सिंदेवाही पोलिसांनी केली अवैध दारू विरोधातकार्यवाही

 दीपक देशपांडे

सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत जंगल परिसरातील विविध ठिकाणी गेल्या महिनाभरापासून सतत अवैध हातभट्टी मोहा दारू विरोधात अभियान सुरू केलेले आहे.


    सदर अभियानाअंतर्गत आज दिनांक ११/०५/२०२१ रोजी मौजा  , सिंदेवाही तसेच पेंढरी अशा विविध ठिकाणी गावातील अवैध देशी दारू विक्रेते यांचे घरी तसेच जंगल परिसरामध्ये सिंदेवाही पोलिसांनी सर्च अभियान राबवून हातभट्टी मोहा दारू तसेच देशी , विदेशी दारू उद्ध्वस्त व जप्त  करून दारूबंदी कायद्यांतर्गत आरोपींविरोधात एकूण ४ गुन्हे नोंद केले आहेत.



यामध्ये , मोहा दारू,  , देशी तसेच विदेशी दारू व मोपेड मोटार सायकल असे एकूण *१,०८,०००* / -  रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केलेला आहे.

सिंदेवाही पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीचे परिसरातील अनेक नागरिकांनी स्वागत व अभिनंदन केले आहे.तर सिंदेवाही पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे अवैध दारू गाळणारे तसेच विक्री करणारे गुन्हेगार यांचेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. 

सदरची कार्यवाही माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मिलिंद शिंदे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री योगेश घारे , सफारी नेरल वार , वो हवा सोनुले, राहुल रहाटे, मंगेश श्रीरामे, ज्ञानेश्वर ढोकळे, सतीश निनावे, अरविंद मेश्राम  यांनी केलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*