Posts

Showing posts from April, 2023

बाजार समिती निवडणूकीचा बाजार!

Image
  बाजार समिती निवडणूकीचा बाजार! बाजाराला जाऊ या,काय घडणार ते पाहू या . दीपक देशपांडे. चंद्रपूर जिल्ह्यातील १२बाजार समितीच्या निवडणुकीत प्रत्येकी १८प्रमाणे २१६ जागांसाठी निवडणूक २८ व ३० एप्रिल रोजी होऊ घातली आहे.  २७मार्चरोजी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आणि निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले.सुरुवातीला एकीकडे  नामांकनपत्र विक्री संथगतीने सुरु होती ,तर दुसरीकडे विविध राजकीय पक्ष आपापल्या पक्षाची रणनीती आणि इच्छुक उमेदवार व  कुणी कुणासोबत युती,आघाडी करायची आणि कुणी कुणाविरुद्ध दंड थोपटायचे यावर मंथन करण्यातच बराच काळ निघून गेला ,मात्र पर्याप्त निष्कर्ष काढता आला नाही .परिणामी अंतर्गत कलह उघड झाला आणि त्याची परिणिती म्हणून आपलेच आपल्याच्या विरोधात उभे ठाकलेत. आणि बेसुमार नामांकनपत्र दाखल करण्यात आले तरीही कोणाचे कोणाशी गठबंधन होणार ,कोण कुणाच्या विरोधात हे काही स्पष्ट होत नव्हते. मात्र सहकारी संस्थांच्या निवडणुकीत ज्यांनी हुशारी केली होती आणि ज्यांचेजवळ संख्याबळ अधिक आहे त्यांची सरशी होऊन आघाडी तेच घेणार हे मात्र समजत असताना पक्षांतर्गत कलहातून कोणाजवळ किती संख्याबळ हे काहीसे अस्पष्ट अस

*प्रखर राष्ट्रभक्तीचा भाव हेच भाजपाचे लक्ष्य* *कार्यकर्ता हाच पक्षाचा आधार*

Image
 * प्रखर राष्ट्रभक्तीचा भाव हेच भाजपाचे लक्ष्य आणि  कार्यकर्ता हाच पक्षाचा आधार* *भाजपाच्या स्थापना दिन कार्यक्रमात वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन* चंद्रपूर, दि. ६ : डीडीबातमीपोर्टलन्यूजब्युरो भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी सेवाभाव प्रथम आहे. त्यांच्यासाठी खुर्ची किंवा सत्ता महत्त्वाची नाही. कारण भाजपा पक्ष नसून एक परिवार आहे. अनेक राजकीय वादळांमधून वाट काढणाऱ्या भाजपापुढे देशातील प्रत्येकांत प्रखर राष्ट्रभक्तीचा भाव निर्माण करणे हेच मुख्य लक्ष्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. गांधी चौक येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद कडू, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महानगर महामंत्री राजेंद्र गांधी, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टुवार, रवींद्र गुरनुले, माजी उपमहापौर राहुल पावडे, प्रकाश धारणे, रवी आसवानी, संदीप आवारी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ना. मुनगं

सर्वसामान्यांसाठी वाळू स्वस्त! ६०० रुपये प्रती ब्रास दरात मिळणार वाळू!*

Image
* सर्वसामान्यांसाठी वाळू स्वस्त! ६०० रुपये प्रती ब्रास दरात मिळणार वाळू!* * लिलाव बंद होणार आणि आता डेपोतूनच वाळू ६०० रुपयात मिळणार* * महसूल विभागाच्या निर्णयावर मंत्रीमंडळाचे शिक्कामोर्तब * मुंबई, डीडीबातमीपोर्टल न्यूजब्युरो     राज्यातील सर्वसामान्यांसाठी स्वस्त दरात वाळू उपलब्ध करून देण्याच्या महसूल विभागाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयावर मंत्रीमंडळाने दिनांक ५/०४/२०२३ रोजी  शिक्कामोर्तब केल्याने ६०० रुपये प्रती ब्रास दरात वाळू उपलब्ध होणार आहे, तसेच यामुळे जनसामान्यांना दिलासा मिळणार असून घरांच्या किंमतीही आवाक्यात येतील. वाळू  लिलाव बंद होणार असल्याने डेपोतूनच ६०० रुपयात वाळू उपलब्ध होईल, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिली. मुंबई मंत्रालय येथील दालनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली . राज्यातील वाळू लिलाव प्रक्रियेवरुन सातत्याने अनेक तक्रारी येण्याबरोबरच अनियमिततेला आळा घालण्यासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून उपाययोजना करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी घेत राज्यात थेट नवीन वाळू धोरण आणण्याचे निश्चित केले. याच