Posts

Showing posts from January, 2023

मूल नगर परिषद अंतर्गत "नयी चेतना पहल बदल की" राष्ट्रीय मोहीम*

Image
 * मूल नगर परिषद अंतर्गत "नयी चेतना पहल बदल की" राष्ट्रीय मोहीम*  * मूल न्युजब्युरो*  दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान (DAY-NULM) नगर परिषद मुल अंतर्गत मा.मुख्याधिकारी श्री अजय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री रितेश भोयर सहायक प्रकल्प अधिकारी यांच्या उपस्थितीत “नयी चेतना :पहल बदल की” नावाची लिंग आधारीत भेदभाव दूर करण्यासाठी राष्ट्रीय Gender मोहिम राबविण्याचे ठरविण्यात आले. या मोहिमेची थिम ‘लिंग आधारित हिंसा समाप्त् करणे अशी आहे, त्या दृष्टीने राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान (DAY-NULM) नगर परिषद मुल व NRLM यांच्या समन्वयाने ULB व CLF/ALF/SHG यांच्या स्तरावर विविध उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली.          त्यादृष्टीने लिंग आधारित हिंसेबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली, सोशल मिडीयावर नियमीत लिंग आधारित हिंसेबाबत जनजागृती करण्यात आली, बचत गटातील महिलांची या मोहीमे बाबत सायंकाळी मेणबत्ती घेवुन रॅली व्दारे जनजागéती करण्यात आली अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला यशस्वी करण्याकरीता श्री विनोद येनुरकर प्रशासकीय अधिकारी

राजूरा येथे पहिल्या विदर्भस्तरीय पर्यावरण संमेलनाचे उद्घाटन*

Image
 * पर्यावरण संतुलन राखून विकासाला प्राधान्य द्यावे : सुधीर मुनगंटीवार * * राजूरा येथे पहिल्या विदर्भस्तरीय पर्यावरण संमेलनाचे उद्घाटन* चंद्रपूर : न्युजब्युरो.   देशाचा किंवा राज्याचा सर्वांगीण विकास साधत असताना पर्यावरणाचा ऱ्हास आणि  सृष्टीचक्राचे असंतुलन ही  चिंतनिय बाब असून  पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे असे स्पष्ट प्रतिपादन सांस्कृतिक कार्य तथा मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.  राजुरा येथे आयोजित पहिल्या विदर्भस्तरीय पर्यावरण संमेलनात ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुयोग धस, माजी आमदार अॅड. वामनराव चटप, अभिनेता जयराज नायर, स्वागताध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार संजय धोटे, दीपक भंवर, सचिन वाघ, युवा स्वाभीमान पक्षाचे सूरज ठाकरे, वंचित बहुजन महासंघाचे भूषण फुसे, डॉ. राजकुमार खापेकर, लताश्री वडनेरे, सतीश धोटे, महाराष्ट्र राज्य पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष बादल बेले, प्रा. डॉ. प्रीती तोटावार व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मुनगंटीवार यांच्या हस्ते ‘विमुक्त भटके व बेलदार समाज प्रवाह एक संघर्षाचा’च्या  डॉ. तोटावार लिखित

मूल तालुक्यातील गुणवंतांचा अभिनंदनीय चढता आलेख*

Image
 * मूल तालुक्यातील गुणवंतांचा अभिनंदनीय चढता आलेख*                                     दीपक देशपांडे. मूल शहर तसे आजही  उच्च शिक्षणापासून दूरच मात्र या शहरातील गुणवंतांची गरुडझेप मोठमोठ्या शहरांंतील गुणवंतांशी स्पर्धा करीत आपले आणि आपल्या कुटुंबाचेच नाही तर आपल्या शहराचे नावदेखील समाविष्ट करण्यात यशस्वी ठरवीत आहेत. कधिकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील मोजके विद्यार्थी स्पर्धा परीक्षा वा उच्च शिक्षणासाठी पात्र ठरीत होते तेंव्हाही मूलशहर त्यांच्यातील एक बनण्याचा प्रयत्न होते परंतू यश मिळेलच याची खात्री नसायची किंबहूना। मिळालेच तरीही ती व्यक्ती ,ते विद्यार्थी नौकरी शोधून या शहरापासून दूर निघून जात असत मात्र आज परिस्थिती बदलत आहे आणि उच्च शिक्षण घेऊनही तरुण आपल्या शहराकडे परतताना दिसत आहेत. मूल शहर व्यापारी द्रुष्टिकोनातून आर्थिक उलाढालीचे व चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांना जोडणारे मध्यवर्ती शहर ठरले असल्याने मूल शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे परिणामी इथे शैक्षणिक बदल होऊ लागला आहे. येथील विद्यार्थी शिक्षणाच्या नवनवीन क्षेत्रात आपली क्षमता अजमावून बघत आहेत आणि त्यात यशस्वी होऊन तालुक्याच्य

