची सुनावणी कधी होईल? तसेच तो खटला नेमका कधी दाखल करण्यात आला? महत्त्वाचे आदेश आणि निकाल यांचा तपशील व्हॉट्‍सॲपवरून पाठविण्यात येईल. बार कौन्सिलच्या

कृषी महाविद्यालय मुल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सोळावी बैठक संपन्न

Image
  कृषी  महाविद्यालय मूल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सोळावी बैठक संपन्न  मूल २९: दीपक देशपांडे  कृषी  महाविद्यालय मूल द्वारा आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सोळावी बैठक दिनांक २९ एप्रिल २०२४ रोजी ग्रामपंचायत मारोडा  ता. मूल येथे संपन्न झाली. या प्रसंगी शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मूल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यत्वे “ कृषी पूरक व्यवसाय” या विषयावर चर्चा करण्यात आली.  यामध्ये सर्वप्रथम डॉ. अर्चना बोरकर, विषयतज्ञ कीटकशास्त्र, यांनी मधुमक्षिका पालन तसेच रेशीम कीटक संगोपन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. हे व्यवसाय शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकतील असे त्यांनी सांगितले. त्यांनी वरील व्यवसायांकरीता शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या विविध सवलतींबद्दल सांगितले. तसेच येणाऱ्या उपलब्ध बाजारपेठे बद्दल माहिती दिली. यावेळेस वरील कुठलाही व्यवसाय सुरू करण्याअगोदर त्याची पूर्णपणे माहिती घेणे व योग्य संस्थांमार्फत त्याबद्दलचे प्रशिक्षण घेणे फार गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. उद्यानविद्या  शास्त्रज्ञ  डॉ. स्वप्नील देशमुख

संजय फ्लेम्स मूलच्या विरोधात अखेर तक्रार दाखल !

Image
  संजय फ्लेम्स मूलच्या विरोधात अखेर तक्रार दाखल !  दिनांक २मे रोजी दस्तावेजासह उपस्थित राहण्याबाबत मृदूला मोरे   तहसीलदार मूल यांनी दिल्या सुचना. दीपक देशपांडे  गॅस सिलिंडर वितरणाबाबत अनियमितता आणि एजन्सी चालकाच्या मनमानी ला कंटाळून ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी व शोषणमुक्त सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल च्या वतीने मूलमधील गॅस एजन्सी संजय फ्लेम्सच्या मनमानी व दोषपूर्ण व्यवस्थेबाबत एक बातमी    Ddbatmiportalm2m वर दिनांक २१/०४/२०२४रोजी  *संजय फ्लेम्सची मनमानी!  मूलमध्ये गॅस सिलिंडरचा  काळाबाजार???*  * एजन्सीवाले मस्त!सिलिंडर फस्त!!ग्राहक त्रस्त !!!* https://ddbatmiportalm2m.blogspot.com/2024/04/blog-post_63.html या मथळ्याखाली प्रसिद्ध केली होती.त्यात दि.२२/०४/२०२४च्या सायंकाळपर्यंत खुलासा मागितला होता. ही बातमी प्रसिद्ध होताच दुसऱ्या दिवशी सकाळी एजन्सी धारक सुधीर मेघराजानी यांनी फोनवर आमचे सोबत संपर्क साधला आणि कंपनीकडून सिलेंडर पुरवठ्यात अनियमितता आणि एजन्सी मधील कामगारांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराचे कारण पुढे करत नवीन कामगारांना ग्राहकांचे

*अल्कोहोलिक्स् अँनॉनिमस् (ए.ए.) समृद्ध समूहाचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा!*

Image
  *अल्कोहोलिक्स् अँनॉनिमस् (ए.ए.) समृद्ध समूहाचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा!* चंद्रपुर :-दीपक देशपांडे    चंद्रपूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उर्जानगर कोंडी येथे आज दि. २७ एप्रिल २०२४ रोज शनिवारला सांय. ७:०० वा. अल्कोहोलिक्स् अँनॉनिमस् समृद्ध समूह, दुर्गापुरचा दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.* *सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोषभाऊ पारखी व दुर्गापुर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक लताताई वाढीवे मैडम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.* *अल्कोहोलिक्स् ॲनॉनिमस् म्हणजे अनामिक मद्यपी, ही पुरूष व स्त्रियांची एक संघटना आहे. ह्यामधील सभासद आपले व्यक्तिगत अनुभव एकमेकांना सांगतात ज्यामुळे सर्व सभासदांचे मानसिक धैर्य वाढते व नवजीवनाची आशा निर्माण होते* *अशा तन्हेने सभासद आपले स्वतःचे तसेच एकमेकांचे प्रश्न सोडवतात आणि दारूपासून दुर राहतात. या संघटनेत सामील होण्यास फक्त एकच अट आहे की, दारूच्या रोगातुन मुक्त होण्याची सभासदाची इच्छा असली पाहीजे. ए.ए. च्या सभासदत्वासाठी कसलीही वर्गणी किंवा देणगी आकारली जात नाही.*

