Posts

Showing posts from March, 2024

: *ब्रेकिंग* *ही लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची* प्रतिभा धानोरकर

Image
*ब्रेकिंग* *ही लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची* प्रतिभा धानोरकर मूल दीपक देशपांडे लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटनासाठी  मूल शहरात आगमन होताच स्थानिक  गांधी चौकात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन प्रचार कार्यालयाचे  उद्घाटन प्रसंगी बोलताना *ही लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची* आहे त्यामुळे  पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपापसातील भेदभाव विसरुन एकदिलाने प्रचार करुन महाविकास आघाडीचे उमेदवार यांचे पाठीशी उभे राहून मला भारताच्या सर्वोच्च सभागृहात आपली सेवा करण्याची संधी द्यावी त्यासाठी १ल्या क्रमांकाचे बटन दाबून मतदान करण्याचे आवाहन याप्रसंगी बोलताना रात्री उशिरा प्रतिभा धानोरकर यांनी केले. प्रतिभा  धानोरकर यांचे मूल तालुका प्रचार कार्यालयाचे आज दिनांक ३१मार्च रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता उद्घाटन स्थानिक काॅंग्रेस भवन मूल येथे उद्घाटन करण्यात आले , याप्रसंगी कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यकर्ते संवाद कार्यक्रमात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत,माजी आमदार देवराव भांडेकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष

निवडणूक समरांगणातील लढवय्ये!

Image
  निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....१. दीपक देशपांडे  १३-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी १५उमेदवार दंड थोपटून समरांगणात उतरले आहेत , यापैकी केवळ ३ महिला उमेदवार म्हणून रिंगणात आहेत तर १२पुरुष उमेदवार रिंगणात आहेत. टक्केवारी काढायची ठरवलीच तर केवळ २०%. एकीकडे महिला व पुरुषांना समसमान अधिकारांची मागणी केली जात असतांना  देशातील महिला ( राखीव  ) मतदारसंघाची गोष्ट थोड्या वेळासाठी बाजूला ठेवली तरी उर्वरित  मतदारसंघात समसमान संधी  असतांना या निवडणुक समरांगणात महिलांनी पुढाकार घेऊन निवडणूक लढण्याची तयारी कां करु नये? असा साधा सोपा सरळ प्रश्न विचारला गेला होता,त्याची आठवण झाली म्हणून हे लिहिणे गरजेचे वाटत आहे. सत्ता आणि संपत्ती च्या विरोधात समरांगणात उतरलेल्या या १५ही उमेदवारांची या क्षेत्रात स्वतःची अशी ओळख असावी,ती त्यांच्या कार्यावरुन असा बऱ्याच मंडळींचा समज असावा,आहे ,पण तुमच्यासोबत कोण आहेत?हा प्रश्नही बऱ्याचदा तुमच्याकडे बघण्याचा सर्वसामान्य  जनतेचा दृष्टीकोन बदलायला भाग पाडतो, हे विसरून चालणार नाही. या निवडणुक काळात तुम्ही व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात काय करता?,काय बोलता ,कसे बोलता

