Posts

*अखिल भारतीय साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी पद्मश्री नामदेव कांबळे तर विदर्भ प्रांत अध्यक्ष म्हणून ऍड लखनसिंह कटरे यांची निवड...*

Image
 *अखिल भारतीय साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी पद्मश्री नामदेव कांबळे तर विदर्भ प्रांत अध्यक्ष म्हणून ऍड लखनसिंह कटरे यांची निवड...* महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत कांबळेंसह अविनाश पाठक (उपाध्यक्ष), ऍड लखनसिंह कटरे, ऍड सचिन नारळे आणि मोहिनी मोडक (कार्यकारिणी सदस्य) आणि प्रकाश एदलाबादकर (विशेष निमंत्रित सदस्य) या वैदर्भीयांचा  समावेश नागपूर..१ मे. .  दीपक देशपांडे  अखिल भारतीय साहित्य परिषदेची वर्ष  २०२४-२५ या वर्षासाठी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी आणि विदर्भ प्रांत कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली असून वाशिम येथील ज्येष्ठ मराठी साहित्यिक *पद्मश्री नामदेव कांबळे* यांची महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे तर विदर्भ प्रांत अध्यक्षपदी गोंदिया येथील पोवारी बोलीचे साहित्यिक *ऍड. लखनसिंह कटरे* यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत अध्यक्ष नामदेव कांबळे यांच्यासह उपाध्यक्ष अविनाश पाठक (नागपूर), कार्यकारिणी सदस्य म्हणून  ऍड लखनसिंह कटरे (गोंदिया), ऍड सचिन नारळे (नागपूर), मोहिनी मोडक (अकोला) यांची तर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आ

*आँनलाईन सेवा केंद्रातील अनागोंदी कारभाराविषयी तहसीलदार मृदूला मोरे यांना निवेदन,ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल शाखेचा पुढाकार.*

Image
 *आँनलाईन सेवा केंद्रातील अनागोंदी कारभाराविषयी तहसीलदार मृदूला मोरे यांना निवेदन* ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल शाखेचा पुढाकार. *मूल, दीपक देशपांडे* मूल तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्रचालक शासकीय योजनांसह वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ग्राहकांकडून शासनाने निर्देशीत केलेल्या दरपत्रकानुसार  शुल्क आकारणी न करता मनमानी पद्धतीने शुल्क आकारणी करुन ग्राहकांची फसवणूक व लुट करीत असल्याच्या तक्रारी ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या मूल तालुका शाखा मूल कडे मागील कित्येक दिवसांपासून येत आहेत. त्या तक्रारीची दखल घेत ग्राहक पंचायत पदाधिकारी यांनी तालुक्यातील वेगवेगळ्या आपले सरकार आँनलाईन सेवा सुविधा केंद्राला  तसेच विविध ग्रामपंचायतीच्या सुविधा केंद्राला भेट देऊन ग्राहकांना येणाऱ्या अनुभवांची नोंद घेतली आणि खात्री पटल्यानंतर  तहसीलदार मूल यांना  अशोक मैदमवार ,उपाध्यक्ष  मूल तालुका शाखा मूल  यांच्या नेतृत्वाखाली एक  निवेदन सादर केले . त्यात विषय:-१.आपले सरकार सेवा केंद्रात ग्राहकांची लुट थांबविण्यासाठी सेवा शुल्क दरफलक लावणे बंधनकारक करणेबाबत. २.ग्रामपंचायत स्तरावरील आँनलाईन सेवा केंद्राच

*००- क्रांतिकारी निर्णय -००*

Image
 *००- क्रांतिकारी निर्णय -००*   *Supreme Court : खटल्यांची माहिती मिळणार व्हॉट्सॲपवर ; सर्वोच्च न्यायालयाचे डिजिटल पाऊल* दीपक देशपांडे  सर्वोच्च न्यायालयाने आज डिजिटायझेशनच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकताना संबंधित खटल्यावर कधी सुनावणी होईल? तो खटला कधी दाखल करण्यात आला? याची माहिती व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विधिज्ञांना पाठविण्यात येईल अशी घोषणा केली आहे. यामुळे न्यायालयीन कामकाजाच्या प्रक्रियेत मोठी सुधारणा होईल तसेच कागदाची देखील बचत होईल. सर्वोच्च न्यायालयाने तयार केलेल्या 'इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी (आयसीटी) सर्व्हिसेस'सोबत व्हॉट्‍सॲपला जोडण्याची घोषणा सरन्यायाधीशांनी आज एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान केली. सरन्यायाधीशांनी या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा व्हॉट्सॲप क्रमांकदेखील शेअर केला. *आदेश, निकालही कळणार* सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यांची नोंद आहे असे वकील आणि याचिकाकर्ते यांना संबंधित खटल्याची सुनावणी कधी होईल? तसेच तो खटला नेमका कधी दाखल करण्यात आला? महत्त्वाचे आदेश आणि निकाल यांचा तपशील व्हॉट्‍सॲपवरून पाठविण्यात येईल. बार कौन्सिलच्या

कृषी महाविद्यालय मुल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सोळावी बैठक संपन्न

