Posts

Showing posts from June, 2021

बहुमतातील लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर करून पायउतार करण्याची वेळ कां यावी?*

Image
 * बहुमतातील लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर करून पायउतार करण्याची वेळ कां यावी?* * दीपक देशपांडे.* मूल तालुक्यातील बेंबाळ या गावात भाजपने २०१७ साली तत्कालीन काॅंग्रेसचा पूर्ण सफाया करीत जनतेतून सरपंच निवडीसह पूर्ण सदस्य विजयी करीत एकहाती सत्ता हस्तगत केली. लोकनियुक्त सरपंचा करुणा उराडे यांचे नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीच्या कामकाजाला सुरुवात झाली , दिवस, महिने, वर्षं, पूढे सरकू लागली. सारेच कसे व्यवस्थित सुरू होते.गाव विकासाची कामे करत पुढे सरकत होता..... सारेच कसे आलबेल सुरू होते आणि.... .... आणि अचानक असे काय घडले असेल की ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की सदस्यांनी लोकनियुक्त सरपंचा करुणा उराडे यांचे विरोधात जिल्हाधिकारी यांचेकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला. दिनांक १८/०६/२०२१ रोजी मान. तहसिलदार डॉ.रविंद्र होळी यांचे उपस्थितीत या विषयावर बेंबाळ ग्रामपंचायत कार्यालयात चर्चा होऊन १०विरुद्ध ०मतांनी हा अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला.१सदस्य तटस्थ राहिले.  * भाजपसाठी हा विजयी क्षण,की विरोधकांनाही एक नवी संधी?* हा प्रश्न आपसूकच पुढे आला.कारण.... हा प