Posts

Showing posts from February, 2024

पत्रकार सन्मान योजनेबद्दलचा असंतोष आला उफाळून ......!

Image
 * अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी आलेल्या सरकारला पत्रकारांनी धरले धारेवर* ; *पत्रकार सन्मान योजनेबद्दलचा असंतोष  आला उफाळून ......!*                                          मुंबई, न्यूज ब्युरो    महाराष्ट्र विधानमंडळात जाहीर करण्यात आलेल्या अंतरीम अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शंभुराज देसाई, संजय बनसोडे हे अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात अर्थसंकल्प मांडल्यानंतर विधानभवनातील पत्रकार कक्षात आले.  राज्यातील सर्वच घटकांना न्याय देणारा अंतरिम अर्थसंकल्प असल्याची स्तुतीसुमने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या वर उधळीत असतांनाच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि कार्यवाह प्रवीण पुरो तातडीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या दिशेने गेले.  सर्व घटकांना न्याय मिळाल्याचे आपण सांगताहात परंतु पत्रकारांना न्याय मिळालेला नाही,  अशा शब्दांत जोरदार तक्रार केली. बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना तसंच

आरसा...@विनोद देशमुख -------------जरांगे, विरोधक आणि सरकार

Image
🍳 आरसा...@विनोद देशमुख ------------- जरांगे, विरोधक आणि सरकार महाराष्ट्रातील सर्वसामान्य मराठाजनांना मोठ्या प्रमाणावर संघटित करून १० टक्के का होईना, आरक्षण पदरात पाडून घेण्याची  किमया दाखविणारे पहिले मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष संपण्याचं नाव घेत नाही. मूळ मागणी मान्य झाल्यावरही हा प्रश्न सुटलेला नाही. जरांगे आणि विरोधी पक्ष यांनी निर्णयानंतर केलेलं घूमजाव याला कारणीभूत असल्याची जनमानसाची भावना आहे. वास्तविक, १० टक्के आरक्षणाचं संपूर्ण श्रेय घेऊन (जे त्यांचं एकट्याचंंच आहे) जरांगेंना अधिकसाठीचा लढा नंतर उभारता आला असता. तो मार्ग न पत्करता त्यांनी १० टक्के आरक्षणच संशयात काढलं आणि ओबीसी कोट्यातूनच आरक्षण देण्याचा हट्ट कायम ठेवला आहे. त्यामुळे तिढा सुटण्याऐवजी वाढत चालला. १० टक्के आरक्षण न्यायालयात टिकेल याची हमी काय, असा जरांगेंचा आणि विरोधकांचा प्रश्न आहे.‌ देवेन्द्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेलं १६ टक्के आरक्षण हायकोर्टात टिकलंच होतंं ना. पण, सुप्रीम कोर्टानं ते सबळ पुराव्याअभावी नाकारलं. तो अनुभव लक्षात घेऊन यावेळी सरकारनं राज्य मागास वर्

*वास्तविकतेचे एक अतिशय सुंदर चित्रण,*

Image
 * वास्तविकतेचे एक अतिशय सुंदर चित्रण ,* कृपया वाचा.. आणि समजून घ्या. * दीपक देशपांडे*   *✍️ Ddbatmiportalm2m ✍️* न्यूज डेस्क. एकदा, १० मित्र ज्यांपैकी काही अति गरीब, काही मध्यम गरीब, काही मध्यमवर्गीय होते आणि काही समृद्ध होते... ते सर्व जेवायला एका रेस्टॉरंटमध्ये गेले.. *१०/-₹ प्लेट प्रमाणे बिल १००/- रुपये आले..* 👉🏻हॉटेल मालकाने ठरवले की हे आपले नियमित ग्राहक असल्याने त्यांना  त्यांच्या बिलाची वाटणी "देशाच्या कर प्रणालीशी सुसंगत असेल. अशा प्रकारे - 👉🏻पहिले "४अत्यंत गरीब"..... *मोफत* 👉🏻पाचवा 'गरीब'.................. *१₹* 👉🏻६ वा "मध्यम गरीब"…….... *३₹* 👉🏻७ वा "निम्न मध्यमवर्ग"....... *७₹* 👉🏻८ वा "मध्यमवर्ग".............. *१२₹* 👉🏻९ वा "उच्च वर्ग"................ *१८₹* 👉🏻१० वा "अतिशय उच्च वर्ग".. *५९₹* *दहाही मित्रांना ही व्यवस्था आवडली आणि ते एकाच रेस्टॉरंटमध्ये जेवू लागले..* 👉🏻या दहा जणांना रोज येताना पाहून ढाब्याचा मालक म्हणाला - "तुम्ही माझे इतके चांगले ग्राहक आहात, म्हणून मी तुम्हाला एकूण

हा तर निव्वळ निवडणूक स्टंटच! ग्राहक राजा जागा हो!