:*चंद्रपूर लोकसभा १५उमेदवार निवडणूक रिंगणात*

Image
*चंद्रपूर लोकसभा १५उमेदवार निवडणूक रिंगणात! निवडणूक चिन्ह वाटप.* *दीपक देशपांडे मूल* चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी काल दिनांक  ३०रोजी उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले असून एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज परत घेतला नाही.. त्यामुळे  या सर्वांना निवडणूक चिन्ह वितरीत करण्यात आले.... या चिन्ह वाटपात  फार गंमतीदार असा विचित्र योगायोग बघायला मिळतोय, बघाच  .......कुणाच्या वाट्याला आलाय हात,कुणी हातात घेतलीय बॅट,कुणी कुणाच्या स्वप्नांवर चालवला रोडरोलर ,कुणी वाजवली शिटी तर कुणी आणलाय गॅस सिलिंडर ,कुणी हत्तीवर स्वार तर  या दलदलीत ही कुणी फुलवलाय कमळ ,कुणी अंगठी घालून तर कुणी फळांची बास्केट घेऊन येतोय तर कुणी टायर घेऊन येतोय तर कुणी  कोट घालून तर कुणी आटो रिक्षा घेऊन शेवटी कुणी पेन आणि निब घेऊन... सप्तरंगी उधळण करण्याचा प्रयत्न करणार....शेवटी आपल्यालाच हे वृत्त लिहायचे आहे ह्याचे भान ठेऊन....  कुणी दूरदर्शन संचावर दाखवतोय आतापर्यंत च्या घडामोडी तर कुणी आरी ने कापायला निघालाय सगळीच स्वप्नं आपली आणि इतरांचीही.. मतदार राजा जागा हो , तुझ

*आंधळ्या प्रशासनाची ही गोंधळी गाथा!*

Image
 *आंधळ्या प्रशासनाची ही गोंधळी गाथा!* * लुटारु लुटताहेत, सर्वसामान्य हतबलतेने लुटवून घेताहेत? * दीपक देशपांडे मूल  आँनलाईन आपले सरकार सेवा  (सीएससी) केंद्रातून बेकायदेशीर वसुली-??? मूल तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर अनेक ठिकाणी सीएससी सेंटरला मंजुरी मिळालेली असून त्याची संख्या  शंभराहून अधिक असून या सीएससी सेंटरमधून शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजनासाठी के. वाय. सी त्याच बरोबर ऑनलाइन दाखले व अनेक कायदेशीर दस्तावेज मिळतात . कारण डिजिटल इंडियाचा तो पायाच आहे. या दस्तऐवजांसाठी ग्राहक सेवा केंद्र  शेतकऱ्यांची लूट करीत असून एका केवायसीसाठी शंभर रुपये चार्ज आकारला जात असल्याची माहिती पुढे आली आहे, मात्र काही मिळविण्यासाठी काही गमवावे लागतेअसे म्हणत    * लुटारु लुटताहेत, सर्वसामान्य हतबलतेने लुटवून घेताहेत? * हे म्हणने खरे ठरत आहे,    त्यामुळे    शासकीय योजनांसाठी अर्ज करणाऱ्यांचे हाल होत असून, डिजिटल इंडियाचा हा पायाच ढासळत चालला आहे आणि प्रशासन त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नसल्याच्या अनेक  तक्रारी   नागरिक करीत आहेत .        म्हणूनच तर आम्ही म्हणतोय , *आंधळ्या प्रशासनाची ही गोंधळी गाथा!

कृषि महाविद्यालय मूल येथे हत्तीरोग निर्मूलन अभियान अंतर्गत औषधी वाटप.

Image
  कृषि महाविद्यालय मूल येथे हत्तीरोग निर्मूलन अभियान अंतर्गत औषधी वाटप. मूल,दीपक देशपांडे  मूल : राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत कृषि महाविद्यालय, मूल येथे दिनांक २८ मार्च २०२४ रोजी हत्तीरोग निर्मूलन व त्यावरील उपायाचे आयोजन करण्यात आले होते.  राज्यातील पाच जिल्ह्यांना हत्तीरोंगाची लागण होण्याची शक्यता असल्याने, त्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रमा अंतर्गत नागरिकांना घरोघरी तसेच विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात जाऊन प्रतिबंधात्मक औषधीचे वाटप करण्यात येत आहे. ही मोहिम  भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नांदेड या ५ जिल्ह्यांत  राबविली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून कृषी महाविद्यालय,  मूल येथे प्रतिबंधात्मक औषधीचे वाटप करण्यात आले. हत्तीरोग निर्मूलन व त्यावरील उपाय कृषि महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. हत्तीरोग निर्मूलन व त्यावरील उपायाचे आयोजन करण्याचा उद्देश म्हणजे लोकांना हत्तीरोगाची लागन होऊ नये व लोकांमध्ये हत्तीरोगांबद्धल गैरसमज निर्माण होऊ नये हा होय.       डॉ. लाडे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्ण

