Posts

Showing posts from June, 2022

मूलच्या जनतेचा श्वासच हिरावण्याचा प्रयत्न!

Image
 *मालधक्का इथून हटलाच पाहिजे!* जनतेला , प्रशासनाला अंधारात ठेवून असे काम कसे करु शकतात? * जनतेचे भविष्य अंधाराच्या दिशेने ....!* * मालधक्का हटवावाच लागेल अन्यथा.......* .......अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्विकारणार दीपक देशपांडे मूल. अंदाजे सुमारे दिडशे वर्षासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या मूल रेल्वे स्टेशन परिसरातील माल धक्काचे काम थांबवुन आरोग्याचा प्रश्न उद्भवु नये यासाठी माल धक्काच स्थलांतरीत करण्याची मागणी मूल येथील मार्निग गृपच्या वतिने करण्यात आली असुन रेल्वे प्रशासनाने काम बंद करुन स्थलांतरीत न केल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा मार्निंग गृपच्या वतिने आयोजीत पत्रकार परिषदेत दिला आहे.  मूल येथील पत्रकार संघाचे सभागृहात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत मार्निंग ग्रुपचे सदस्य जिवन कोंतमवार, अॅड. अश्वीन पॉलीकर, हिरेन गोगरी म्हणाले की, मूलच्या नागरीकांना फिरायला जाण्यासाठी कर्मविर महाविद्यालयाचे एकमेव पटांगण आहे, सदर पटांगणाला लागुन प्रादेशिक,वनविकास महामंडळ आणि बफर क्षेत्राचे मोठे जंगल असुन यापरिसरामधून वन्यप्राण्याची मोठया प्रमाणात    रेलचेल असते, असे असतानाही रेल्वे प्रशा

* मूल तालुक्‍यातील चिखली आणि मोरवाही या गावात गेटेड साठवण बंधारे मंजूर*

*१४ कोटी ६८ लक्ष ९७ हजार रू. किंमतीच्‍या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्‍यता.* * माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत.* चंद्रपुर m2Mन्यूजपोर्टल विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर जिल्‍हयातील  मूल तालुक्‍यातील चिखली आणि मोरवाही या ठिकाणी गेटेड साठवण बंधा-यांना प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. महाराष्‍ट्र जलसंधारण महामंडळाच्‍या दिनांक ९ मे २०२२ च्‍या आदेशान्‍वये सदर दोन गावात गेटेड साठवण बंधारे मंजूर करण्‍यात आले आहे.   मूल   तालुक्‍यातील चिखली येथे ७ कोटी ३३ लक्ष ८० हजार रू. तसेच मोरवाही येथे ७ कोटी ३५ लक्ष १७ हजार रू. किंमतीचे गेटेड बंधारे मंजूर करण्‍यात आले आहे. या बंधा-यांच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांना सिंचन सुविधा उपलब्‍ध व्‍हावी यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्‍याने शासनाशी पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला आहे. त्‍यांच्‍या प्रयत्‍नांना यश प्राप्‍त झाले असून शेतक-यांना या माध्‍यमातुन मोठी सुविधा उपलब्‍ध होणार आहे. या आधीही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात अनेक सिंचन विषयक मह

रोखठोक माझं मत भाग२

  नगरपरिषद,पं.स.,जि.प. सार्वत्रिक निवडणूका  अनिश्चिततेत घोंघावणारे वादळ! दीपक देशपांडे केंद व राज्य या दोन सरकारांच्या वैचारिक मतभेद व राज्य सरकार आणि न्यायालय या विवादात जातीय आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार तातडीने निवडणूक घेण्याची वेळ राज्य सरकारवर आली आणि निवडणूक आयोगास निवडणूक प्रक्रिया सुरू करावी लागली. निवडणूक आयोगाने जून्या नव्या याद्या एकत्र करीत मतदार याद्या प्रसिद्ध केल्या, त्याची पुढली पायरी म्हणजे उमेदवारांच्या राखिव गटाचे आरक्षण.. तो टप्पा पार पडला आणि आता त्यावर आक्षेप मागण्यात आले आहेत. विशिष्ट  मुदतीत ही प्रक्रिया सुद्धा पूर्ण होईलच. अशीच प्रक्रिया पं.स. व जि.प.मध्येसुद्धा अनुभवता येणार आहे. ...... पण खरी नाराजीची सुरुवात इथूनच तर होत आहे, कारण यावेळी महिलांना ५०टक्के आरक्षण आहे आणि आमच्या राजकीय मंडळींच्या मनात असलेल्या खऱ्या राजकारणाची सूत्रे कुठे महिलांच्या हातात जाऊन ही मातब्बर मंडळी सांगकामे नेतृत्व तर आपल्या हातात येणार नाही या संभ्रमात आहेत. या बदललेल्या परिस्थितीत बऱ्याच दिवसांपासून वार्डात, प्रभागात आपली पकड मजबूत करण्यासाठी के

अ.भा.ग्राहक पंचायत आता अधिक क्रियाशील होणार!

