Posts

Showing posts from August, 2021

निवडणुकीच्या आखाड्यात उतरतांना ..!

Image
  निवडणुकीच्या आखाड्यात उतरतांना...... उमेदवार आणि मतदार दोघांचीही ताकद पणाला लागणार?                               भाग१                       दीपक देशपांडे. सध्या महाराष्ट्रात  मनपा,नपा. नप.चे निवडणूक वारे जोराजोराने वाहू लागले आहेत. कुणी म्हणेल हे काय? महाराष्ट्र राज्यात वर्षभर कुठल्या ना कुठल्या निवडणूका होतच असतात ,मग यात नवीन ते काय? आम्ही तर म्हणतोय नवीन असल्याशिवाय आम्ही तो विषय चर्चेला घेतच नाही. आता या निवडणुकीत नवीन असणार आहे प्रभागांची फेररचना व सोबत असणार आहे "दाखव तुझी क्षमता" म्हणत एक प्रभाग एक उमेदवार ,एक नेतृत्व. मागील निवडणुकीत एका सक्षम उमेदवारांसोबत दूसरा नवा चेहरा वा नवखा व्यक्ती विनासायास निवडणूक लढवित विजयी होऊन जायचा ,पण आता प्रत्येक प्रभागात एक सक्षम व दमदार नेतृत्व आणि तेवढ्याच दमदार व्यक्तीला  उमेदवार बनून मैदानात उतरावे लागणार आहे. या निवडणुकीत राखीव जागा देखील कमी करण्यात आल्याने टेकू घेऊन निवडून येणे सहजसाध्य राहीले नाहीये. आणि महिलांची सत्तेतील भागीदारी वाढऊन ती ५०%होणार असल्याने प्रत्येक वार्डात नेतृत्व करायला पुढे येणाऱ्या महिला आणि सक्षम नेतृत

आम्ही कर्जाची परतफेड करणे सोडून द्यायचे काय?

Image
शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया . दीपक देशपांडे. महा(शिवा)विकास आघाडी सरकार सरकार सत्तेवर आले आणि शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला मात्र हा निर्णय घेत असतांनाच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची नाराजी ओढवून ही कर्जमाफी करणे अवघड जाऊ नये म्हणून नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,०००पन्नास हजार रुपयांपर्यंत ची मदत खात्यात जमा करण्यात येईल अशी एक आश्वासनात्मक तोफ डागली गेली, आणि शेतकरी वर्ग ह्या तोफेच्या आवाजाने च खुशीने नाचू लागले. गरीबश्रीमंत शेतकऱ्यांना चक्क दोन लाखांपर्यंत ची कर्जमाफी प्रकरणे महिनोंमहीने सुरुच राहिलीत आणि हेतूपुरस्सर पन्नास हजार रुपयांपर्यंतची सहाय्यता राशी मात्र देण्याच्या आश्वासनाकडे डोळेझाक करीत ते आश्वासन म्हणजे तोफ नव्हती तर ते आश्वासनांचे गाजर होते हे अतिशय बेमालूमपणे लोकांच्या मनावर बिंबवले. त्यानंतरही शेतकरी हिताचे निर्णय घेताना पुरपिडितांना मदतीचे आश्वासन, शेतकऱ्यांना बोनसची हमी, दुष्काळी परिस्थितीत सहाय्यतेचे आश्वासन सारेच काही केवळ आणि केवळ आश्वासनांचे 🥕 गाजरच ठरले. कर्जमाफीचा निर्णय राबवितानाच

भारताचा ७५वा स्वातंत्र्य दिन आणि आनंदवनाचा हरीत संकल्प

Image
 * आनंदवनातील भन्नाट वृक्षारोपण * * दीपक देशपांडे* आज भारताच्या ७५व्या स्वातंत्र्या दिनाच्या निमित्याने खूप चांगला कार्यक्रम आनंदवन येथे साजरा करण्यात आला. साधारणपणे तीन वर्षा पूर्वी आनंदवन ने वृक्षारोपण करायचा ठाम निर्णय घेतला , त्यावेळी श्री.सुधीर मुनगंटीवार वनमंत्री होते व ते या कार्यक्रमाला हजर होते आणि या वृक्षारोपणा ला ' ' अटल घन वन ' हे नाव सरकारी परिपत्रक काढून देताना आनंदवन ला त्याचे श्रेय देण्यात आले.  तेव्हा पासून आज पर्यंत जवळ जवळ ४३,००० हजार झाडे लावण्यात आलीत व त्यातील फक्त २% झाडे जगली नाहीत. पण बाकीच्या ९८% वृक्षारोपणा मुळे एक छान जंगल तयार झाले आहे.  आज आनंदवन येथे जे वृक्षारोपण झाले व त्यात ७५ रोपं लावण्यात आले ती रोपे आनंदवनातील ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या कडून लावण्यात आले. एवढेच नव्हे तर लागवड करणाऱ्या त्या त्या कार्यकर्त्यांचे नाव पण त्या त्या रोपांना देण्यात आले.  अगदी नावाच्या पाटी सहित . आता आधी लावलेल्या वृक्षारोपणाला  दोन वर्ष होऊन जे काही जंगल निर्माण झाले आहे त्यात नीलगाय, हरणे , मोर , ससे, कोल्हे आणि रानडुक्कर यांचे दर्शन होऊ लागले आहे.एवढेच नाह