वेचलेले चांदणे

 *वेचलेले चांदणे*

*चिंतनीय......आणि म्हणूनच......*

दीपक देशपांडे

*अमेरिकेत  देव नाही ,,,,ना मठ नाही ,,पण पाऊस मात्र वेळेवर आहे ,,व भरपूर आहे,,,.गेल्या २०० वर्षात  दुष्काळ  नाही*,

*कुठले होमहवन नाही,,, ना कसली वारी नाही.,,,,कसले अभिषेक नाही ,,,ना ,,अनुष्ठानं नाही,,,,. हरिनाम सप्ताह नाही,,, ना,, पारायणे नाहीत*,,,,

*अमेरिकेत लोकसंख्या नियंत्रणात आहे.,, अन्नधान्य विपूल आहे.,,,,सुखसोयी विपूल आहेत,,,, कशाचीच कमतरता नाही.*

*माणशी २८७६ वृक्ष आहेत.,,,,, भारतात फक्त माणसी २८ झाडे आहेत, त्याचीही निर्दयपणे कटाई करतांना आमचे हात कचरत नाहीत*

*आपल्याकडे वृक्षवल्ली आम्हां सोयरे म्हणतो... पण एकही भारतीय झाड लावत नाही..... जपत नाही.... अमेरिकेत घरासमोर हिरवळ नाही असं घर नाही*....

*भारतात दारात झाड नाही.... तर हिरवळ कुठली. ....स्वातंत्र्य  मिळून ७४ वर्ष होत आली ....साधं पिण्याच पाणी देवू शकत नाही*.....

  

*अमेरिकेचे क्षेत्रफळ  भारता पेक्षा तिप्पट  आहे ......आणि लोकसंख्या  आहे ३१ कोटी....... भारताची आहे १३५ कोटी ...... ३५ कोटीची १३५ कोटी झाली .....फक्त ८० वर्षात. ...एवढीच जबरदस्त  प्रगती आहे...... इथै हजारो जाती.... सतराशे साठ धर्म .... कुणाचाच मेळ नाही.... प्रत्येकजण  म्हणतो आमचाच देव खरा*.....

*आमचाच धर्म  मोठा.......नाही लेकरांना तोटा.....*.


*एक मुलगा सांभाळ करने कठीण झाले..... तरी एकएकाला सतरा लेकरं.... कुत्र्यावाणी भटकत आहेत रस्त्यावर*.....

 *ना शिक्षण  ना संस्कार ..ना आचार ....ना शिस्त* 

*सगळं  बिनधास्त . आणि मस्त....* 

   

*आताच पिण्यास पाणी नाही.... तर पुढे काय.... कुणालाही पर्यावरणाची फिकीर नाही..... निसर्गाची चाड नाही......नुसतेच भरतात कुंभमेळे आणि जत्रा व यात्रा,जमात व धर्माचे मेळे होत आहेत ....प्रार्थना  केल्या जात आहे ...नुसतेच माजलेत धर्माचे स्तोम, जातीयवाद हटविण्याचे नाव व त्यालाच आरक्षणरुपी बुरखे पांघरूण सुरू असलेली राजकारणाची परिसिमा...., स्वार्थासाठी काहीही*...

 

 *एकाही धर्माच्या देवात पाऊस पाडण्याची ताकद नाही......,तो पडावा अशी मनापासुन इच्छाही नाहीच* 

" त्याशिवाय आम्ही मदतीचे ढोंग करुन आपलीच पोळी कशी शेकणार ना?*

 *उससे बडा कोई नही*

*ईश्वराशिवाय कुणी महान नाही....  हे ऐकुण ऐकुण  कित्येक वर्ष  झाली..... दरवर्षी  तेच. पाऊस नाही पडलाच तरी पिकाला भाव नाही..... शेतकऱ्यांना. पाऊस पडला ...तरी भाव मिळतच नाही त्यामुळे तो आत्महत्या करतो  ....नाही पडला ...तर उत्पन्न न झाल्याने संसाराचा गाडा कसा हाकायचा ह्या विवंचनेत आत्महत्या करतो*.....

*सगळ्यांना आरक्षण पाहीजे  म्हणता म्हणता ....आरक्षण १००%होण्याची  वेळ  आली तरीही ना मागणी कमी होत आहे ना देण्याची लालूच..*....

