Posts

Showing posts from July, 2021

बॅनर एक चर्चा अनेक, भाग ३*

Image
 * बॅनर एक चर्चा अनेक, भाग ३* * कोरोना काळातही शिक्षण शुल्कामध्ये वाढ:पालकांमध्ये आक्रोश*  * दीपक देशपांडे* * संपादक,प्रकाशक* * m2Mन्यूजपोर्टल * * Ddbatmiportalm2M * हा संघर्ष कुठले वळण घेईल? * कोरोना काळातही शिक्षण शुल्कामध्ये वाढ:पालकांमध्ये आक्रोश * या आशयाच्या बातम्या वृत्तपत्रात व डिजिटल मिडिया वर वाचायला मिळत आहेत, त्या संपूर्ण महाराष्ट्रात. तसेच मूल नगरातील पालक संघर्ष समितीचे वतीने स्थानिक पातळीवर प्रशासकीय यंत्रणेला निवेदन देऊन संवादातून समझोत्यापर्यंत सर्व मार्ग सुरू ठेवले होते व प्राथमिक स्तरावर शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ व पालक संघर्ष समितीचे सदस्य यांची संयुक्त बैठक प्रशासकीय अधिकारी यांनी लावून समन्वयातून तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला होता. याबाबत उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या उपस्थितीत अशी बैठक आयोजित केली होती, मात्र स्पष्ट निर्देश नसल्याने  या बैठकीत शाळेच्या मुख्याध्यापकांनी काही दिवसांत शाळा व्यवस्थापनासोबत चर्चा करुन पुढिल निर्णय घेऊ असेच आश्वासन दिले होते. * या बैठकीत शाळांची अशीच भूमिका असण्याची शक्यता आम्ही आमच्या दुसऱ्या भागात स्पष्टपणे नमूद केले

महाराष्ट्र राज्यातील पहिले पतंजली योगभवन उदघाटन व लोकार्पण सोहळा.

Image
 * मूल शहरात राज्‍यातील पहिले पतंजली योगभवन उदघाटीत होत असल्‍याचा मनापासून आनंद – आ. सुधीर मुनगंटीवार* दीपक देशपांडे. हजारों वर्षापासून आपल्‍या भारत देशात योगसाधना सुरू आहे. आज सर्वसामान्‍य माणूस सुध्‍दा योगसाधना करतो ही अतिशय आनंदाची बाब आहे. जगातील १७५ देशांनी २१ जून रोजी आंतरराष्‍ट्रीय योगदिवस साजरा करण्‍यासाठी संयुक्‍त राष्‍ट्र संघात मंजूरी दिली. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे योगदान अनन्‍यसाधारण आहे. निरामय आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने योगसाधना अतिशय महत्‍वाची आहे. महाराष्‍ट्रातील पहिले पंतजली योगभवन मूल शहरात उदघाटीत करताना मला मनापासून आनंद होत आहे, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मूलच्या विकासकार्यातील हा एक मैलाचा दगड ठरणार हे या वास्तूत प्रवेश केल्यानंतर लक्षात आल्याशिवाय राहणार नाही,हेच या वास्तूचे विशेष आहे,हे वेगळे सांगण्याची गरज भासणार नाही. २८ जुलै रोजी मूल शहरात योग भवनाच्‍या लोकार्पण कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मूलच्‍या नगराध्‍यक्षा सौ. रत्‍नमाला भोयर, उपाध्‍यक्ष नंदू रणदिवे,