Image
ब्रेकिंग न्यूज!हा तर निव्वळ निवडणूक स्टंटच! ग्राहक राजा वेळीच जागा हो! दीपक देशपांडे. दिनांक २६/०२/२०२४च्या सायंकाळी एक बातमी ब्रेकिंग न्यूज सह प्रसिद्ध झाली.  *ब्रेकिंग न्यूज* *शेतकऱ्यांना आनंदाची बातमी* *राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार (शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी कांग्रेस) यांच्या महायुतीच्या सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपयांचे बोनस जाहीर केले असून आधारभूत केंद्रावर कुणी धान विको अथवा नको ज्यांनी नोंदणी केली अश्या सर्व शेतकऱ्यांना बोनस जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आंनद पसरला असून या महायुतीच्या सरकारचे शेतकऱ्यांनी अभिनंदन केले आहे.* त्यावर पहिली प्रतिक्रिया उमटली ती अशी...  महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला असुन या माध्यमातून धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब,राज्याचे कॅॅबिनेट मंत्री छगन भुजबळ साहेबांचे शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळल्याबद्दल मनपूर्वक आभार 🙏            आभारकर्ते राष्ट्रवादी क

आरसा...@विनोद देशमुख --------------एक तुतारी द्या मज आणुनि...

Image
 🍳 आरसा...@विनोद देशमुख --------------एक तुतारी द्या मज आणुनि... काका शरद पवार यांच्या मालकीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुतण्या अजितदादा पवार यांनी केलेल्या महाबंडामुळे निर्माण झालेला "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरच्चंद्र पवार" आता नव्या पक्षचिन्हासह मैदानात येत आहे.  निवडणूक आयोगाने घड्याळ हे मूळ पक्षचिन्ह पुतण्याला दिल्यानंतर, आता काकाच्या मूळ गटाला तुतारी फुंकणारा माणूस हे नवे चिन्ह देऊ केले आहे.‌ परिणामी राष्ट्रवादीचे दोन आवाज यापुढे वाजतील-घड्याळाची टिकटिक अन् तुतारीचा आवाज.  काय दिवस आले पाहा.‌ घराचे वासे फिरतात म्हणे. येथे घड्याळाचे काटे फिरले😀 अन् तुतारी हाती आली. बसा फुंकत. केशवसुत लिहून गेले आहेत- एक तुतारी द्या मज आणुनि फुंकिन मी जी स्वप्राणाने जितेन्द्र आव्हाड वगैरे मंडळींना आता तुतारी फुंकत फिरावे लागणार आहे. निवडणुकीत मते मागायची आहेत ना. नवीन चिन्हाचा प्रचार करावाच लागेल. आघाडीवरची नेते मंडळीही हातात तुताऱ्या घेऊन फुंकताना जागोजागी दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारणात प्रस्थापित पक्ष आणि चिन्ह बदलले की थोडे जडच जाते. सहानुभूतिदार अन् मतदार यांच्य

आरसा...@विनोद देशमुख ---------------सुप्रियाचं 'मुख्यमंत्री' पद🤔

Image
  🍳 आरसा...@विनोद देशमुख --------------- सुप्रियाचं 'मुख्यमंत्री' पद🤔 शरद पवार स्थापित राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात पुतण्या अजितदादानं महाबंड केल्यामुळं साहेब आणि कन्या हादरले आहेत. आणि, प्रतिष्ठा सावरण्यासाठी बरंच काही बोलत आहेत. आपलं बोलणं कधी विसंगत होतं, तर कधी हास्यास्पद बनतं याचं भानही आता त्यांना राहिलेलं नाही, असं जाणवायला लागलं आहे. परवा भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनात घराणेशाहीवर हल्ला चढविताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले- "सोनियाजीको बेटेको पीएम बनाना है... शरद पवारजीको बेटीको सीएम बनाना है..." हे तसं राजकीय विधान आहे. त्याची दखल कोणी किती घ्यायची जे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हातून गेलेले पवार मात्र शहांच्या या अभिप्रायानं कळवळले आणि खुलासा करते झाले- "अहो शहा, माझी मुलगी आमदार नाहीय्. ती खासदार आहे, खासदार." या खुलाशाचे तीन अर्थ निघतात. पहिला, फक्त आमदारच मुख्यमंत्री बनू शकतो. दुसरा, खासदार मुख्यमंत्री बनू शकत नाही. तिसरा, खासदारानं पंतप्रधानच बनायचं असतं😀 हे तीनही अर्थ लक्षात घेतले तर पवारांच्या प्रदीर्घ अर