*तुटक्या स्वप्नांची फुटकी वलयांकित वास्तू! मूलचे छ. शिवाजी महाराज व्यापारी संकूल*

Image
 *बिग ब्रेकिंग* *तुटक्या स्वप्नांची फुटकी वलयांकित वास्तू! मूलचे छ. शिवाजी महाराज व्यापारी संकूल* *लोकार्पण होऊन अवघे दोन महिने होतात न होतात तोच.....* *दीपक देशपांडे मूल* करोड रुपये म्हणजे काय? हा प्रश्न एखाद्या गावखेड्यातील माणसाला विचारुन बघा!त्यांच्या संपूर्ण कुटूंबाची आयुष्यभराची कमाई सुद्धा एवढी होणार नाही अशी रक्कम!म्हणजे करोड. अशा करोडो रुपयांची लागत लावून उभारलेली वास्तू म्हणजे मूलचे *छ.शिवाजी महाराज व्यापारी संकूल* अजून ना  त्याचा कुणी वाली आहे ना कुणी रखवाला.  अशा छ.शिवाजी महाराजांच्या   नावाने उभारलेल्या  या  संकूलाची तथाकथित तोडफोड , नासधूस, विद्रुपीकरण ऐन छ.शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला घडावे ,हा  केवळमात्र योगायोग असणे अशक्यच आहे,हे विसरुन चालणार नाही. *जनतेचा पैसा जनतेच्या हवाली करुन पालकमंत्री तर मोकळे झाले मात्र याची निगा राखण्याची जबाबदारी जेव्हा आपल्यावर आली तेंव्हा आपणच जर शांत राहिलो तर....?, की मला काय त्याचे म्हणत आपणही मूग गिळून गप्प राहायचे. ही वास्तू पूर्ण होऊन नुकतेच २६जानेवारीला त्यांचे लोकार्पण तर केल्या गेले आहे मात्र त्याचे गाळे लिलाव प्रक्

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात अर्जाच्या छाननीनंतर १५ उमेदवार वैध....

Image
  चंद्रपूर लोकसभा मतदार संघात अर्जाच्या छाननीनंतर १५ उमेदवार वैध.... दीपक देशपांडे  १३चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज दिवसाखेर छाननी नंतर १५ उमेदवार मैदानात शिल्लक आहेत. *दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*   *✍️Ddbatmiportalm2m✍️*

*चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार ??*

Image
* चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार ??* *वंचितच्या बेलेंमुळे फायदा कुणाला? प्रतिभाताई धानोरकर की सुधीर मुनगंटीवार...!!??* नामांकन अर्ज सादर करण्याची मुदत संपली . दीपक देशपांडे मूल, चंद्रपूर   * चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता ३६उमेदवारांचे एकूण ४८अर्ज* *शेवटच्या दिवशी २९ उमेदवारांचे ३७ नामनिर्देशन पत्र दाखल*  १३ – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरिता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (२७ मार्च) २९ उमेदवारांनी ३७ नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अर्ज भरणा-या एकूण उमेदवारांची संख्या ३६ तर दाखल नामनिर्देशनपत्रांची एकूण संख्या ४८ झाली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात मंगळवारी २६ मार्च रोजी ७ उमेदवारांनी ११ अर्ज दाखल केले होते. २०२४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्व.खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेची उमेदवारी शेवटच्या क्षणी जाहीर केलेली असून त्यांनी  प्रचंड मोठी रॅली काढत आज दिनांक २७ मार्च २०२४ रोजी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे , एका दृष्टीने

*मूल येथे सूपरफास्ट गाड्यांना थांबा द्या, ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल शाखेची मागणी*