शासनाच्या शिवभोजन थालीचा लाभ गरजू पर्यंत पोहचावा

Image
 * शासनाच्या शिवभोजन थालीचा लाभ गरजू पर्यंत पोहचावा *.        * शालीकराम भराडी जिल्हा पुरवठा अधिकारी * चंद्रपुर :-दीपक देशपांडे.  कोरोना व सद्या बिकट परिस्थितीत अभाव ग्रस्त नागरिकांच्या पोटात दोन घास उपलब्ध व्हावे करीता महाराष्ट्र शासनाद्वारा शिवभोजन थाळी सुविधा नाममात्र दरात उपलब्ध करून दिलेली असून या सुविधेचा लाभ गरजवंतांपर्यंत पोचविण्याची संधी विकलांग सेवा संस्थेला मिळाली असून शेवटच्या घटकापर्यंत शिवभोजन सुविधा पोचण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावेत असे प्रतिपादन जिल्हा  पुरवठा अधिकारी श्री शालीकराम भराडी यांनी केले.त्यांनी तुकुम येथील शिवभोजन केंद्राचा शुभारंभ करताना असे आवाहन केले      व्यासपीठावर जिल्हा अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी श्री दांडेकर,तुंबडे, डाँ बेरशेट्टीवार नेत्रतज्ञ ,संस्थाध्यक्ष व शिवसेना शहर संघटिका वर्षा कोठेकर  ,नाट्यकलावन्त व सामाजिक कार्यकर्त्या निशा धोंगडे इत्यादींनी कार्यक्रमाचे व्यासपीठ भूषविले.  विकलांग सेवा शिवभोजन केंद्राला संस्थापयोगी साहित्य ,कोरोना प्रतिबंधक साहित्य व फर्स्ट एड बॉक्स सह साहित्य पुरविल्याबद्दल सीमादेवी ठाकूर ,रंजना नाकतोडे व निशा धोंगडे

सामान्य नागरीक केंद्रस्थानी ठेवून डिजीटल माध्यम आचारसंहितेची रचना- विक्रम सहाय

Image
  डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेविषयी माहिती देणाऱ्या वेबिनारमध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सह सचिव विक्रम सहाय यांचे मार्गदर्शन डिजीटल माध्यम आचारसंहितेमुळे महिलांप्रती आक्षेपार्ह किंवा बालकांसाठी हानिकारक आशय प्रसारित करण्यापासून रोखता येईल. डिजीटल माध्यम आचारसंहितेमुळे फेक न्यूजचा प्रसार रोखण्यास मदत होईल. तक्रारींचा निपटारा करणे यामुळे सुलभ होईल .........विक्रम सहाय. मुंबई १२ जुलै २०२१ दीपक देशपांडे (लाईव्ह वेबिनार मधून) महिलांप्रती आक्षेपार्ह किंवा बालकांसाठी हानिकारक असा आशय प्रसारित होण्यापासून रोखण्यासाठी  डिजिटल मीडिया आचारसंहिता आहे. नियामक यंत्रणेमुळे फेक अर्थात अपप्रचार करणाऱ्या बातम्यांवर नियंत्रण आणणे आणि त्याला  रोखणे शक्य होणार असून  ते प्रसारित करणाऱ्याला त्यासाठी जबाबदार धरता येणार आहे असे माहिती आणि प्रसारण सह सचिव विक्रम सहाय यांनी सांगितले. ते सोमवारी डिजीटल माध्यमांसाठीच्या  आचार संहितेच्या तिसऱ्या भागाबद्दल माहिती देणाऱ्या  वेबिनारमध्ये बोलत होते. भारत सरकारने फेब्रुवारी २०२१ पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक

*बॅनर एक चर्चा अनेक!*

Image
* बॅनर एक चर्चा अनेक! भाग २ .*  * संतप्त पालकांच्या व्यथा निवेदनातून प्रशासनापुढे * दीपक देशपांडे. शाळा व्यवस्थापनाने आँनलाईन शाळा तर सुरू केल्या आहेत, परंतू शाळेचे शिक्षण शुल्क मात्र भरमसाठ वसुल करुन शिक्षणाचा बाजार भरवल्याने शाळा व्यवस्थापन समितीच्या विरोधात पालकांचा आवाज ऐकू येऊ लागला होता मात्र तो विखूरलेला होता याच कारणामुळे नाराज पालकाने एक बॅनर व्हाट्सअप गृपवर टाकले आणि संतप्त पालकांच्या व्यथा आणि पालक शिक्षक समितीच्या कारभाराचे वाभाडे निघायला सुरुवात झाली.परिणामी बिना नेतृत्वाची एक पालक संघर्ष समिती तयार करण्यात आली आणि  आज तो आवाज आता सामुहिक स्वरुपात प्रशासनाच्या दारात निवेदन घेऊन दाखल झाला आहे. यामुळे व्यवस्थापन समिती फार गोंधळून जाईलच अशी स्थिती नाहीच,कारण याची भणक त्यांना आधीच लागलेली आहे, परंतू आपली तयारी पूर्ण करुन नेमके उत्तर काय द्यायचे याची काळजी ते नक्कीच घेतील याबाबत शंका नसावी. प्रशासनाला दिलेल्या निवेदनाची प्रत कदाचित ते निवेदन अधिकाऱ्यांच्या हातात पडण्यापूर्वी या व्यवस्थापन समितीच्या हातात लागले असण्याची शक्यता नाकारता येत नाही,कारण पालक संघर्ष समितीचे कार्य फारच