*तरीही  काही मिळनार नाही*

....

  *वित्तमंत्री सितारामन यांनी  संसदेत सांगीतले ..... देशातील १ लाख ६० हजार कंपन्या बंद झाल्या ....सहाकोटी लोक बेरोजगार झाले.*......

 

*नोक-याच नाही ....तर आरक्षण घेवून काय चाटायचे......आता नोक-याच बंद होत आहेत ....आहे त्या नोकरांनाच पगार देण्याची व देशाचा विकास करण्याची ताकद सरकारमध्ये नाही*.....

*सगळा पैसा आमदार खासदार यांच्या सेवा सवलती व पेन्शन  मध्येच संपत आहे, कुणाच्या विरोधाशिवाय यांना महागाई भत्ता व पगारवाढीसह सर्व सवलती आपसूकच मिळतात.इथे कधी कुणी विरोध केला आहे?*

      


*सबका विकास जावून ....भारत बनेगा भकास.... असं दिसत आहे.....* *निवडणुकावरचा विश्वास  उडाला आहे...... मॅचच फिक्स असेल .....तर खेळायचेच कशाला तरीही निवडणुका आणि...सावळा गोंधळ सुरुच*...... कां तर भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे.

*जनता दिशाहीन झाली आहे..... स्वप्न राखेत मिसळली आहेत...... संविधान नावांला उरले आहे....*


 *चौकशी शिवाय अटक ....असा न्याय झाला आहे..... प्रचंड महागाई ने जनता मरणप्राय झाली आहे..... तरी सरकार डिझेल पेट्रोलचे दर  वाढवतच आहे..... नौकरपेशांना महागाई भत्ता व पगारवाढ मिळण्याची सोय आहे . आमचा बळीराजा मात्र अहोरात्र मेहनत करून ही ...रोजच जिवंतपणी मरण अनुभवतोय ,त्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव तर दूरच परंतू हमीभाव मिळण्याची शक्यता सुद्धा मावळत चालली आहे...बोनसरुपी आश्वासनांचे गाजर तर दरवर्षी मिळतच असते ,ते नेमकं कुणाला मिळते ते शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. विमा काढण्याची सक्ती नेमकी कुणाच्या फायद्याची हा तर दिर्घ संशोधनाचा विषय आहे*

*दवाखाना कुटूंबाचे दिवाळं काढत आहे. .....जनतेला लुटण्यासाठी  लुबाडण्यासाठी सरकार सहीत असंख्य  गिधाडे सरसावली आहेत.....*

 

  *चिंता व ताणतणावाने अर्धा भारता मधुमेह ग्रस्त झाला आहे.... .३०% लोकांना रक्तदाब आहे.....आणि इतर व्याधी तर दूरच...*

 

*शेतात काम करायला मजूर नाही ....अंगमेहनतीला माणुस नाही*....


*सगळे  बिनकामाची माणसं आहेत...... नवरा साहेब  व बायको मॅडम झाल्या आहेत....*

😡😡😡😡😡😡🌹

 *स्वयंपाकाला ...बाई ..भांडी व धुण्याला बाई.* 

*तरी .. मॅडमची सतत पाठ व कंबर दुखते आहे....*.

*आणि*

*साहेबांना  टेकल्याशिवाय बसता येत नाही.....*

*कुंभ मेळ्यात ...१०,०००  सुशिक्षित  व उच्चशिक्षित  लोकांनी  साधूची दिक्षा घेतली......आणि आता  रस्त्यावर  भटकत आहेत..... विरक्त झाले आहेत.... लग्नाचे वय टळून गेले आहे..... बायका मिळत नाहीत..... गांवागावांत किमान चाळीस पन्नास  पोरं बिन लग्नाची आहेत.....   भयंकर  विदारक परिस्थिती  आहे*..... व्यसनाधीनता वाढिस लागली आहे....? मोफतचे धान्य आणि स्वस्त धान्य पुरवठ्यामुळे कार्यशक्ती क्षीण होत चालली आहे*