*निवडणूक समरांगणातील लढवय्ये..२५,स्पर्धेचा निकाल*

Image
*निवडणूक समरांगणातील लढवय्ये...२५ * स्पर्धेचा निकाल मूल ,चंद्रपूर,दीपक देशपांडे    मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा , मतदानाचा सेल्फी ,  रिल्स् ,  पोस्टर्स ,  मिम्स्.          स्पर्धेचा निकाल जाहीर                                                                                           लोकसभा सार्वत्रिक निवडणूक  – २०२४ अंतर्गत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान केल्याचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स आणि मिम्स् स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यात सहकार्य केले. या स्पर्धांचा निकाल जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ च्या माध्यमातून नुकताच घोषित करण्यात आला आहे. सन२०१९ च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी असल्यामुळे यावर्षी २०२४ मध्ये मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह निर्माण व्हावा, लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

Image
*जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश* शासकीय अधिकाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक नियमावली दीपक देशपांडे. सामान्य नागरिकांकडून अधिकाऱ्यांना ई-मेलवर प्राप्त होणाऱ्या तक्रारीचा आशय लक्षात घेऊन संबंधित कार्यालयाकडून ७ दिवसांत उत्तर/अहवाल मागवण्यात यावा, असे आदेश देणारा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांना प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यातील ही महत्त्वाची सूचना आहे. सामान्य नागरिकांना राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये वैयक्तिकपणे जाऊन तक्रार, निवेदन किंवा गाऱ्हाणी मांडणे प्रत्येकदा शक्य होत नसल्याने शासनाने विविध संकेतस्थळ विकसित करून त्यावर ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी आणि निवेदने स्वीकारण्याची सुविधा दिली. मात्र, जनतेकडून येणाऱ्या तक्रारी आणि निवेदनांची संख्या मोठी असून अनेक दिवस त्या निकालीच काढल्या जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाचे दैनंदिन कामकाज पारदर्शक आणि अधिक लोकाभिमुख होण्यासाठी विविध संकेतस्थळ विकसित केले आहेत. नागरिक आणि प्रशासन यांना ऑ

*आज जागतिक ग्रंथ दिन*

Image
 🌹📚🌹🔆🌅🔆🌹📚🌹 *आज जागतिक ग्रंथ दिन*       * आज २३ एप्रिल हा 'जागतिक ग्रंथ दिन'. विख्यात नाटककार विल्यम शेक्सपिअर यांचा जन्मदिन आणि स्मृतीदिनही.*         *ग्रंथ विवेक शिकवतो. जगाकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी देतो. मनुष्य जीवनातील गुंतागुंत समजायला शिकवतो. ग्रंथ म्हणजे मानवी प्रगतीचे सर्वात मोठा स्रोत.. कुबेर भंडार.*             *भारतीय संस्कृतीचे ग्रंथाशी सनातन नाते आहे. या ग्रंथातून भारतभूचा वैभवशाली इतिहास मांडला गेलाय. अडीच हजार वर्षापूर्वीचा लिखित वैभवशाली इतिहास उपलब्ध आहे. ग्रंथ हे जीवन समृद्ध करतात. तसेच आरसा दाखवत सावधही करतात. वैभव लुटण्यासाठी भारत देशावर सतत परकीय आक्रमणे कशी झाली याचा इ. स. पूर्व ३०० पासूनचा इतिहास उपलब्ध आहे. ग्रीक राजा सिकंदर ते इंग्रजा पर्यन्तचा इतिहास सांगणारे हे ग्रंथ देशाला सावध करतात.*          *ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा खजिना. सुखी.. समाधानी आनंदी जीवनासाठी प्रवेशव्दारच. ग्रंथ मानवी जीवन क्रांती घडवितात. दिवसागणिक जीवन समृद्ध होतेय ते ग्रंथातील ज्ञानामुळेच. मग ते कोणतेही असो.. धर्म, साहित्य, कला, विज्ञान, तंत्रज्ञान हे सारे ज्ञान ग्रंथात दडलेय