Image
 * मूल येथे सूपरफास्ट गाड्यांना थांबा द्या, ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल शाखेची मागणी* दीपक देशपांडे मूल. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल  हे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर असून ,मूल ही तांदळाची मोठी बाजारपेठ आहे.  येथे वनसंपदा व गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असल्याने या नगरीचे महत्व फार मोठे आहे. मूलपासून गडचिरोली ४०किमी,तर चामोर्शी २७किमी अंतरावर असून सिंदेवाही २७किमी अंतरावर आहे तर पोंभुर्णा सुद्धा २८किमी अंतरावर असून सावली तर अवघ्या १२किमी अंतरावर आहे ,म्हणजेच हे एक मध्यवर्ती ठिकाण असल्याचे वेगळे सांगण्याची गरज नाही. मूल येथून  महाराष्ट्रातील वडसा, गोंदिया येथे,तर आंध्रप्रदेश व तेलंगणा येथे खरेदीसाठी व्यापारी मंडळी मोठ्या प्रमाणात  येजा करीत असतात  तर आंध्रप्रदेश कर्नाटक राज्यात कामाच्या शोधात मजूरही जात असतात तर छत्तीसगड , मध्यप्रदेश मधून मजूर इकडे कामासाठी येत असतात परिणामी  मूल शहरातून जाणाऱ्या सूपरफास्ट रेल्वेगाड्या जसे की, तिरुपती सुपरफास्ट एक्स्प्रेस , बल्लारपूर जबलपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस,यशवंतपूर कोरबा एक्स्प्रेस या गाड्या मूलमधून जात असल्याने या गाड्यांना मूल

*‘पेडन्यूज’ वर राहणार लक्ष*

Image
  *‘पेडन्यूज’ वर राहणार लक्ष* दीपक देशपांडे  * ‘मोबदला म्हणून रोख स्वरुपात किंवा वस्तु स्वरुपात किंमत देऊन कोणत्याही प्रसार माध्यमात (मुद्रण व इलेक्ट्रॉनिक) प्रसिध्द होणारी कोणतीही बातमी किंवा विश्लेषण’ अशी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने पेडन्यूजची व्याख्या केली आहे. सदर व्याख्या भारत निवडणूक आयोगाने सर्वसाधारणपणे स्वीकारली असून निवडणूक कालावधीत जिल्ह्यात प्रसारीत होणा-या पेडन्यूज वर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या (एम.सी.एम.सी.) माध्यमातून लक्ष राहणार आहे. निवडणूक कालावधीत माध्यमात प्रसारित होणारी वृत्त ही उमेदवाराच्या बाजूने काही मोबदला घेऊन प्रसारित करण्यात येत असतील, अशी शंका समितीला आल्यास अथवा तशी समितीकडे कोणी तक्रार केल्यास त्या वृत्तासंबंधी संबंधित उमेदवाराला नोटिसीव्दारे एम.सी.एम.सी समिती खुलाशाची विचारणा करू शकते. जर समितीला संबंधितांचा खुलासा मान्य झाल्यास त्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. मात्र समितीला त्याबाबत खुलासा मान्य न झाल्यास संबंधित वृत्त हे पेड न्यूज आहे, असे गृहीत धरून तो खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जातो. जिल्हास्तरीय समितीचा निर्णय उमदेवारास