Image
  कृषी  महाविद्यालय मूल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सोळावी बैठक संपन्न  मूल २९: दीपक देशपांडे  कृषी  महाविद्यालय मूल द्वारा आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सोळावी बैठक दिनांक २९ एप्रिल २०२४ रोजी ग्रामपंचायत मारोडा  ता. मूल येथे संपन्न झाली. या प्रसंगी शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मूल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यत्वे “ कृषी पूरक व्यवसाय” या विषयावर चर्चा करण्यात आली.  यामध्ये सर्वप्रथम डॉ. अर्चना बोरकर, विषयतज्ञ कीटकशास्त्र, यांनी मधुमक्षिका पालन तसेच रेशीम कीटक संगोपन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. हे व्यवसाय शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकतील असे त्यांनी सांगितले. त्यांनी वरील व्यवसायांकरीता शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या विविध सवलतींबद्दल सांगितले. तसेच येणाऱ्या उपलब्ध बाजारपेठे बद्दल माहिती दिली. यावेळेस वरील कुठलाही व्यवसाय सुरू करण्याअगोदर त्याची पूर्णपणे माहिती घेणे व योग्य संस्थांमार्फत त्याबद्दलचे प्रशिक्षण घेणे फार गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. उद्यानविद्या  शास्त्रज्ञ  डॉ. स्वप्नील देशमुख

संजय फ्लेम्स मूलच्या विरोधात अखेर तक्रार दाखल !

Image
  संजय फ्लेम्स मूलच्या विरोधात अखेर तक्रार दाखल !  दिनांक २मे रोजी दस्तावेजासह उपस्थित राहण्याबाबत मृदूला मोरे   तहसीलदार मूल यांनी दिल्या सुचना. दीपक देशपांडे  गॅस सिलिंडर वितरणाबाबत अनियमितता आणि एजन्सी चालकाच्या मनमानी ला कंटाळून ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी व शोषणमुक्त सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल च्या वतीने मूलमधील गॅस एजन्सी संजय फ्लेम्सच्या मनमानी व दोषपूर्ण व्यवस्थेबाबत एक बातमी    Ddbatmiportalm2m वर दिनांक २१/०४/२०२४रोजी  *संजय फ्लेम्सची मनमानी!  मूलमध्ये गॅस सिलिंडरचा  काळाबाजार???*  * एजन्सीवाले मस्त!सिलिंडर फस्त!!ग्राहक त्रस्त !!!* https://ddbatmiportalm2m.blogspot.com/2024/04/blog-post_63.html या मथळ्याखाली प्रसिद्ध केली होती.त्यात दि.२२/०४/२०२४च्या सायंकाळपर्यंत खुलासा मागितला होता. ही बातमी प्रसिद्ध होताच दुसऱ्या दिवशी सकाळी एजन्सी धारक सुधीर मेघराजानी यांनी फोनवर आमचे सोबत संपर्क साधला आणि कंपनीकडून सिलेंडर पुरवठ्यात अनियमितता आणि एजन्सी मधील कामगारांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराचे कारण पुढे करत नवीन कामगारांना ग्राहकांचे

*अल्कोहोलिक्स् अँनॉनिमस् (ए.ए.) समृद्ध समूहाचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा!*

Image
  *अल्कोहोलिक्स् अँनॉनिमस् (ए.ए.) समृद्ध समूहाचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा!* चंद्रपुर :-दीपक देशपांडे    चंद्रपूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उर्जानगर कोंडी येथे आज दि. २७ एप्रिल २०२४ रोज शनिवारला सांय. ७:०० वा. अल्कोहोलिक्स् अँनॉनिमस् समृद्ध समूह, दुर्गापुरचा दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.* *सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोषभाऊ पारखी व दुर्गापुर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक लताताई वाढीवे मैडम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.* *अल्कोहोलिक्स् ॲनॉनिमस् म्हणजे अनामिक मद्यपी, ही पुरूष व स्त्रियांची एक संघटना आहे. ह्यामधील सभासद आपले व्यक्तिगत अनुभव एकमेकांना सांगतात ज्यामुळे सर्व सभासदांचे मानसिक धैर्य वाढते व नवजीवनाची आशा निर्माण होते* *अशा तन्हेने सभासद आपले स्वतःचे तसेच एकमेकांचे प्रश्न सोडवतात आणि दारूपासून दुर राहतात. या संघटनेत सामील होण्यास फक्त एकच अट आहे की, दारूच्या रोगातुन मुक्त होण्याची सभासदाची इच्छा असली पाहीजे. ए.ए. च्या सभासदत्वासाठी कसलीही वर्गणी किंवा देणगी आकारली जात नाही.*

*निवडणूक समरांगणातील लढवय्ये..२५,स्पर्धेचा निकाल*

Image
*निवडणूक समरांगणातील लढवय्ये...२५ * स्पर्धेचा निकाल मूल ,चंद्रपूर,दीपक देशपांडे    मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा , मतदानाचा सेल्फी ,  रिल्स् ,  पोस्टर्स ,  मिम्स्.          स्पर्धेचा निकाल जाहीर                                                                                           लोकसभा सार्वत्रिक निवडणूक  – २०२४ अंतर्गत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान केल्याचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स आणि मिम्स् स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यात सहकार्य केले. या स्पर्धांचा निकाल जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ च्या माध्यमातून नुकताच घोषित करण्यात आला आहे. सन२०१९ च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी असल्यामुळे यावर्षी २०२४ मध्ये मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह निर्माण व्हावा, लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने