Posts

Showing posts from December, 2023

*सहज सुचलं म्हणून...*

Image
 *सहज सुचलं म्हणून...* देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या देशातील सामान्य माणूस लढला... त्यावेळी देशातील राजे महाराजे हे इंग्रज सरकारचे सत्तेतले भागिदार होते.... कॉंग्रेसचे नेते खा.राहूल गांधी यांनी नागपूरच्या कॉंग्रेस रॅलीत बोलताना केला आरोप.... बातमी ... भागिदारी होती तर मग बहादुर शहा जफर यांना परदेशी कैदेत का ठेवले होते राहुलजी...? झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना तटावरून घोडा का फेकावा लागला..? तात्या टोपे यांना फासावर का चढवले गेले....? भोसलेंची राजधानी नागपूर काबीज करण्यासाठी इंग्रजांना बाकाबाई भोसलेंना फितूर का करवावे लागले...? या आणि अशा इतर अनेक प्रश्नांची उत्तरे आहेत कां आपल्या जवळ राहूल गांधी...? यापुढे आपली भाषणे तयार करणा-यांना इतिहासाचा चांगला अभ्यास करायला सांगा राहुलजी... म्हणजे जनतेसमोर आपला पचका होणार नाही.... कारण आपण वाचला नसेलही... पण या देशातील बहुसंख्य जनता देशाचा इतिहास अभ्यासते राहुलजी .. जय विदर्भ... अविनाश पाठक.

मूल तालुक्यातील संजय गांधी,श्रावणबाळ,वृध्दापकाळ योजनेची १०४ प्रकरणे मंजूर

Image
  मूल तालुक्यातील संजय गांधी,श्रावणबाळ,वृध्दापकाळ योजनेची १०४  मूल –  दीपक देशपांडे. गरिबांचे कल्याण व निराधारांना आधार मिळावा या हेतूने शासनातर्फे संजय गांधी निराधार व श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना अनेक वर्षापासून सुरू करण्यात आली असून  संजय गांधी निराधार योजना ,श्रावणबाळ योजना ,वृध्दापकाळ योजनेतील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी एका विशेष सभेचे आयोजन दिनांक २६  डिसेंबर २०२३ रोजी दूपारी १.०० वाजता संजय गांधी निराधार योजना समितीच्याअध्यक्षा  सौ.वंदना अगरकाटे,  यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय, मूल येथे आयोजन करण्यात आलेले होते. सदर सभेमध्ये समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनी उपस्थित राहून  खालील प्रमाणे   प्रकरणे मंजुर   केलीत. संजय गांधी निराधार योजना पात्र प्रकरण ३१,    इंदिरा गांधी विधवा योजना पात्र प्रकरण १३  श्रावणबाळ योजना पात्र प्रकरण ५९ नामंजूर प्रकरण ०५ वृध्दापकाळ योजना पात्र प्रकरण ०१ अशी एकुण सादर १०९ प्रकरणापैकी १०४ प्रकरणे निकाली काढण्यात आले असुन नामंजुर प्रकरणाची संख्या एकुण ०५आहे. त्यातील त्रुटी पूर्ण करुन ती प्रकरणे पुढील सभेत मंजूरीसाठी ठेवता येतील असे ठरविले गेले. निराधारांना

*ग्राहक* आणि *ग्राहकाला न्याय मिळवून देणारी पावती हा महत्त्वाचा पुरावा.* *दीपक देशपांडे.*

Image
 * ग्राहक* आणि *ग्राहकाला न्याय मिळवून देणारी पावती हा महत्त्वाचा पुरावा.* *दीपक देशपांडे.* भाग १. ग्राहक म्हणजे काय?:-अगदीच सोप्या शब्दात सांगायचे झाले तर १.ग्रहण करणारा तो ग्राहक.   मात्र कायद्याच्या चौकटीत सांगायचे झाले तर..२.पैशाच्या मोबदल्यात वस्तू किंवा सेवा खरेदी करणारा, किंवा मिळवणारा  तो ग्राहक. ग्राहकाची त्रिसूत्री:- १) ग्राहक हा राजा आहे. २.ग्राहक हा आस आहे. ३.ग्राहक हे भांडवल आहे. त्यामुळे संपूर्ण अर्थकारणाचा गाडा हा ग्राहकांवर अवलंबून आहे , अशास्थितीत ग्राहक जागृत नसल्याने आणि तो विखुरलेला असल्याने त्यांची पदोपदी फसवणूक होत आहे. त्यांच्या अज्ञानामुळे , वेळोवेळी दाखविल्या जाणाऱ्या आमिषांमुळे तो त्या आमिषांना बळी पडून समोरच्यावर,विश्वास ठेवून शोषणाचा बळी ठरत आहे. त्याने फक्त ग्राहक ,ग्राहकांचे हक्क , ग्राहक संरक्षण कायदा हे शब्द दूरुनच ऐकले आहेत मात्र त्यात नेमकं काय आहे आणि हा कायदा ग्राहकांच्या मागे किती मजबूती ने पाठराखण करण्यासाठी किती विचारपूर्वक तयार केला आहे याबाबत अजूनही अज्ञानी आहे आणि म्हणूनच तो फसवला जात आहे त्याची ग्राहक म्हणून फसवणूक होत आहे. या शोषणापासून मुक्त

आज श्रद्धेय अटलजींचा जन्मदिवस

Image
          युग पुरुषाला वंदन*        *आज अटलजींचा जन्मदिन*                   * बाधाएं आती हैं आएं*      *घिरें प्रलय की घोर घटाएं,*      *पावों के नीचे अंगारे,*      *सिर पर बरसें यदि ज्वालाएं,*      *निज हाथों में हंसते-हंसते,*      *आग लगाकर जलना होगा.*      *कदम मिलाकर चलना होगा.*      *.... अटल बिहारी वाजपेयी*            *ग्वाल्हेर.. भारतभूमिला परमवैभव प्राप्त करुन देण्यासाठी संपूर्ण जीवन खर्च करणाऱ्या ऋषीतुल्य व्यक्तीमत्व भारतरत्न अटलजींचे जन्म स्थळ. (२५ डिसेंबर १९२४)*         *देशातील कोणीही सत्ताधारी असोत वा विरोधी पक्ष.. जगातील जनसामान्य.. प्रत्येकाच्या मनांत अटलजींचे नाव ऐकताच आदरभाव जागृत होतो. त्यांचे जीवन चरित्र हे सदैव प्रेरणादायीच आहे. राजकारण हे शेवटच्या घटकाच्या सुखासाठीच हवे हे त्यांनी सिद्ध केले. तत्वाशी जन्मभर एकनिष्ठ राहणे म्हणजे काय.. अजातशत्रूत्व म्हणजे काय याचे ते मुर्तिमंत उदाहरण. हिंदूधर्माचा विशाल सहिष्णू परीघ त्यांनी जगाला पटवून दिला. राजकारण हे देशहितासाठी हवे सत्तेसाठी नाही याचा परिपाठ देशात घालून दिला होता.*         *अटलजींची ओळख ही कवीमनाचे.. क