*होलिकाधीश रंगराव तळकुटे विश्वविद्यापीठ मूल चा भव्यदिव्य पदवीप्रदान सोहळा*

Image
 *होलिकाधीश रंगराव तळकुटे विश्वविद्यापीठ मूल चा भव्यदिव्य पदवीप्रदान सोहळा* दीपक देशपांडे  *होळीचा सण आपल्याकडे खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. होलिका दहनासोबत लोक आपल्या मनातील दुःख, नैराश्य, वाईट विचार जाळून टाकतात. आज या दिवशी सर्वांना चांगल्या शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस आनंदी करा. होळीच्या अग्नीत जळू दे दु:ख सारे, तुमच्या आयुष्यात येऊ दे, आनंदाचे क्षण सारे..* त्यासाठीच आम्ही घेऊन आलोय, *भव्य पदवीप्रदान समारंभ* *होलिकाधीश रंगराव तळकुटे विश्वविद्यापीठ मूलचा पदवीप्रदान सोहळा* मूल नगरीमधील, गुणवंत,प्रज्ञावंत, कलावंत, कीर्तीवंत ,नामवंत, यांच्या  कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी पदवीप्रदान समारंभ आज दिनांक २५/०३/२०२४ रोजी दुपारी ठिक १२वाजता धुळवडीच्या शुभमुहूर्तावर साजरा होत आहे  या सोहळ्यात आपण अगत्याने आपापल्या घरी बसून आँनलाईन सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. *हेच निमंत्रण आणि हाच सोहळा...* या सोहळ्यात खालील मान्यवर मंडळींना, ढोलताशांच्या गजरात, धुळवडीच्या रंगांच्या उधळणीसह पाण्याची  गंगा वाहवत वडा पुरणाच्या मेजवानीत *पाणी वाचवा* चा संदेश देत ,जाळलेल्या झाडांमुळे झालेली

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ अखेर प्रतिभा धानोरकरच काँग्रेसच्या उमेदवार !

Image
 *बिग ब्रेकिंग* चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ अखेर प्रतिभा धानोरकरच काँग्रेसच्या उमेदवार ! अखेर आमचेच वृत्त  व माहिती खरी ठरली. दीपक देशपांडे गेल्या पंधरा दिवसांपासून चंद्रपूर मतदारसंघात लोकसभेच्या उमेदवारीवरून   सुरु असलेल्या  "तिकिट"नाट्याला आज पूर्णविराम मिळालाय.विरोधकांना "विजय" मिळवून देण्यासाठी सुरु असलेले "मनसुबे" गारद करीत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी उमेदवारी मिळवलीय. काँग्रेस कडून नुकतीच त्यांच्या  नावाची घोषणा करण्यात आली.  याबाबत आम्ही कालच वृत्त प्रकाशित केले होते व ते खात्रीलायक  वृत्त आज खरे ठरले आहे., यादरम्यान हे वृत्त असे कां प्रकाशित केले म्हणून विचारणा करणारे काही कमी नव्हते , त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देता देता आमची पुरेवाट होतं होती आणि कुणावरही विश्वास ठेवू नये असे क्षणभर वाटू लागले होते . मात्र   चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीवरून अक्षरशः रान पेटविण्यात आलं होत. आमदार प्रतिभा धानोरकर यांची प्रबळ दावेदारी असतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पक्ष संधी देईल तर आपली लोकसभा निवडणूक लढवू, असे भाष्य केले होते.यानंतर  त्या

*जिल्हाधिका-यांचेकडून मूल येथील निवडणूक व्यवस्थेची पाहणी*

Image
 *जिल्हाधिका-यांचेकडून मूल येथील निवडणूक व्यवस्थेची पाहणी*  *स्ट्राँग रुम व चांदापूर फाट्यावरील निगराणी पथकाला भेट* मूल,दीपक देशपांडे  दि. २३ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या अनुषंगाने  चंद्रपूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून जिल्हा प्रशासनाने सर्वत्र निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. या व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी शनिवारी मूल येथील स्ट्राँग रुम तसेच गडचिरोली सीमेवर असलेल्या चांदापूर फाट्यावरील स्थायी निगराणी पथकाला (एस.एस.टी) भेट दिली. १३ – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक १९ एप्रिल २०२४ रोजी होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात निवडणुकीसंदर्भात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या मूल येथील उपविभागीय कार्यालयातील स्ट्राँग रुमची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी मूलचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार मृदूला मोरे (मूल), प्रियदर्शनी बोरकर (बल्लारपूर), मुलचे उपविभागीय पोलिस अधिकारी एस. एस. भगत, पोलिस