Image
 अ.भा.ग्राहक पंचायत आता अधिक क्रियाशील होणार! दीपक देशपांडे अ.भा.ग्राहक पंचायत विदर्भ प्रांताच्या विविध विभाग प्रमुखांची केंद्रीय कार्यकारिणीने नुकतीच घोषणा केली आहे. विदर्भ प्रांत पश्चिम क्षेत्रीय विभाग प्रमुख...  यादी खालीलप्रमाणे... *प्रांत महिला जागरण प्रमुख* 1)डॉ.सौ.जयश्री सातोकर,भंडारा 9420865483 *सह महिला जागरण प्रमुख* 2)संध्या पुनियानी,नागपूर 9823602865 *विधी प्रकोष्ठ (लिगल सेल)* 1)ऍड विलासजी भोसकर,नागपूर 9763189479 2)ऍड राजेश पोहरे,यवतमाळ 9850411619 *प्रचार प्रकोष्ठ ( मिडिया सेल )* 1)श्री दीपक देशपांडे, मूल चंद्रपूर 9403285344 2)श्री अभय खेडकर,वाशीम(कारंजा लाड) 9921771080 *पर्यावरण संरक्षण* 1)श्री संजय आयलवार, भंडारा 9623799802 2)सौ.नीता लाडे,वाशीम(कारंजा लाड) 7030460105 *रोजगार सृजन* 1)श्री हेमंत जकाते,अकोला 9604189314 2)डॉ केशव चेटूले, यवतमाळ 9422167056 *कोषाध्यक्ष* 1)श्री संजय धर्माधिकारी,नागपूर 9420568219 2)श्री श्रीपाद भट्टलवार 9850480213 विदर्भ प्रांत अध्यक्ष नारायणराव मेहरे सचिव नितीन काकडे, संघटनमंत्री अजय गाडे,पश्चिम क्षेत्रीय संघटनमंत्री गजानन पांडे, राष्ट्रीय कार्यक

कृषी महाविद्यालयाची विद्यार्थी चमू शेतकऱ्यांच्या बांधावर!

Image
  कृषी महाविद्यालयाची विद्यार्थी चमू शेतकऱ्यांच्या बांधावर दीपक देशपांडे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत मूल (सोमनाथ) येथे २०१८-२०१९ या शैक्षणिक  वर्षापासुन कृषि महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रथम तुकडी या वर्षी ग्रामीण कृषि कार्यानुभव (RAWE)  च्या माध्यमातून संपर्क शेतकऱ्यांच्या शेतावर २० आठवडे, प्रत्यक्ष शेती तसेच शेती आधारीत ईतर उद्योग यासंबधी अभ्यास करणार आहे.  या विद्यार्थ्या मार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला द्वारे विकसित करण्यात आलेले तंत्रज्ञान, सोयाबीन, कापुस, धान इतर तत्सम पिकांचे उन्नत वाण, कृषी अवजारे, इत्यादी बाबत माहिती शेतकरी बांधव यांचे पर्यंत पोहचविण्यात येईल. या विद्यार्थ्यांना ग्रामीण कृषि कार्यानुभव सत्रा बाबत सविस्तर माहिती व्हावी याकरीता नुकतेच कृषि महाविद्यालय मूल (सोमनाथ) येथे तिन दिवसीय अभिमुख सत्र आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात कृषिविस्तार, किटकशास्त्र, कृषि अर्थशास्त्र, वनस्पती शास्त्र, कृषि अभियांत्रिकी या विषयतज्ञांनी विद्यार्थ्यांना या सत्रात पुर्ण करावयाचा अभ्यासक्रम, विविध

रोखठोक माझं मतं!भाग १.

Image
 * निमित्त पर्यावरण दिनाचे आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे * * रानवाऱ्यातून  निघाला पर्यावरण संरक्षणाचा एक नवा वारा* * पर्यावरण संवर्धन व मानवता विकास मिशन , संजिवन संस्था  ,अ.भा.ग्राहक पंचायत सारख्या संस्था एका ध्येयाने प्रेरित होऊन पुढे आल्या* दीपक देशपांडे. ५जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मूल नगरातील इकोपार्क येथे वृक्षारोपण  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी वनविभागाच्या सौजन्याने संजिवन संस्थेने पुढाकार घेऊन एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूर जिल्हा संघटक दीपक देशपांडे यांनी संजिवन संस्थेचे अध्यक्ष उमेश झिरे यांचे सोबत संपर्क साधला आणि या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा प्रकट केली तशीच इच्छा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था (नेफेडो) तर्फे करण्यात आली आणि प्रत्यक्ष पर्यावरण दिनी या तिन्ही संस्था एकत्रित येऊन पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करीत वृक्षलागवड करणे व त्यांचे संवर्धन करणे यासाठी प्रचार व प्रसार करणे यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करण्याचा एक आगळावेगळा संकल्प करीत या इकोपार्कमधून वृक्षारोपण करून एक नवीन संदेश द