अनिश्चिततेच्या सावटाखाली जगताना भाग २.

 आताच तर कोरोनाची , राजकारणी मंडळी व राजकारणाची खरी ओळख पटू लागली आहे.

दीपक देशपांडे.

मागील लेखात आपण मागील वर्षी पावसाळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती इथपर्यंत चा प्रवास बघितला होता,आता पावसाळ्यात जर रुग्णसंख्या एवढी वाढू लागली आहे तर हिवाळ्यात जशी थंडी वाढेल तसतशी रुग्णांच्या संख्येत तिव्र गतीने वाढ होण्याची शक्यता वर्तवली गेली परिणामी पावसाळ्यात पाऊस जाता जाता येणारे गौरी गणपती चे उत्सव साजरा करण्यावर पहिल्यांदा तिव्र बंधने लादली गेली होती.

समाज व सामाजिक संस्था मदतीला धावून आले व या स्थितीत सामाजिक दायित्वाची जाण ठेऊन हे उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे केले,मात्र हे उत्सव संपतात न संपतात तो कोरोना बाधितांची संख्या घसरणीवर आली आणि बंधनांवर ढिल दिली जाऊ लागली.

काही अटी व शर्ती लागू करुन लग्नसमारंभास परवानगी दिली आणि कोरोनाचे संकट गेले नाही हे माहित असताना लोक सैराटपणे रस्त्यावर उतरले ,मागील वर्ष सहा महिने खोळंबलेले लग्न समारंभ मोठ्या थाटामाटात साजरे केले जाऊ लागले. काही प्रमाणात दसरा दिवाळी हे उत्सव बंधन पाळून साजरेे करण्यास सांगितले गेले मात्र त्याचे फारसे कुणी पालन केले पाहिजे यासाठी प्रयत्न कमी पडलेे  आणि रुग्णसंख्या कमी होत असली तरीही दूसरी लाट येणार आहे व  ती पहिल्या लाटेपेक्षाा मोठी असणार आहे  हे सांगीतले  जात असतांनाही लोक बाजारहाट व प्रवास मुक्तपणे करु लागले , मास्क पासून सामाजिक दूरी पर्यंत सारे नियम धाब्यावर बसवून प्रवास सुरू झाले ,

अपेक्षेप्रमाणे जानेवारी २०२१कसाबसा आनंददायी जातो न जातो तोच फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दूसरी लाट आली आणि आता तर घरच्या घर कुटूंब च्या कुटूंब या लाटेत बाधित होतांना दिसू लागले , बाधितच नाही तर अनेक जण मृत्युमुखी पडू लागले त्यामुळे याची भिषणता वाढू लागली ,मात्र या वेळेपर्यंत कोरोना प्रतीबंधक लस आपल्या चाचण्या पूर्ण करुन लसिकरणासाठी तय्यार होती मात्र आमची राजकारणी मंडळी ही लस व लसिकरणाची मोहीम फसवी व काही कसोट्यांवर सपशेल नापास असल्याचे दावे करु लागले आणि जनता त्यावर विश्वास ठेवत लसिकरणासाठी पुढे येण्यास उत्सुक नव्हते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ही लस घेऊन जनतेचा विश्वास प्राप्त करून लसिकरणाची मोहीम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला, मात्र केवळ राजकीय लाभ मिळविण्यासाठी काही पक्ष व काही नेतेमंडळींनी यांचा विरोध केला व या लसिचा अपप्रचार अधिक केला परिणामी लोक ही लस घेणे टाळू लागले ,मात्र लसिकरणाचे फायदे दिसू लागताच हीच मंडळी आधी लसिकरणासाठी पुढे आली तरीही जनतेत संभ्रम निर्माण करुनच.

ग्रामीण भागात शिरकाव कमी असणारा कोरोनाचा यादरम्यान ग्रामीण भागात शिरकाव असा झाला की आतापर्यंत *कुठचा करोना अन् कुठचा...? म्हणणारे आता यांच्या विळख्यात सापडले आणि चुकीचे निष्कर्ष व चुकीच्या समजूतीने औषधोपचार करण्यात अयशस्वी ठरले आणि कोरोनाची साखळी  प्रचंड वेगाने वाढू लागली ती एवढी वाढली की मागील वर्षी वर्ष संपताना आढळणारे आकडे व रुग्णांच्या यावेळी पहिल्या टप्प्यात च पार करून गेलीच नाही तर मृतांची संख्या वाढली , रुग्णालयात जागा कमी पडू लागली ,तेवढ्याच वेगाने रुग्णालये वाढवली जाताहेत परंतू तीही कमीच पडताहेत .