बाईक रैली,जल पूजन आणि मानवी श्रृंखला करुन जल दिवस* *आयोजित*

Image
  *रामाला तलाव संरक्षण व संवर्धन संघटनेच्या वतीने बाईक रैली,जल पूजन आणि मानवी श्रृंखला करुन जल दिवस* *आयोजित*  चंद्रपूर,दीपक देशपांडे.       चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक रामाला तलावाचे संरक्षण करण्यासाठी स्थापित झालेल्या रामाला तलाव संरक्षण व संवर्धन संघटनेच्या वतीने जागतिक जल दिनाचे आयोजन शुक्रवार दि २२ मार्च २०२४ रोजी उत्साहात करण्यात आले. सकाळी १० वाजता गांधी चौक येथुन रामाला तलाव पर्यंत बाईक रैली काढण्यात आली. तलावात जल पूजन करण्यात आले ,तलावाच्या काठावर मानव श्रृंखला करुन,वाचवा - वाचवा रामाला तलाव वाचवा, जल है तो कल है, आदि घोषणा देण्यात आल्या.  या प्रसंगी संयोजक मनोज जुनोनकर म्हणाले रामाला तलावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि प्रदुषण होत आहे, तलाव दिवसें -  दिवस नष्ट होत आहे , या तलावाने शहरातील भूगर्भा चा जलस्तर ठीक आहे , जलस्त्रोतांचे संरक्षण करण्याची जवाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे, जिल्हाधिकारी महोदयांनी रामाला तलाव वाचविण्यासाठी तातडी ने उपाय योजना करणे आवश्यक आहे.     संयोजक प्रा डाॅ. जुगलकिशोर सोमाणी म्हणाले चंद्रपूर शहरात पूर्वी एकुण सहा तलाव होते, पांच तलावात लोकांनी अतिक्रमण

नवनियुक्त उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी भगत यांची पत्रकारांनी घेतली भेट

Image
 *नवनियुक्त उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी भगत यांची पत्रकारांनी घेतली भेट*   दीपक देशपांडे  मूल तालुका पत्रकार संघाचे वतीने नवनियुक्त उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी भगत यांची औपचारिक भेट घेऊन मूल तालुक्यातील वेगवेगळ्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली , याप्रसंगी मूल तालुक्यातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था व नवीन भागातील घरफोड्या वा चोरीचे प्रकाराबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली व शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम, उपाध्यक्ष युवराज चावरे ,सचिव विनायक रेकलवार, चंद्रकांत मनियार व दीपक देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी मूल विषयी आपला अनुभव कथन करताना एकंदरीत मूल तालुका शांतताप्रिय असल्याने काम करताना आनंद वाटेल असे मत उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी भगत यांनी व्यक्त केले व  मूल तालुक्यातील विविध संघटना, वेगवेगळे पत्रकार संघाचे पदाधिकारी, भेट देऊन गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले व आपलेही सहकार्य लाभेल अशी अपेक्षा केली तसेच आम्हीही पूर्ण सहकार्य करु असे आश्वासन दिले. *दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*   *✍️ Ddbatmiportalm2m ✍️*

*रेतीतस्करीला लगाम घालण्यासाठी पुन्हा एक धाडसत्र*

Image
 *रेतीतस्करीला लगाम घालण्यासाठी पुन्हा एक धाडसत्र* *सावली पोलिसांची कारवाई; एकूण १६ लाखांवर मुद्देमाल जप्त* दीपक देशपांडे  मूल पासून अवघ्या १२किलोमिटरवर असलेल्या सावली तालुक्यातील उसेगाव वैनगंगा नदी घाटावर अवैध्य रेतीची वाहतूक अनेक दिवसापासून सुरू होती. परंतु संबंधित विभाग डोळेझाक करीत असल्याचे चित्र दिसत होते. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका  सुदर्शन यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये वैयक्तिकरीत्या अवैध्य रेतीची वाहतूक करणाऱ्या रेती माफियाच्या विरोधात कारवाई करण्याचा धडाका सुरू केलाआहे. दोनच दिवसांपूर्वी मूल तालुक्यातील गोंडसावरीत अंधारी नदिघाटातून रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या तिनं हायवासह एक बोलेरो आणि एक पोकलेन मशिनसह दिड करोडहून अधिकच्या वस्तू जप्त करण्यात पुढाकार घेतला होता . त्यात  दि. २२ मार्चला सकाळी नऊच्या सुमारास सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी गस्त टाकली असता तीन रेतीने भरलेली ट्रॅक्टर आढळून आले, त्यात एमएच३४ एपी ०१२७ सुनील केशव बोमनवार राहणार सावली (मालक) ईश्वर जांभुळे (चालक) एमएच ३४ एम ५६ ७२ सतीश कोतपल्लीवार मालक दिलीप राऊत (चालक) एमएच ३४ बीआर ३९३२