दिनविशेष:-🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻 *स्वामीनिष्ठ हनुमान जन्मोत्सवाची*

Image
 🚩⚜🚩🔆🕉🔆🚩⚜🚩       दिनविशेष  .... 🌻 * li.आनंदी°पहाट.il * 🌻         * स्वामीनिष्ठ हनुमान         जन्मोत्सवाची *             🚩⚜🌸🙏🌸⚜🚩⚜     *राम रसायन तुम्हरे पासा*      *सदा रहो रघुपति के दासा*      *तुम्हरे भजन राम को पावै*      *जनम जनम के दुख बिसरावै*      *.... संत तुलसीदास *         *भारतीय संस्कृतीतील देशविदेशातील भक्तगण आज भल्या पहाटे उठून शुचिर्भूत होत मारुतीरायाच्या उपासनेत दंग आहेत. मारुती स्तोत्र.. हनुमान चालीसा पठन सुरू आहे.*         *ज्यांच्या जवळ रामनामाचे रामबाण औषध आहे अशा हनुमानाची केलेली भक्ती ही रामापर्यन्त पोहोचते अन् जन्मजन्मांतरीची दुःख दूर होतात.*          *जिथे राम तिथे हनुमान आणि जिथे हनुमान तिथे राम कारण हनुमंताच्या हृदयातच राम आहे. पवनसुत हनुमान हे जीवनात उर्जा देणारे आदर्श असे दैवत.*         *रुद्रअवतार रामभक्त हनुमान हे गुणसागरच. बल-बुद्धी संपन्न हनुमान हे मानसशास्त्र.. राजनीती.. साहित्य.. तत्त्वज्ञान यात पारंगत होते. अत्यंत विश्वासू असे स्वामीनिष्ठेचा आदर्श. रामराज्य हनुमंताशिवाय अशक्यच होते. हनुमान हे श्रीरामाचे निस्सिम भक्त.. सेवक.. सैनिक आणि स

*निवडणूक समरांगणातील लढवय्ये...२४* भाजपचा पहिला विजयोत्सव!

Image
  *निवडणूक समरांगणातील लढवय्ये...२४ * भाजपचा पहिला विजयोत्सव! दीपक देशपांडे  स्वतंत्र  भारताच्या संसदेत १८व्या लोकसभेसाठी पहिला खासदार भाजपाचा! *भाजपाची  विजयी दौड सुरु...*🚩🚩 *सुरत(गुजरात) लोकसभा क्षेत्रातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी* मुकेश दलाल यांना विजयी प्रमाणपत्र प्राप्त झाले असून ते सुरतमधील नामवंत व्यक्ती आहेत आणि भाजपचे महासचिव आहेत. सुरतच्या या जागेवर कांग्रेसचला मोठा झटका बसला असून पार्टी चे उमेदवार निलेश कुंभानी यांचे नामांकन रद्दबातल करण्यात आले, यासाठी कांग्रेस तर्फे असाही आरोप लावण्यात आला आहे की हे सारे भाजपच्या इशाऱ्यावर केले गेले आहे. जेंव्हा की बीएसपीचे  प्यारेलाला भारती  यांनी आपली उमेदवारी परत घेतली,आणि इतर उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज परत घेतले आणि मुकेश दलाल यांचा मार्ग मोकळा झाला. मुकेश दलाल यांचे विजयाचा आनंद व्यक्त करताना  सीआर पाटिल यांनी  सोशल मीडिया एक्स वर अशी प्रतिक्रिया दिली आहे की,सुरत ने पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना पहिले कमळ निवडून दिले असून भाजपा उमेदवार मुकेश दलाल यांचे अभिनंदन केले आहे. १९८९पासून भाजपा सुरत मतदार संघात विजय मिळवून

