कोविड रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा निषेध.

 कोविड विलगीकरण केंद्र जेव्हा अपुऱा अन्नपुरवठा झाल्याने एकदम चर्चेत येते.......



दीपक देशपांडे.

आज दूपारच्या जेवणापासून मूलमधिल कोरोना रुग्णांना झालेल्या अपूऱ्या अन्नपुरवठ्यामुळे  निर्माण झालेल्या पेचप्रसंगानंतर मूलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांनी जिल्हा प्रशासनाच्या  या कृतीविरुद्ध   नाराजी व्यक्त केली तर नगरपरिषद चे उपाध्यक्ष नंदू रणदिवे यांनी तर चक्क कोविड रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा निषेधच केला आहे.


कोणत्याही पूर्वतयारीची शहानिशा न करता स्थानिक प्रशासनाकडून अतिशय नियोजन बद्धतेने येथील कोविड सेंटर मधील जेवणाची व्यवस्था सुरळीत सुरू असताना अचानक रित्या बदलवून  रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा मी तीव्र निषेध करीत आहे. ...नंदू रणदिवे.

 *आजपासून स्थानिक प्रशासनाची सुयोग्य अशी व्यवस्था बदलवून जेवणाचा कंत्राट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्थ समाजकल्याण विभाग मार्फत विद्यानंद रामटेके या कंत्राटदाराला देण्यात आले , त्यांनी हे कंत्राट कुणा मसराम नामक व्यक्तीला* *पेटी तत्वावर* *दिले, आजपासून हे नवीन कंत्राट लागू होणार होते. पण कुठलाही अनुभव नसणाऱ्या या नवीन कंत्राटदाराने *अपुरे जेवण* पुरवले, काही रुग्णांना तर उपाशी पोटीच कोविड सारख्या रोगाचा औषधी डोज घ्यावा लागला. ही अतिशय गंभीर बाब असून सुरळीत सुरू असलेल काम जिल्हा प्रशासनाच्या कोणत्या विशेष महत्वाकांक्षी धोरणाने बदलवल जाताय हे न समजणारे कोड आहे. या संबंधात आमचे नेते आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना या गंभीर प्रकरणाची  कल्पना देण्यात आली असून त्यांनी सदर घोळ जिल्हा प्रशासनाशी बोलून मार्ग काढून देणार असल्याचे सांगितले. समाज कल्याण अधिकारी अमोल यावलीकर यांना पण दूरध्वनीवरून कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली आहे..

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

गावातील वादातून वाघाचा शिकारी अडकला जाळ्यात!