माऊंट कॉन्व्हेन्ट येथील असपाक सय्यद यांचे सुयश

Image
  माऊंट कॉन्व्हेन्ट येथील असपाक सय्यद यांचे सुयश मूल,न्युजब्युरो. दिनांक ११ जानेवारी २०२३ ला स्वामी विवेकानंद विद्यालय मुल येथे पार पडलेल्या ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मधे माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मूल येथील विज्ञान व गणित शिक्षक अस्पाक सय्यद यांनी विद्यार्थ्यांची गणितातील भिती दूर व्हावी व त्यांच्या मनात गणिता बद्दलची आवड निर्माण व्हावी हा विचार करून  प्राथमिक विभाग मधे शिक्षक प्रतिकृती विभागात गणितीय साहित्य बनवून प्रथम क्रमांक पटकाविला.  या कार्यक्रमात  शशिकांत धर्माधिकारी , विष्णुकांत टेकाडे, वैभव खांडरे  नितीन घरोटे आणि इतरांची प्रमुख  उपस्थीती होती.  शाळेचे मुख्याध्यपक रवी कावळे ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले व समोर होऊ घातलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीकरीता शुभेच्या दिल्या आहेत ,तसेच नगरातील शिक्षण क्षेत्रात त्यांच्या प्रतिकृतीची चर्चा आहे.     दीपक देशपांडे, संपादक.

*युवक दिन हा तरुणांसाठी संकल्प दिन व्हावा !*

Image
 *युवक दिन हा तरुणांसाठी संकल्प दिन व्हावा !* *वन तथा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन* * चंद्रपूर :न्युजब्युरो. * ‘ हम दुनिया को जानते है.. पर खुद को नही पहचानते है...’ अशा परिस्थितीतून सध्या तरुणाई जात आहे. त्यामुळे तरुणाईने आपल्यात व्यापक बदल घडविणे गरजेचे आहे. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन अर्थात युवक दिन हा केवळ कथांपुरता मर्यादीत राहु नये, तर तो संकल्प दिन व्हावा असे आवाहन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय येथे आयोजित स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त  युवा संकल्प पर्व कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, नामदेव डाहुले, अनिल डोंगरे, विवेक बोढे, अमित गुंडावार, स्वाती देवाळकर, मिथिलेश पांडे, इमरान खान, श्रीनिवास जंगम, ओम पवार उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात मुनगंटीवार म्हणाले की, बुद्धीच्या कसोटीवर प्रत्येकाने कार्य केले पाहिजे. स्वामी विवेकानंद यांनी सांगितल

गोंडवाना विद्यापीठात नवीन सिनेट सदस्य नियुक्ती.*

Image
  गोंडवाना विद्यापीठात नवीन सिनेट सदस्य नियुक्ती.* गडचिरोली, न्युजब्युरो.   गोंडवाना विद्यापीठात नुकतीच सिनेट निवडणूक पार पडली असून त्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 5, यंग टीचर्स पॅनल चे 4 व सेक्युलर पॅनल चा 1 उमेदवार निवडून आले होते. विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिल च्या निवडणुका लवकरच होणार आहेत, त्यातच राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी नवीन नऊ सिनेट सदस्यांची आपल्या कोट्यातून नियुक्ती केली आहे, यात निवडुणुकीत चांगली टक्कर देत पराभव पत्कराव्या लागलेल्या अभाविप स्वयंसेवक स्वरूप तारगे गडचिरोली व वरोरा येथील विदेशातील शिक्षणाचा दीर्घ अनुभव असणारे डॉ सागर वझे यांचा समावेश आहे,  गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाचे अध्यक्ष प्रचीत पोरेड्डीवार व चंद्रपूर येथील सुप्रसिद्ध चार्टर्ड अकोऊंटं पियुष मामीडवार यांचा सुद्धा समावेश आहे, तसेच सिनेट निवडणुकीत महत्वाची भूमिका असलेल्या संजय रामगिरीवार यांना सुद्धा सिनेट मेम्बर चा मान मिळाला, या व्यतिरिक्त सिनेट निवडणुकीत सीट न मिळू शकलेल्या गडचिरोली येथील नितीन चीचघरे यांनाही हा बहुमान भेटला तसेच वर्धा येथील शशीभूषण वैद्य, चंद्रपूर येथील विजय बदकल, न