*संजय फ्लेम्सची मनमानी! गॅस सिलिंडरचा काळाबाजार???*

Image
 *संजय फ्लेम्सची मनमानी!  मूलमध्ये गॅस सिलिंडरचा  काळाबाजार???*  *एजन्सीवाले मस्त!सिलिंडर फस्त!! ग्राहक त्रस्त !!!* *मूल, दीपक देशपांडे* एच.पी.गॅस वितरक म्हणून  मूल तालुक्यात मागील काही वर्षांपासून संजय फ्लेम्सची नियुक्ती केल्या गेली आहे. यांचे मालक बाहेर गावी वास्तव्यास असतात आणि ही गॅस एजन्सी त्यांचे इतर साथीदार व नोकरवर्ग सांभाळतात. गॅस सिलिंडर पुरवठा करण्यासाठी ग्राहकांनी आँनलाईन नोंदणी केली गेल्यानंतर गॅस एजन्सी ने ग्राहकांना घरपोच सिलिंडर पुरवठा करण्याची जबाबदारी गॅस एजन्सी ची आहे. असे असताना गॅस सिलिंडर ची मागणी केल्यानंतर संजय फ्लेम्सचे वतीने तातडीने पुरवठा तर होतच नाही ,मात्र वारंवार विचारणा करुनही माणसं नाही , सिलिंडर उपलब्ध नाहीत अशी कारणे दिली जातात व दोन दिवसांत सिलिंडर पोहचेल असे उत्तर दिले जाते ,कधी दोन दिवसांत सिलिंडर पोहोचते केले जाते नाहीतर पुन्हा तेच ते उत्तर ऐकायला मिळते. याबाबत संजय फ्लेम्सचे भागीदार यांना वारंवार सुचित करुनही ह्या प्रकारात फारसा बदल होतांना दिसत नाही. एकीकडे असा प्रकार ग्राहकांना अनुभवायला येत असतांनाच दुसरीकडे चहाटपऱ्या आणि  हाँटेलमध्ये घरगुती वा

आतातरी नगरप्रशासन कार्यरत होणार काय? जनतेचा प्रश्न?

Image
* आतातरी नगरप्रशासन कार्यरत होणार काय? जनतेचा  प्रश्न?* मूल, दीपक देशपांडे  नक्की होईल:-मुख्याधिकारी यशवंत पवार यांचे आश्वासन. लोकशाहीच्या महापर्वाच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९एप्रिल रोजी पार पडले असून जनतेचा कौल ईव्हीएममध्ये बंद झाला आहे ,तो बाहेर येण्यासाठी अजून दिड महिना प्रतिक्षा करावी लागणार आहे. मात्र मागील जवळपास महिनाभरापासून निवडणूक असल्यामुळे नगरपरिषदेतील कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले असल्याचे कारण पुढे करून नगरपरिषदेची अनेक कामे बंद असून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणे बंदच आहे , परिणामी अनेक बांधकामे अपूर्ण असून जनता हालअपेष्टा सहनच करीत आहे. कुठले थंड पाण्याचे यंत्र कित्येक महिन्यांपासून बंद आहे ते बंदच आहेत, त्यामुळे  उन्हाळ्यात जनतेला थंड पाणी  उपलब्ध होत नसल्याने ते नाहक त्रास सहन करावा लागत आहे ,हे यंत्र आता उन्हाळ्यात कामात नाही आले तर केंव्हा येणार अशी विचारणा जनता करीत आहे.    कुठे रस्त्याचे काम तर कुठे नाल्या ,कुठे मुत्रीघराचे काम अर्धवट पडले आहे,   ही सगळी कामे जर आता तातडीने सुरू झाली नाहीत  आणि नाल्यांची  सफाई झाली  नाही तर ती येत्या पावसाळ्यात एक

*निवडणूक समरांगणातील लढवय्ये...२३*

Image
  *निवडणूक समरांगणातील लढवय्ये...२३ * *मतदार राजा* *दीपक देशपांडे* निवडणुकीच्या रणधुमाळीत खरा राजा असणाऱ्या मतदाराची चिंता कुणाला नसावी असे चित्र काल पार पडलेल्या निवडणुकीत समोर आले आहे. निवडणूक समरांगणात दोन्ही पक्षांतील मातब्बर मंडळी संपूर्ण तनमनाने सहभागी झाली होती असे आश्वस्तपणे कुणी सांगू शकत नव्हते , ज्यांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा दिली गेली होती ती मंडळी या संपूर्ण प्रक्रियेत अनवधानाने दृष्टीस पडत होती. परिणामी निवडणुकीत कोण मतदान करण्यासाठी आले, कोण नाही आले ,ते कां नाही आलेत ह्याबाबतीत लक्ष ठेवायला बुथनिहाय तर सोडाच वार्डनिहायही कुणी पुढाकार घेऊन सक्षमपणे कार्यरत दिसले नाहीत.याचा फटका पारंपरिक मतदारांना बसला कारण एका यादीत नाव नाही सापडले तर दुसऱ्या यादीत नाव शोधण्याचे आणि धावपळ करुन दुसरे केंद्र गाठण्याचे महाकष्ट कुणी घेतलेच नाही आणि म्हणूनच मतदान केंद्रावर येऊनही असे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले , त्यामुळे केवळ एकाच पक्षाचे उमेदवारांना नाही तर बहुतेक सगळ्यांनाच यांचा फटका बसला आहे.  नाहीतर  मतदानाची टक्केवारी ७५-८०% निश्चीतच जाऊ शकली असती,असे जाणकारांचे मत आहे. नवम

*निवडणूक समरांगणातील लढवय्ये...२२**जागृत मतदार*

Image
  *निवडणूक समरांगणातील लढवय्ये...२२ * *जागृत मतदार* *चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात ६७..५७ टक्के मतदान*  * उन्हाच्या तडाख्यातही तीन टक्क्यांची वाढ* चंद्रपूर, दि. २० : दीपक देशपांडे  उन्हाच्या तडाख्याने मतदान प्रभावित होऊन मतदानाची टक्केवारी घसरणार काय?असे चित्र दिसत असताना आज अंतिम टक्केवारी समोर आली आणि बऱ्याच जणांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे , आणि जयपराजयाची गणिते बदलली जात असल्याचे प्रतिपादन राजकीय , सामाजिक गोटातून ऐकायला मिळत आहेत. १३ - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण  ६७.५७ टक्के मतदान झाले. १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी ६७.५७ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे गत आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा ४२-४३अंशावर असतांनासुध्दा मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत मतदानाचे कर्तव्य पार पाडले. त्यामुळेच २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या निवडणुकीत तीन टक्क्यांची वाढ झाली आहे.   शुक्रवारी झालेल्या लोकसभा निवडणुकी- साठी राजूरा विधानसभा मतदार संघात ७०.०९ टक्के, चंद्रपूर ५८.४३ टक्के, बल्लारपूर ६८.३६ टक्के,वरोरा ६७.७

उन्हामुळे मतदानाची टक्केवारी घसरली???

Image
  उन्हामुळे मतदानाची टक्केवारी घसरली??? दीपक देशपांडे  चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५९.०६%मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यांतही नेहमीप्रमाणे स्त्री मतदारांनी आघाडी घेतली असून ५९.३२%मतदान केले आहे,तर पुरुष मतदारांनी केवळ ५८.८१% मतदान केले आहे. मतदार यादीत नाव न मिळणे ,एकाच कुटुंबातील व्यक्तींचे वेगवेगळ्या बुथवर नाव समाविष्ट असणे , शोधूनही नाव न मिळणे अशा अनेक कारणांमुळे मतदार ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत अनेक समस्यांना सामोरे जात मतदानासाठी घराबाहेर पडला पण मतदान न करताच माघारी फिरल्याचे वास्तव समोर आले असून शहरी भागातील मतदार उन्हामुळे मतदान केंद्रावर पोहोचलाच नाही असेही चित्र समोर आले आहे. राजकीय मंडळी दुपारी तीन नंतर सक्रिय झाली असून मतदान प्रक्रिया संपेस्तोवर ही आकडेवारी सत्तर टक्क्यांपर्यंत किंवा  अधिकही पोहोचली तर वावगं वाटू नये अशी चिन्हे दिसू लागली आहेत ,कारण नाही म्हणायला...... .....दूपारपर्यंत वाट बघणारी मंडळी दूपारनंतर ,आपली  महत्त्वाची कामे पार पाडून  हाती पडलेल्या  *त्या... श्रमपरिहारा* मुळे एकदम उत्साहीत

मूल शहरात संथपणे मतदान सुरू ,संथ मतदानाचा फायदा कुणाला?

