Posts

Showing posts from March, 2022

महिला दिन थाटात साजरा

Image
 * महिलांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करावा* * उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांचे आवाहन* * चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा ब्राह्मण सभेतर्फे जागतिक महिला दिनाचे आयोजन* चंद्रपूर  m2Mन्यूजब्यूरो    आजच्या महिला तसेच मुलींमधील वैचारिक शक्ती दिवसेंदिवस प्रगल्भ होतांना दिसत आहे. याचा फार मोठा प्रभाव हा समाजघटकांकडून व मुख्यत्वे शिक्षण तसेच घरच्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे ते शक्य झाले आहे. परंतू पुर्वीच्या काळात मात्र स्त्रीयांना बंधनाचे जोखड पार करुन जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना विविध गोष्टींची आवड असतांनाही पुरुषी मक्तेदारीमुळे त्याला बाजूला ठेवावी लागत असे. केवळ ‘चुल आणि मुल’ हेच तिचे विश्व बनले होते. आजही तशी परिस्थिती काही भागात सुरुच आहे. त्यामुळे महिलांची प्रगती खुंटत गेली, तिला तिचे अस्तित्वच तयार करता आले नाही. यापासून तिला सुटका हवी असल्यास मी कोण आहे  ? याचा प्रथम तिने विचार करावा व त्या अनुषंगाने प्रयत्न करावा असे आवाहन उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी केले. चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा ब्राह्मण सभेतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लक्ष्मीनारायण मंदिराच्

विद्यूत मंडळाने शेतक-यांना २४ तास अखंडीत विजेचा पुरवठा करावा. :अ.भा.ग्राहक पंचायतची मागणी*

Image
 * विद्यूत  मंडळाने शेतक-यांना २४ तास अखंडीत विजेचा पुरवठा करावा. :अ.भा.ग्राहक पंचायतची मागणी* नागपूर , चंद्रपूर  m2Mन्यूजब्यूरो         शेतामध्ये कृषी पंपाकरीता व अन्य शेतीच्या कामाकरीता नियमित विज पुरवठा नसल्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून आत्महत्या सारखे पाऊल उचलत आहे तेव्हा विद्यूत मंडळाने शेतक-यांना २४ तास अखंडीत विजेचा पुरवठा करावा अशी आग्रहाची मागणी १५ मार्च जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्याने अ.भा.ग्राहक पंचायत महाराष्ट्र व गोवा राज्याचे पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री गजानन पांडे यांनी केली आहे . श्री पांडे पुढे म्हणाले की, विद्यूत मंडळ कुठल्याही उद्योगाला २४ तास अखंडीत विजेचा पुरवठा करते, परंतु शेतक-यांना आठवडयातून तीन दिवस दिवसा तीन-चार तास व चार दिवस रात्री चार-पाच तास विजेचा पुरवठा करते तो ही खंडीत केलेला.हा सरकारचा भेदभाव असून शेतक-यांवर वारंवार अन्याय करणारा आहे. जो शेतकरी रात्रंदिवस मेहनत मजदुरी करुन अन्नधान्य पिकवितो त्यांचेवर सतत अन्याय केल्या जातो व उद्योगधंदेवाल्यांसमोर लाल कारपेट अंथरले जाते  हा भेदभाव कां ? असा सवालही ग्राहक पंचायतने उपस्थित केला आहे.          उद्योग

खास झाडीपट्टीत झाडीबोली साहित्य संमेलनाचा ढोल वाजणार*

Image
 * खास झाडीपट्टीत झाडीबोली साहित्य संमेलनाचा ढोल वाजणार* मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथे २९ वे दोन दिवसीय झाडीबोली साहित्य संमेलनाचे आयोजन ‌ * दीपक देशपांडे,मूल* २९वे झाडी बोली साहित्य संमेलन यावेळी मूल तालुक्यातील जूनासुर्ला येथे आयोजित करण्यात आले असून प्राचिन इतिहास लाभलेल्या या गावात आपल्या बोलीभाषेचा जागर करण्यासाठी आणि आपली बोलीभाषा टिकवून त्या भाषेला अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाली पाहिजे असा उद्देश ठेवून ह्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे असे प्रतिपादन लक्ष्मण खोब्रागडे यांनी मूल येथिल विश्राम गृहात घेतलेल्या पत्रपरिषदेत केले आहे. कार्यक्रम पत्रिका समोर ठेवताना या संमेलनात अनेक साहित्यिक आपली उपस्थिती दर्शविणार असून बोलीभाषा टिकवून ठेवण्यासाठी अशा संमेलनाचे आयोजन किती महत्वाचे आहे याचा प्रत्यक्ष आलेख पुढे ठेवला. या संमेलनाच्या निमित्ताने निमंत्रण पत्रिका सुद्धा खास बोलीभाषेत तयार करण्यात आली असून कार्यक्रम स्थळी चंद्रपूर जिल्हा व मूल परिसरातील मान्यवर साहित्यिक यांचे नांवे सभामंडपाच्या नावे देऊन एकप्रकारे त्यांचा सन्मान केला गेला आहे. या निमंत्रण पत्रिकेत आवतन दिले असून यां

महिला दिन व सायबर सुरक्षा सप्ताह

Image
 * महिला दिन व सायबर सुरक्षा सप्ताह* दीपक देशपांडे. आज ८मार्च , जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने व सुरू असलेल्या सायबर सुरक्षा सप्ताहानिमित्त महिलांना मार्गदर्शन व सायबर गुन्ह्यांच्या संख्येत होणारी वाढ व त्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयावर मार्गदर्शन करीत आपल्या छोट्या चुकांमुळे मोबाईल हरविण्याचा प्रकार , त्यामुळे होणारे नुकसान व आपल्या छोट्या छोट्या चुकांमुळे होणारी फसवणूक व त्यापासून सावधानतेच्या सुचना या प्रसंगी ठाणेदार सतिशसिंह राजपूत यांनी उपस्थितांना दिल्या. मूल पोलिसांनी , उपनिरीक्षक प्रशांत ठावरे यांचे मार्गदर्शन व सायबर सेलच्या मदतीने नागरिकांचे हरविलेले २८+१=२९ मोबाईल वेगवेगळ्या परिसरातून यशस्वीपणे शोधून काढले आणि आज महिला दिनाच्या निमित्ताने आणि सायबर सुरक्षा सप्ताह साजरा करीत असतांनाच त्या नागरिकांना त्यांचे २०२०-२१मध्ये हरविलेले मोबाईल परत करीत चेहऱ्यावर हास्य फुलविले. याप्रसंगी मूल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतिशसिंह राजपूत, ब्रम्हपुरी चे पोलिस निरीक्षक यादव साहेब, मूल पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रशांत ठावरे , पत्रकार दीपक देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती  होती. आज महिला