 *बाजारात फळे बळेच पिकवून विकत आहेत..... मराठी शाळा बंद पडल्या आहेत..... मुलांना  धड इंग्रजी  येत नाही... आणि मराठी येत नाही.....तरिही पोरांना कान्व्हेंट मध्ये पाठविण्यासाठी सगळेच आतुरलेले आहेत?*

*मराठी इंग्लिश   मिक्स बोलत आहेत.... टिव्ही  वरच्या मालिका नग्न झाल्या आहेत..... गुन्हेगारी जास्त  दाखवत आहे... . मुलं लहानपणापासूनच  हिसंक होत आहेत....*

  

*१३ व्या वर्षीच मुलंमुली पळून जात आहेत... इंटरनेट मुळे सारेच उघडे नागडे दर्शन सहजगत्या होत आहे . दारू कितीही महाग केली ...तरी त्यासाठी रांगा लागत आहेत......*

*प्रार्थना स्थळे लुटीची ठिकाणं झाली आहेत.... . वृद्धश्रमाची संख्या झपाट्याने  वाढत आहेत.... . तो एक मोठा व्यवसाय  होवू पहात आहे.....*


*आईला बाळासाठी वेळ  नाही..... पाळणाघरे वाढत आहेत....*

*लेका.सुनांना सासुसासरे नकोत...*

*अनाथालये वाढत आहेत..... भारतिय संस्कृती चा पार बट्याबोळ झाला आहे....*

*माणसं पदोपदी खोटं बोलत आहेत..... खोटं बोलणच खरं मानलं जात आहे....*

*चोरांना लबाडांना प्रतिष्ठा मिळत आहे..... सज्जनांना वेड्यात काढत आहेत... . लोकशाही समता बंधुता स्वातंत्र्य...  हे.... फक्त वाट्सअपचे संदेशा पुरतीच मर्यादित  झाली आहे....*

 

*चांगले वागण्याचे करोडो मेसेज रोज फिरत आहेत..... प्रत्येक जण चांगलं वागा म्हणत आहे.... स्वतः किती चांगले वागत आहेत हे तपासण्याची गरजच उरली नाही . हुंडाविरोधी नारे लागत आहेत तरीही आजही सुना राॅकेल टाकुन जाळल्या जात आहेत....*

  

*साहित्यीक मारले जात आहेत...... शिवरायांनी ३५० वर्षापुर्वी....  साहित्यकांना उत्तम लिखाणासाठी कोटी रूपया पर्यंत मानधन दिले होते..... आज. साहित्यीक  भीक मागत आहेत.....*

    

*एकंदरीत भारत विस्फोटाचा.... व ...उद्रेकाचा  ज्वालामुखी बनत आहे..... भारत मानवी वस्ती  साठी  धोकादायक  होत चालला आहे.....*

*वेळीच सावरलो नाही.. तर... आपल्या वारसांचे जीवन.... प्रचंड संकटाच्या गराड्यात सापडणार आहे..  . हे नक्की....🙏🙏🙏

*वेळीच सावध झालो नाहीत, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत आणि आपल्या वागण्यात आणि प्रत्यक्ष कृतीत बदल केला नाही तर तो दिवस दूर नाही की आपल्याला आपलेच अस्तित्व शोधण्यासाठी वणवण भटकावे लागेल आणि पैसा असून कामात येणार नाही, विद्वत्तेचा उपाय चालणार नाही.*

*जातीव्यवस्थेच्या आसूड जातीजातीतूनच उगवला जाईल,धर्म संपुष्टात येतील आणि, नातीगोती शोधून सापडणार नाहीत.*

ही भयावह व भिषण स्थिती येण्यापूर्वीच प्रत्येकाला सावध होणे गरजेचे भासत आहे.

विचार स्वातंत्र्य लाभलेल्या या भारताच्या मातीत जन्म घेतलेला मी(प्रत्येक जण) काय आणि कसा विचार करतो आणि माझ्या देशाला कोणत्या दिशेने प्रवाहित करतो ते माझे मलाच ठरवावे लागेल हे अंतिम सत्य आहे.

*नियतीचा खेळ कुणाला कळला आहे?*


                                     *किरण म्हसकर -पत्रकार* 

    यांच्या मुळ लेखाच्या आधारे हा लेख लिहिलेला आहे.



Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*