Image
मूल शहरात संथपणे  मतदान सुरू , संथ मतदानाचा फायदा कुणाला? दीपक देशपांडे  चंद्रपूर वणी आर्णी मतदार संघातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या- मूल शहरात विविध केंन्द्रावर मतदानाला सकाळी ७ वाजता पासून सुरूवात झालेली असून दुपारी १२.३० पर्यंत विविध केंन्द्रावर २०-ते२५ टक्के पर्यंत मतदान झाले असल्याचे निर्देशनात आले आहे. मूल मधील १०१ क्रमांकाच्या मतदान केंन्द्रावर मतदान मशीन काही तांत्रीक कारणास्तव बंद पडल्याने साधारण १ते१.३० तास मतदान प्रक्रिया खोळबंली होती त्यामूळे केंन्द्रावर बरीच गर्दी दिसून येत होती. इतर केंन्द्रावर संथ गतीने  मतदान सुरू होते.  कृषी उत्पन्न बाजार समिती येथील बुथ्र क्रमांक ११० वर  ताराबाई तुकाराम कस्तुरे वय ११०यांनी मतदान केले ,  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  गांधी चौक मूल येथे नव- मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यांत काजल बारसागडे व,प्रजोती भडके यांनी केंन्द्र क्रंमाक ११६ वर तर आचल गरीपत्ते हिने केंन्द्र क्रमांक १०९बाजार समिती मूल येथे पहिल्यांदा आपल्या मतांचा हक्क बजावला.  केंन्द्र क्रमांक ११५ वर १२०० हून अधिक मतदारांची नोंदणी असून हे केंन्द्र अडचणीच्या ठिकाणी

*निवडणूक समरांगणातील लढवय्ये...२१* *तुमचे मत द्या आणि लकी ड्रॉमध्ये आकर्षक बक्षिसे जिंका*

Image
    *निवडणूक समरांगणातील लढवय्ये...२१ *  *तुमचे मत द्या आणि लकी ड्रॉमध्ये आकर्षक बक्षिसे जिंका* दीपक देशपांडे  भव्य बक्षीस: योजना...??? चंद्रपूर : देशाच्या प्रगतीसाठी, ध्येयधोरणे ठरविण्यासाठी मतदान करून आपला सहभाग लोकशाही प्रक्रियेमध्ये नोंदविणे अत्यंत महत्वाचे आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक १९ एप्रिल २०२४ रोजी २११८ मतदान केंद्रावर होणार आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘तुमचे मत द्या आणि लकी ड्रॉमध्ये आकर्षक बक्षिसे जिंका’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. विजेत्यांना बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड फोन मिळणार आहेत. मतदान केल्यानंतर मतदारांनी शाई लावलेले बोट दाखवत मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करायचा आहे. आपला फोटो अपलोड करून या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://chanda.nic.in तसेच जिल्हा परिषदेच्या https://zpchandrapur.co.in/ वेबसाईटवर फोटो अपलोड करण्यासाठी लिंक / क्यूआर कोड देण्यात आला आहे. TVS Apache RTR १४०, 4V बाईक, १.६ लाख किमतीची (RTO आणि विमा

*निवडणूक समरांगणातील लढवय्ये...२०*

Image
  *निवडणूक समरांगणातील लढवय्ये...२० * *ईव्हीएम सज्ज पण...* *दीपक देशपांडे* लो कसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी आटोपून आता उद्या १९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून लगबग पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाचे कर्मचारी नियुक्त केलेल्या मतदान केंद्रांमध्ये पोहोचून उद्या होणाऱ्या मतदानासाठीची व्यवस्था करत आहेत.मतदानासाठी निवडणुकीचं साहित्य घेऊन मतदान अधिकारी दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १३- चंद्रपूर वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाची निवडणूक १९ एप्रिल २०२४ रोजी ३६१ मतदान केंद्रावर होणार असून सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे.  लोकसभा निवडणुकीसाठी  प्रशासन पूर्णपणे तयार आहे.  चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी ७२-बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील बल्लारपूर, पोंभूर्णा , चंद्रपूर आणि मूल तालुक्यातील एकुण ३६१ मतदान केंद्रावर १४४४ मतदान अधिकारी आणि कर्मचारी सुखरूप पोहोचले असून प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांचे नेतृत्वात उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणुक अधिका