बेंबाळ येथे सरपंच तथा उपसरपंच यांनी पदभार स्वीकारला

Image
  *बेंबाळ येथे सरपंच तथा उपसरपंच यांनी पदभार स्वीकारला* मूल:-न्युजब्युरो. मूल तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अति महत्त्वाचे समजले जाणाऱ्या बेंबाळ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे सरपंचासह सात सदस्य निवडून आले होते.   सरपंचासह   एकूण  ११ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन पॅनलचे सरपंचासह सात सदस्य होते. थेट जनतेतून आलेले सरपंच चांगदेव  केमेकार यांनी आज सरपंच पदाचा पदभार स्वीकारला. उपसरपंचाच्या शर्यतीत सत्ता पक्षाकडून देवाची ध्यानबोईवार व विरोधी गटातून राकेश दहीकर यांनी दावेदारी केली होती. अपेक्षित उपसरपंचाच्या निवडीमध्ये परिवर्तन पॅनलच्या सरपंचासह सातही सदस्यांनी एकमताने देवाजी ध्यानबोईवार यांची उपसरपंच म्हणून निवड केली.  देवाजी ध्यानबोईवार यांना एकूण आठ मते तर राकेश दहीकर यांना चार मते मिळाली. सरपंच पदाच्या निवड समितीचे अध्यक्ष सरपंच होते तर निरीक्षक अधिकारी तिजारे व ग्राम विकास अधिकारी आकुलवार हे उपस्थित होते.  उपसरपंचाची निवड अतिशय शांततेत पार पाडली असून गावकऱ्यांनी पुढील वाटचालीसाठी सरपंच व उपसरपंच तसेच इतर निवडून आलेल्या सदस्यांनाही शुभेच्छा दिल्या. दीपक देशपांडे,

सर्वधर्म ग्रंथ दिंडीने दुमदुमली ऊर्जानगरी*

Image
 * सर्वधर्म ग्रंथ दिंडीने दुमदुमली ऊर्जानगरी * * सर्वधर्म मित्रपरिवारातर्फे भोजनदान* ऊर्जानगर (चंद्रपुर) : न्युजब्युरो   वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज व वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिन महोत्सवानिमित्त श्री गुरूदेव सेवा मंडळ ऊर्जानगरच्या वतीने स्नेहबंध सभागृह येथुन सर्वधर्म ग्रंथदिंडी व भव्य रामधून मिरवणूक ऊर्जानगर वसाहतीच्या मुख्य मार्गाने काढण्यात आली.ग्रंथदिंडीत मंडळाचे कार्यकर्ते,पदाधिकारी, सभासद व विद्यामंदिर व मातोश्री विद्यालयाचे लेझीम पथक आणि उर्जानगर वसाहतीतील महिला-पुरूष गुरूदेवप्रेमी सहभागी झाले होते.ग्रंथ दिंडीत मराठी, हिंदी, उर्दु, ईंग्रजी ग्रामगीता, भारताचे संविधान भगवदगीता, बुद्ध आणि त्याचा धम्म, गुरूग्रंथसाहेब, मोक्षमार्गप्रकाश ईत्यादी ग्रंथ ठेवले होते. ग्रंथदिंडीचा रथ वैराग्यमुर्ती गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजीच्या सुंदर तैलचित्राने सजविला होता.  ऊर्जानगरच्या चौका-चौकातील परिसर स्वच्छ करून सुशोभित रंग रांगोळ्या काढून सर्व संतांचे फोटो ठेवले होते. दिंडीला ठिकठीकाणी अल्पोपहार व सौदामिनी चौक येथे दिपक मडावी व वंश निकोसे व मित्र परिवार कडून  काफीचे वि

डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने" या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण*

Image
 *" डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने" या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण* नागपूर : न्युजब्युरो. टेक्नोविजन मीडिया ॲण्ड कम्युनिकेशनच्या माध्यमातून प्रकाशित होऊ घातलेल्या देवनाथ गंडाटे लिखित "डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने" या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा अनावरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला.  नागपुरातील वनामती सभागृहात आयोजित छोटेखाणी कार्यक्रमात डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीव्हन्स कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विधिज्ज्ञ अॅड. फिरदोस मिर्झा, तरुण भारत डिजिटलचे संपादक शैलेश पांडे, उच्च न्यायालयाचे एडवोकेट आनंद देशपांडे, डॉ. कल्याणकुमार, वरिष्ठ पत्रकार आनंद आंबेकर उपस्थित होते. डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया माध्यमातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकातून माहिती व तंत्रज्ञानाची सुलभतेने ओळख होईल, अशा शुभेच्छा राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी दिल्या. यावेळी सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनीही कौतुक केले.  यावेळी विदर्भातून विविध जिल्ह्यातून आलेल्या डिजिटल मीडिया प्रतिनिधींची उपस्थिती होती. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा लवकरच आयोजि

माध्यम कुठलेही असो, कायद्याची चौकट पाळा ! राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे

Image
  माध्यम कुठलेही असो, कायद्याची चौकट पाळा ! राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांचे ‘डिजिटल मीडिया’वरील कार्यशाळेत प्रतिपादन नागपूर, ता. ९ :न्युजब्युरो.   प्रिंट, ऑडियो, व्हिज्युअल, डिजिटल ही माध्यमांची प्रक्रिया आहे. कालानुरुप माध्यमांचे स्वरूप बदलत चालले. माध्यम कुठलेही असो, प्रत्येक माध्यमांनी कायद्याची चौकट पाळायलाच हवी. विश्वासर्हता निर्माण करावी. म्हणजे लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभावर जनतेचा विश्वास राहील, असे प्रतिपादन राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी केले. डिजिटल मीडिया पब्लिशर ॲण्ड न्यूज पोर्टल ग्रीव्हन्स कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या वतीने टेक्नोविजन मीडिया ॲण्ड कम्युनिकेशन यांच्या सहकार्याने ‘डिजिटल मीडिया आणि कायदेशीर तरतुदी या विषयावर वनामती येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, संस्थेचे सदस्य ॲड. कल्याण कुमार उपस्थित होते. यावेळी माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी अनेक उदाहरणांचा दाखला देत माध्यमांनी चौकट कशी पाळावी, याबाबत विवेचन केले. कुठल्याही माध्यमांना प्रारंभीचा

गाडगेबाबाच्या शैक्षणिक विचारातून समाजात क्रांती झाली* .... *मा. दिलीप सोळंके*

Image
  गाडगेबाबाच्या शैक्षणिक विचारातून समाजात क्रांती झाली* .... *मा. दिलीप सोळंके* ऊर्जानगर (चंद्रपूर):-न्युजब्युरो.   वैराग्यमुर्ती गाडगेबाबानी किर्तनाच्या माधमातून शिक्षणाचे महत्व सांगितल्यावर बहुजन समाज शिक्षणाकडे वळला. संत कोणाला म्हणावे याबाबत सखोल विचार प्रकट केले. शिक्षणाशिवाय समाजाचा तारनोपाय नाही. गाडगेबाबांनी कीर्तनातून सांगितलेल्या शैक्षणिक विचारातून बहुजन समाजात शिक्षणाची क्रांती झाली असे विचार दिलीप सोळंके यांनी मांडले ते श्री गुरूदेव सेवा मंडळ, ऊर्जानगरच्या वतीने "स्नेहबंध" सभागृह येथे वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजाचा ५४ व्या व वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबांचा ६६ व्या स्मृतीदिन महोत्सवा निमित्य आयोजित व्याख्यानमाला कार्यक्रमात बोलत होते.  कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत अध्यक्ष प्रशांत दुर्गे यांनी मंडळातर्फ राबविलेल्या वर्षभरातील विविध उपक्रमाची माहिती दिली. महिला व पुरूष गटाची राज्यस्तरीय भजन स्पर्धेकरीता निवड झाल्याची माहिती दिली. अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष अशोकराव धामणे होते. उपस्थित मान्यवराच्या हस्ते उदघाटन झाले.  मुख्य वक्ते म्हणुन प्रा. डॉ रत्नाकर भेलकर, न