*सावधान* मूल शहरात चोरांचा प्रवेश ? शेजाऱ्यांनी सहकार्य केले म्हणून..!*

Image
 *सावधान* मूल शहरात चोरांचा प्रवेश ? शेजाऱ्यांनी सहकार्य केले म्हणून..!*   मूल शहरातील एक गृप ,*समस्या मूल शहराच्या* त्यावर वायरल होतोय एक संदेश......... दीपक देशपांडे  चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील मूल शहरातील नवीन वस्तीत  आज  दिनांक २२मार्च पहाटे  २ ते २:३० च्या दरम्यान आदिवासी मुलांच्या वस्तीगृहाच्या  बाजुला श्री सुरेश कोलप्याकवार (कोर्टात क्लर्क आहे) यांच्या घरी प्रवेश करून समोरील मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यांना आवाज येताच त्यांनी समयसूचकता दाखवत श्री आकेवार सर व अजून  दुसऱ्या शेजाऱ्यांना फोन केला व दरवाजा आत मधून दाबून धरून ठेवला होता.   त्याच क्षणी श्री आकेवार सर बाहेर येऊन आवाज दिल्या बरोबर चोर पळून गेले,ते पळून जातांना आकेवार सर यांनी प्रत्यक्ष बघितले ते चार लोक होते. तरी मूल वासीय जनतेने सावध राहावे. असे आवाहन एका व्हाट्सअप  गृपवर करण्यात आले असून  त्यांचे घराला लागून असलेला तिरणकर सर यांच्या सुध्दा घरी प्रवेश करून मुख्य दरवाज्याची कडी लावून ठेवले होते व खिडकी  उघडून खिडकी वर ठेवलेले दोन्ही मोबाईल चोरून नेले अशा आशयाच्या समाजमाध्यमांवर

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*

Image
 *चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात  काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?* दीपक देशपांडे. भाजपाने माजी खासदार हंसराज अहिर यांच्या ऐवजी सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची घोषणा केली आणि चंद्रपुरात एक विजयी बाॅंब टाकला आणि ...... काँग्रेसच्या उमेदवारीला घेऊन चंद्रपुरात अक्षरश: रान पेटविल्या जात आहे एवढेच नव्हे तर हा प्रश्न आता दिल्ली दरबारी पोहचवला गेला आहे. चंद्रपुरातील प्रसार माध्यमे आणि समाजमाध्यमांनी आलटून पालटून  प्रतिभा धानोरकर,शिवानी वडेट्टीवार ,सुभाष धोटे, विजय वडेट्टीवार यांची नाव समोर आणली. अन् यातूनच प्रचंड संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे चंद्रपुरात "ताई" कि "दादा" असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता या मुद्यावरून काँग्रेसच्या दोन्ही गटातील समर्थकांत अक्षरशः राजकीय तुंबळ युद्ध पेटलंय ,कारण चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना धानोरकर आणि वडेट्टीवार गटातील शीतयुद्ध चांगलेच ठाऊक आहे. प्रतिभा धानोरकरांच्या प्रबळ दावेदारीनंतर विजय वडेट्टीवारांच्या कन्येचे शिवानी वडेट्टीवार  यांचे नाव पुढे करुन या शीतयुद्धाची सुरुवात केली होती मात्र पक्षातील सम