पुन्हा एकदा लाॅकडाऊन कडक निर्बंध घातले जाऊ लागले पण जनता ऐकून घ्यायला तयार नाही हे पाहून नियमांचे पालन करावे यासाठी विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींची ॲंटिजेन व आरटिपिसीआर चाचणी करून बाधीत रुग्णांना कोरोंटाईन करण्यात येऊ लागले, मोठ्या प्रमाणात दंडही ठोठावण्यात आला, परंतू त्यातूनही पळवाटा शोधून याचे नियम व अटी धुडकावून लावणारे महाभाग ही दिसू लागले,तर मी आणि माझे नेते यांच्या प्रयत्नामुळे हे...हे कार्य पुर्णत्वास गेल्याची प्रसिद्धी करण्याची अहमहमिका सुरू झाली.

कोविड रुग्णालय ते लसिकरणाची नावनोंदणी , ॲंम्बूलन्ससह अनेक आघाड्यांवर, समाजातील विविध घटकांना मदतीचा हात तर,नि:शुल्क भोजनाची व्यवस्था वगैरे प्रकार सुरू झाले आणि त्यांचे श्रैय लाटण्याचा प्रयत्न केला गेला. कदाचित याहीवेळी ही दूसरी लाट आता लवकरच ओसरेल परंतू तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे आणि ती यांहूनही भिषण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे ,मात्र त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत लसिकरणाची मोहीम हाती घेतली गेली आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली गेली असती तर ती लाट पूर्ण थांबवता आली नसती तरी त्याची भिषणता नक्कीच कमी करता आली असती पण आमच्या सत्ताधारी,वा विरोधी लोकांची मानसिकता लसिकरणाची मोहीम यशस्वी होऊ देत नाही आणि जनता त्यांच्या मनात भरवलेल्या भितीला बाहेर काढून लसिकरण करुन घेण्यासाठी पुढे येत नाही आणि आले तरी केंद्रावर लस उपलब्ध असतेच असे नाही परिणामी वारंवार हेलपाटे कोण मारणार म्हणत जनता लसिकरणाची मोहीम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेत नाही त्यामुळे ही तिसरी वाट थांबविणे कितपत यशस्वी होईल याबाबत प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे.

जोपर्यंत राजकीय लाभ मिळविण्यासाठी स्थानिक नेते सक्रिय सहभाग घेणार नाहीत व गाव तेथे लसिकरण हा मुलमंत्र राबवला जाणार नाही तोपर्यंत ह्यात कुणिही यशस्वी होऊच शकणार नाही ही सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे आणि राजकारण विरहित समाजकारण जोपर्यंत दिसणार नाही , सर्वपक्षीय नेते एका मंचावर उपस्थित राहून माझ्या गल्लितील, वार्डातील,गावातील, नगरातील,महानगरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील माणूस जगला पाहिजे ही भावना मनामनात रुजणार नाही तोपर्यंत सर्वसामान्य माणूस गटागटात पक्षीय बंधनात अडकणार आणि त्यामुळेच तो स्वतः सोबत इतरांचाही जीव धोक्यात घालत राहणार हे वास्तव आहे.

हीच तर खरी आमची अडचण आहे आणि तेच अनिश्चिततेचे सावट आहे, जमलं तर हेच मळभ दूर सारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला पाहिजे.नाहीतर कोरोनाची दूसरी लाट ओसरताच तिसरी वाट येईल आणि ती ओसरण्यापूर्वीच चौथ्या लाटेचा प्रवेश होऊन गेला तरीही कळणार नाही आणि आपण गमावलेल्या माणसांची गणना करणेही अशक्य होऊन जाईल.

दूसऱ्या लाटेत आलेलं संकट सगळे हेवेदावे विसरून इथेच थांबविले नाही तर........?

प्रत्येकाने विचार करावा,आणि या देशातील प्रत्येक व्यक्ती ही माझी जबाबदारी आहे असे समजून घेणे आता आपले प्रत्येकाचेच कर्तव्य आहे त्यामुळे उगाच कुणाला सल्ला देत बसण्यापेक्षा मी माझ्या परिने माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर ती क्षम्य मानून त्याची माफी मागायला तयार आहे परंतू माझ्या देशातल्या समृद्ध परंपरांचा सन्मान करीत माझ्या देशबांधवांच्या रक्षणासाठी माझ्यापरीने शक्य ती मदत करण्याचे आश्वासन देत आपण ही प्रत्येकाने यासाठी पुढे येण्याची नम्र विनंती करतोय ,जिथे जातपात धर्म, भाषा प्रांत,उचनिच , शिक्षीत अशिक्षित, स्त्री-पुरुष यांचा भेदभाव नसेल.

शांतपणे विचार करा.आपल्याला नेमकं काय हवंय.

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*