सडेतोड, पतंग उडवा..... पण ...।।

Image
  सडेतोड *पतंग उडवा..... पण  विजवाहिन्यांपासून...जीव सांभाळून...जीव....... वाचवून*  दीपक देशपांडे. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने सर्वत्र थाटली असून दिवसेंदिवस आकाशातही रंगबिरंगी पतंगाची गर्दी वाढत आहे. या आनंदाच्या उत्सवात विघ्न येऊ नये याकरिता महावितरणने सर्व संक्रांतप्रेमींना पतंग उडवितांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. पतंग उडविण्याचा मोह लहानापासून तर मोठयापर्यत सर्वांनाच होतो व हा मोह त्यांना टाळता येत नाही मात्र शहरी भागात वीज वितरणाच्या लघु व उच्च दाबाच्या वाहीन्यांचे जाळे पसरलेले असते आणि अनेकदा पतंग उडवितांना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबांवर अडकतात, अश्यावेळी काहीजण तो अडकलेला पतंग काठ्या, लोखंडी सळाखी किंवा गिरगोट यांच्या माध्यमातून काढण्याचा पयत्न करतात. अश्याप्रसंगी अनेकदा जिवंत विद्युत तारेला स्पर्श होण्याची शक्यता असते त्यामुळे अडकलेला पतंग काढण्याचा त्यांचा हा प्रयत्न त्यांच्या जीवावर उठू शकतो.  असा अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. बरे

*सडेतोड* *समित्या गठनाचे भिजतघोंगडे*

Image
 * सडेतोड * * समित्या गठनाचे भिजतघोंगडे * * दीपक देशपांडे* शासनस्तरावर शासनाच्या विविध योजनांच्या व्यवस्थित संचालनासाठी अशासकीय सदस्यांची नेमणूक करुन त्यांचे संचालन केले जाते ,या समित्यांवर बहुतेक सत्ताधारी पक्षाच्या क्वचितच विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध करुन    दिली जाते. मात्र आता  नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर पाच महिन्यांचा कालावधी लोटत चालला तरीही जून्या बरखास्त केलेल्या वेगवेगळ्या योजनांच्या नवीन समित्या अद्याप तरी कागदावरच आहेत की काय ?असा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकतीच एक बातमी वाचनात आली आणि वास्तविक स्थिती चे अवलोकन केले असता एकीकडे नव्या समितीत नियुक्ती व्हावी, यासाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू आहे तर दुसरीकडे या योजनेच्या लाभासाठी प्रयत्न करणाऱ्या निराधारांची फरफट सुरू आहे. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य कृती निवृत्तीवेतन योजना या दोन राज्यस्तरावरील योजनांद्वारे, तर केंद्र पुरस्क्रुत इंदिरा गांधी वृद्धापकाळ विधवा आणि दिव्यांग योजनांद्वारे निराधारांना दरमहा एक हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. पूर्वीच्या समित्या बरखास्त केल्यानंतर सध्या तहसीलदार

बेंबाळ येथील घराला आग, लाखोचे नुकसान

Image
  बेंबाळ येथील घराला आग, लाखोचे नुकसान मूल ,न्युजब्युरो मूल तालुक्यातील बेंबाळ येथील अमोल मुरलीधर पगडपल्लिवार यांचे  घर शॉर्टसर्किट मुळे जळाल्याची घटना दिनांक ६/०१/२०२३ रोजी दूपारी बारा वाजताच्या दरम्यान घडली. वायरिंग शॉर्ट झाल्यामुळे ही घटना घडली असल्याचे सांगण्यात आले. या घटनेत पगडपल्लिवार यांचे घरी असलेले टीव्ही, कुलर, बेड, कपाट, पैसे, कपडे, सोने यांसह घरगुती साहित्य जळून खाक झाले. घर मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अंदाजे चार पाच लाखापर्यंतचे नुकसान झाल्याचा प्राथमिक माहिती  आहे. ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच शेजारी आणि गावातील नागरीक धाऊन आले आणि आग विझविण्यात यश आले. माञ तोपर्यंत अमोल मुरलीधर पगडपल्लिवार यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे पगडपल्लिवार यांनी गटातून काही पैसे घेतले होते, ते ही या आगीत जळून खाक झाल्याची माहिती आहे.

पत्रकारांनी सत्यनिष्ठ राहून निर्भिडपणा जोपासावा - समाजमन पत्रकारांच्या पाठीशी*

Image
 * पत्रकारांनी सत्यनिष्ठ राहून निर्भिडपणा जोपासावा - समाजमन पत्रकारांच्या पाठीशी* * मान्यवरांनी केला पत्रकारांच्या कार्याचा गौरव  राजुरा पत्रकार संघाचा पत्रकार दिन सोहळा  राजुरा,न्युजब्युरो                 राजुरा तालुका पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार दिनाचा सोहळा उत्साहात पार पडला. सोहळ्याची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन व शिवाजी विद्यालयाच्या स्वागत गीताने झाली. या कार्यक्रमात राजुरा, कोरपना व जिवती येथील पाच गणमान्य पत्रकारांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.                   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुभाष धोटे होते. प्रमुख अतिथी शेतकरी नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार ॲड. संजय धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अविनाश जाधव, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप जैन, डॉ.उमाकांत धोटे, मुख्याध्यापक प्रभाकर बोभाटे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते महियार गुंडेविया स्मृ

*पत्रकार हा समाज आणि शासनातील दुवा*

Image
 * पत्रकार हा समाज आणि शासनातील दुवा* * पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडू लडके यांचे प्रतिपादन* * चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साधेपणाने साजरा* चंद्रपूर :न्युजब्युरो.   लोकशाही देशात पत्रकारितेला मोठे स्थान आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला ओळखले जाते. त्यामुळे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांवर मोठी जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणिव ठेवून प्रत्येक पत्रकाराने समाजातील चुकीच्या गोष्टी शासनापुढे मांडाव्या. त्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा प्रयत्न करावा. पत्रकार हा खऱ्या अर्थाने समाज आणि शासनातील दुवा असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडू लडके यांनी केले.   मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार संघ भवनात शुक्रवारी ६ जानेवारीला आयोजित पत्रकार दिन समारंभात अध्यक्षस्थानाहून लडके बोलत होते. यावेळी चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री मुरलीमनोहर व्यास, माजी अध्यक्ष श्री चंद्रगुप्त रायप

सडेतोड.?* *शेतकऱ्यांचे सरकार..?*

Image
 * सडेतोड * *शेतकऱ्यांचे सरकार..?* दीपक देशपांडे. * गेल्या कित्येक वर्षांपासून सत्तेवर असणाऱ्या शासनकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ चालविला आहे, कारण दरवर्षी कधी धानाच्या खरेदीवर ५००₹/क्विंटल, तर कधी ७००₹/क्विंटल तर यावर्षी----  *सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता प्रति हेक्टर 15 हजार रु. या प्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेतल्याबद्दलची माहिती समोर आली आहे.* हा  निर्णय ऐकून पूणे मुंबई तील आमच्याआप्तस्वकीय ,मित्रपरिवार व नातेवाईकांनी जणू आम्हाला लाटरी लागल्याच्या अविर्भावात फोन करून आमचे अभिनंदन केले तर आमच्या काही सहकाऱ्यांनी शासन १५०००₹कधी जमा करणार अशी विचारणा केली आणि मला हा लेखनप्रपंच करावा लागला, त्यासाठी मी मुद्दाम आजचा * पत्रकार दिनाचा * मुहूर्त निवडला . * शासनाकडून  धान उत्पादनाकरिता प्रति हेक्टर १५ हजार रु. या प्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेतल्याबद्दलची* बातमी खरचं अभिनंदनीय आहेच पण....त्यातीलच एक अट अशी आहे की, *सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना* ही बाब आपण सोयिस्करपणे आपण विसर

मराठी ही हृदयापर्यंत पोहोचणारी भाषा*

Image
 * मराठी ही हृदयापर्यंत पोहोचणारी भाषा* * सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन* मुंबई दि. ५ न्यूजब्यूरो   मराठी भाषा ही जगातील सर्वाधिक मौल्यवान भाषा आहे. सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी ही संस्कारांची भाषा जनाजनाच्या मना मनात पोहोचविण्यासाठी हे विश्व मराठी संमेलन अतिशय महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडीया, वरळी येथे आयोजित मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनात आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोकमत मुंबई चे संपादक अतुल कुलकर्णी, झी 24 तास या वृत्त वाहिनीचे संपादक निलेश खरे,साम टीव्ही मराठी चे प्रसन्न जोशी, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन चे संपादक अभिजित कांबळे, निवेदक अजित चव्हाण उपस्थित होते. यावेळी बोलतांना मंत्री श्री मुनगंटीवार म्हणाले  महाराष्ट्रात जन्म झाल्याचा मला अभिमान आहे. मराठी भाषेने दिलेला वारसा हा जगातील दहा प्रमुख वारसापैकी एक आहे.विश्व मराठी संमेलन हे मराठी भाषा सर्वंदूर पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. यनिमित्ताने मराठी भाषेचे महत्

उद्या पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार राजुऱ्यात.

Image
  उद्या पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार राजुऱ्यात.  राजुरा पत्रकार असोसिएशन द्वारा पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन . राजुरा ,न्यूजब्यूरो राजुरा पत्रकार असोसिएशन राजुरा द्वारा उद्या दिनांक ६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी संकुल राजुरा येथे पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी राजुरा तालुक्यात विशेष कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.            कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वने  सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाषभाऊ धोटे, विशेष उपस्थिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी विजय गौडा, अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजसिंह पवार, पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रीना जनबंधू, तहसीलदार हरीश गाडे, गटविकास अधिकारी हेमंत भिंग

राजूरा येथे पत्रकार दिनाचे आयोजन

Image
  राजूरा येथे पत्रकार दिनाचे आयोजन दीपक देशपांडे अ.भा.मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नित राजूरा पत्रकार संघाचे वतीने पत्रकारदिनी ६जानेवारी शुक्रवारी सकाळी ११वाजता पत्रकार दिनाचे आयोजन राजूरा पत्रकार संघाचे आवारात करण्यात आले असून मान.हंसराज भैय्या अहिर राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी मागासवर्गीय आयोग यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.  याप्रसंगी विविध क्षेत्रातील बरीच मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत व काही पत्रकारांना विविध पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

सडेतोड......

Image
  सडेतोड दीपक देशपांडे. मूल शहरात टुल्लू पंपचा वापर केल्याने बऱ्याच ठिकाणी नागरिकांना पाणी पुरवठा योग्य प्रकारे होत नसल्याची बाब उघड केली गेली. ही बातमी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारे पुढे आणली जात होतीच परंतू आज नगरातील एका वार्डातील सर्वसामान्य महिलांनी पुढे येत नगरप्रशासनाला निवेदन सादर केल्याने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आजपर्यंत अशा मागण्या राजकीय अस्तीत्व सिद्ध करण्यासाठी केल्या जात होत्या तशीच ह्या मागणीलाही  तसा अप्रत्यक्ष राजकीय वरदहस्त आहेच . परंतू सत्य परिस्थिती विषद करणारी आणि जनतेला आश्वासनांच्या भुलथापांची झुल पांघरणाऱ्यांची पोलखोल करणारी मागणी असे म्हंटले तर.....। गत काही काळापासून मूल नगरीत २४×७पाणी पुरवठा करण्यासाठी मोठा निधी खर्च केला गेला आहे, त्याची वारंवार वाच्यताही केली गेली होती पण वास्तविकता वेगळीच आहे. २४×७तर सोडाच पण दररोज एकवेळ किमान तासभरसुद्धा एकसमान वेगात पाणीपुरवठा होत नाही आणि त्यातच ही एक नवीनच समस्या पुढे आली आहे ,ही जर समस्या असेलच तर आता त्यावर उपाययोजना कोणी करायची? नगरात प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे आणि निवडणूक आयोगाने अजूनही निवडणुकांचा कार्यक्र