Posts

Showing posts from May, 2022

शेतकरी समस्या सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन.

Image
  बियाणे /खतांच्या गुणवत्ता नियत्रंणासाठी व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत असणार कार्यरत तालुका स्तरावर असेच कक्ष स्थापन करण्यात यावे,          चंद्रपूर जिल्हा अ.भा.ग्राहक पंचायत ची मागणी चंद्रपूर दीपक देशपांडे. चंद्रपूर जिल्ह्यात २०२२-२३ चा खरीप हंगाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व कीटकनाशके मिळणे व त्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) स्थापन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी बियाणे, खते व इतर बाबींचा काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांनी थेट नियंत्रण कक्षात तक्रार द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. नियंत्रण कक्ष सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत कार्यरत असणार आहे. *बियाणे खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठ्याबाबत शेतकऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर अडचणी येतात. या अडचणींचा विचार करून अशा अडचणी ऑन कॉल व प्रत्यक्षरीत्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) काम करण

महावितरणच्या वतीने ग्राहक हित जोपासण्यासाठी....

Image
  महावितरणने वर्षभरात पोहोचवली २६ हजार ६७६ ग्राहकांच्या जीवनात वीज ३ हजार ३८९ कृषिपंपांचीही तृष्णा भागली उच्चदाब वीज वितरण प्रणाली (HVDS) अंतर्गत  बसविले ४ हजार ८ रोहित्रे  या रोहित्रांच्या माध्यमातून एकंदरीत ४ हजार ५६ शेतशिवारात वाहू लागले खळखळून  पाणी चंद्रपूर ,दीपक देशपांडे.     महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात १ एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या वर्षभराच्या कालावधीत नविन २६ हजार ६७६ ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आल्या. चंद्रपूर मंडळात १४ हजार ९८३ तर गडचिरोली मंडळातील ११ हजार ६९० ग्राहकांना वीजजोडण्या देत महावितरणच्या माध्यमातून या सर्वांच्या अंगणात वीजरूपी प्रकाश पोहचला.     ग्राहकांच्या जीवनात प्रकाश पोहोचविण्याचे काम पार पाडले आहे. एप्रिल महिन्याच्या २ तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी ६ गरीब घरी प्रकाशाची किरणे पोहचवित महावितरणने आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. दिवसा सूर्यादेवाने भरभरून दिलेला प्रकाश तर  त्याच सूर्याप्रकाशामुळे  चंद्रपूर सारख्या उष्ण शहरात सोसाव्या लागणाऱ्या उन्हाच्या झळा. चंद्रप्रकाशाने न्हाऊन निघालेल्या कित्येक रात्री चंद्राला धन्यवाद देत..तर कृष्णपक्षाच्या अंधाऱ्या

ग्राहक हितासाठी असेही ठराव.

Image
  पेट्रोल, डिझेल 'जीएसटी'च्या प्रभावात आणा   मृत ठेवींचा उपयोग राष्ट्रीय विकासात करा  ९ कोटी ग्राहकांची रक्कम पडून. ऑनलाइन गेम, हिंसक दृश्यमालिकांवर बंदी आणा अ खिल भारतीय ग्राहक पंचायतीची      विदर्भ प्रांत बैठकीत  मागणी दीपक देशपांडे नागपूर नागपूर : पेट्रोल व डिझेल या महत्त्वाच्या वस्तूंना जीएसटीच्या प्रभावात आणावे, बँकांमध्ये किंवा आर्थिक संस्थांमध्ये पडून असलेल्या मृत ठेवींचे विकासात परिवर्तन करावे तसेच ऑनलाइन गेम व लहान मुलांच्या मनोविश्वावर परिणाम करणाऱ्या हिंसक दृश्यमालिका यावर बंदी आणावी, अशी मागणी रामदासपेठ हनुमान मंदिरात पार पडलेल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या विदर्भ प्रांत बैठकीत करण्यात आली. पहिला ठराव वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनमानसाचा आणि त्यासाठी कारणीभूत असलेल्या कारणांचा शोध घेण्यासाठी झाला. त्यात पेट्रोलियमजन्य पदार्थ पेट्रोल व डिझेलच्या गगनाला भिडणाऱ्या किमतीबद्दल आणि त्यामुळे वस्तूत होणाऱ्या किमती वाढीवर चर्चा झाली. यासंदर्भात मांडण्यात आलेल्या ठरावात केंद्र सरकारने पेट्रोलियम पदार्थ जीएसटी' अंतर्गत आणले तर पेट्रोल व डिझेलच्या किमती येऊ शकता