कोविड१९प्रतिबंधात्मक लसिचा दूसरा डोज

 दीपक देशपांडे

बहुप्रतिक्षित कोविड१९प्रतिबंधात्मक लसिचा दूसरा डोज घेण्यासाठी नागरिक धावपळ करीत होते मात्र लस उपलब्ध नसल्याच्या कारणावरून त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत होते आणि पहिला डोस घेतल्यानंतर ची मुदतही संपत आल्याने शासनाप्रती नाराजी व्यक्त केली जात होती अशा स्थितीत शासनाने निर्णय घेऊन पहिला डोस घेतलेल्यांना कोविड१९लसीचादूसरा डोस तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले व त्याचाच परिणाम म्हणून आज दिनांक १३/५/२०२१ पासून ४५ पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांच्या लसिकरणाचा दुसरा डोज घेणा-याकरिता लसिकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्यात ही मोहीम सर्व लसिकरण केंद्रावर तसेच मूलमधिल मा. सा. कन्नमवार सभागृह तसेच उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे सुरु आहे. 

तरी प्रथम लसिकरण झाल्यापासून ४५ पेक्षा जास्त दिवस झालेल्या नागरिकांनी दुस-या डोज चा लाभ घ्यावा. 

लसिकरणास येतांना उपाशी पोटी येवू नये. पिण्याचे पाणी सोबत आणावे. 

सर्दी, खोकला, ताप, चव वा गंध न समजणे, थकवा जाणवणे वैगेरे लक्षण आढळल्यास नोंदणी करतांना लक्षात आणून द्यावे वा केंद्रातील वैद्यकिय अधिकारी यांचे लक्षात आणून द्यावे. 

असे आवाहन मूल नगरपरिषद चे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांनी मूल नगरपरिषद क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना तर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्ह्यातील समस्त जनतेला केले आहे.

त्वरा करा लसिकरणाचा लाभ घ्या आणि कोविड विरोधात लढाईत जिंकण्यासाठी शासनाला सहकार्य करा असे आवाहन डीडीबातमीपोर्टलच्या वतीने मी दीपक देशपांडे जिल्ह्यातील समस्त जनतेला करीत आहे.


Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

गावातील वादातून वाघाचा शिकारी अडकला जाळ्यात!