आषाढस्य प्रथम दिवसे

Image
 * आषाढस्य प्रथम दिवसे...* दीपक देशपांडे आषाढ महिना लागला की पहिल्याच दिवशी पावसाच्या आगमनाची आणि उन्हाच्या काहिलीच्या समाप्तीची जणू काही चाहूल लागली असल्याचे भासमान होते. शाळेच्या दिवसांत कुठेतरी वाचलेल्या त्या कालीदासांच्या काव्यपंक्ती ,शब्द नाही आठवले तरीही आकाशातील मेघाला केलेली विनवणी आणि आपल्या मनातील भावना आपल्या प्रेयसीला पोहोचविण्यासाठी केलेले आर्जव आठविल्याशिवाय राहातच नाही. महान संस्कृत कवी कालिदास यांचे नावे  * आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानु वप्रक्रीडापरिणत गजप्रेक्षणियं ददर्श।* असे म्हणत कालिदास दिवसाच्या  हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात.  कालिदास म्हणजे मेघदूत आणि अजरामर काव्य  सोबतच नभ मेघांनी आच्छादिले आहे असे वातावरण निर्माण होणे ही स्थिती वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. आज मलाही लिहायचे होते आणि मी * आषाढस्य प्रथम दिवसे * लिहिणारच होतो परंतू  दिवसभर ना नभ मेघांनी आच्छादिले ना वारा सुटला त्यामुळे कवी कालिदास यांचे स्मरण करून नभ मेघांनी आच्छादलेले दिसावे आणि वारा सुटून ते मेघ वेगाने मार्गस्थ होण्याची वाट बघत होतो. सायंकाळपर्यंत तरी ती स्थिती दिसत नाही हे बघून मन नाराज ह

बॅनर एक चर्चा अनेक!

Image
  बॅनर एक चर्चा अनेक! दीपक देशपांडे.

नगराचे सोंदर्यीकरण.

Image
 * मूल शहराच्‍या संपूर्ण विकासासाठी कटिबध्‍द - आ. सुधीर मुनगंटीवार* * रिक्रीयेशन सेंटर व चौकाच्‍या सौंदर्यीकरणाचे उदघाटन * दीपक देशपांडे. प्रत्‍येक निवडणूकीत मला मूल शहराने भरभरून प्रेम दिले. त्‍या प्रेमाचा उतराई होण्‍याचा मी नेहमीच प्रयत्‍न करतो. त्‍याचाच एक भाग म्‍हणून आज मला वार्ड नं. १४ च्‍या रिक्रीयेशन सेंटरचे उदघाटन व गांधी चौकातील तसेच पोस्‍ट ऑफीससमोरील चौकातील सौंदर्यीकरणाचे उदघाटन करताना आनंद होत आहे, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.   मूल शहरात वैशिष्‍टयपूर्ण निधीतुन निरनिराळया चौकांचे सौंदर्यीकरण करण्‍याचे काम सुरू आहे. याच्‍या अंतर्गत गांधी चौक येथे डॉक्‍टर, स्‍वच्‍छता दूत, पोलिस यांच्‍या मुर्त्‍या तसेच पोस्‍ट ऑफीससमोर आदिवासी नृत्‍य करत असणा-या महिलांच्‍या मुर्त्‍या लावण्‍यात आल्‍या. त्‍यांचे उदघाटन आज आ. मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते झाले. तसेच वार्ड नं. १४ च्‍या रिक्रीयेशन सेंटरचे उदघाटनही याप्रसंगी करण्‍यात आले. मूलच्‍या नगराध्‍यक्षा प्रा. रत्‍नमाला भोयर, नगर परिषद उपाध्‍यक्ष नंदू रणदिवे, मूलचे मुख्‍याधिकारी