मूलमध्ये संत रविदास जयंती उत्सव धुमधडाक्यात साजरा

Image
  मूलमध्ये संत रविदास जयंती उत्सव धुमधडाक्यात साजरा  दीपक देशपांडे  शनिवार दिनांक २४/०२/२०२४  रोजी  मूलमध्ये सोमनाथ मार्गावर संत रविदास जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला व्यासपीठावर रमेशजी मंडाले, राहूलजी अलमस्त ,प्रेस क्लब मूलचे अध्यक्ष दीपक देशपांडे, प्रा.किरण कापगते,माजी नगरसेविका  सुनिता तुळशीराम बोलीवार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे पहिले पुष्प गुंफताना दीपक देशपांडे यांनी,संत रविदास यांच्या जयंती उत्सवाच्या आयोजनाचे स्वागत केले आणि त्यांच्या कार्याची महती विदित करतांना चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात १३७७ मध्ये एका अतिशय गरीब कुटुंबात जन्माला  आलेल्या आणि  १६२८ साली त्यांच्यावर  भ्याड  हल्ला  करुन त्यांचे जीवन  संपुष्टात  आणले गेले ,यांची माहिती दिली. मात्र या  संतांनी आपल्या जीवनकार्याची दिडशे वर्षांची तपस्या  आणि हा काळ हिंदू धर्म रक्षणासाठी आपले आयुष्य  जगताना कित

एक लेख आपल्यासाठी! आरोग्यम धनसंपदा.

Image
  एक लेख आपल्यासाठी! आरोग्यम धनसंपदा. कोणत्या धातूच्या भांड्यात अन्न खाल्ल्याने कोणते फायदे आणि हानी होतात? सोने चांदी कांस्य तांबे पितळ लोखंड स्टील ॲ ल्युमिनियम माती सोने सोने एक गरम धातू आहे. सोन्याच्या भांड्यात अन्न तयार करून खाल्ल्याने शरीराचे अंतर्गत आणि बाह्य दोन्ही भाग कठोर, मजबूत आणि ताकतवर होतात. तसेच सोन्याच्या भांड्यात आहार घेतल्याने दृष्टी वाढते. चांदी चांदी हा एक शीत धातू आहे, जो शरीराला आंतरिक शीतलता आणतो. शरीर शांत राहते. त्याच्या भांड्यात अन्न तयार करून खाल्ल्याने मन तीक्ष्ण होते, डोळे निरोगी राहतात, दृष्टी वाढते आणि याशिवाय पित्तदोष, कफ आणि वायू दोष नियंत्रित होतात. कांस्य कास्याच्या भांड्यात अन्न खाल्ल्याने बुद्धी तीक्ष्ण होते, रक्तात शुद्धता येते, रक्तपित्त शांत होते आणि भूक वाढते. परंतु आंबट वस्तू कास्याच्या भांड्यात देऊ नयेत, आंबट वस्तू या धातूवर प्रतिक्रिया देऊन विषारी बनतात ज्यामुळे नुकसान होते. कास्याच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने केवळ 3% पोषक घटक नष्ट होतात. तांबे तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने माणूस रोगमुक्त होतो, रक्त शुद्ध होते, स्मरणशक्ती चा

संत गाडगेबाबा जयंती निमित्ताने....

Image
  संत गाडगेबाबा जयंती निमित्ताने.... दीपक देशपांडे  मूल शहरातील नामांकित आँनलाईन आपले सरकार केंद्र प्रगती काॅम्प्युटरचे वतीने आज   दिनांक २३फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा जयंती निमित्ताने एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मूल शहरातील प्रेस क्लब चे अध्यक्ष दीपक देशपांडे,विजय सिद्धावार, प्रकाश  चलाख , कुमुदिनी भोयर,व तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष युवराज चावरे इतर सदस्यांच्या प्रमुख  उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन सोहळा पार पडला.या सोहळ्याचे सुत्रसंचालन  व आभार प्रदर्शन प्रमोद मशाखेत्री यांनी केले. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आयोजनाचा उद्देश उत्तम असल्याचे व कुठेतरी संतांच्या शिकवणुकीचा फायदा जनतेला करुन देण्यासाठी आजही कुणी प्रयत्न करतात आहे ही कल्पनाच कौतुकास्पद असल्याचे मत दीपक देशपांडे यांनी मांडले . संत महंतांच्या शिकवणुकीचा खरा फायदा विदर्भाच्या विकासासाठी कसा करायचा आणि त्यांच्या शिकवणुकीचा विचार करीत त्यांची जयंती शासकीय स्तरावर महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यस्तरावर मनवल्या जात नसल्याची खंत विजय सिद्धावार यांनी आपल्या वक्तव्यातून पुढे मांडली. युवराज चावरे यांनी सं

आता कोचिंग क्लासेस ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंमलाखाली.

Image
  महाराष्ट्र  राज्यातील कोचिंग क्‍लासेस आता ग्राहक संरक्षण कायद्यानुसार  रडारवर  मुंबई:-न्यूजब्युरो. दहावी -बारावी सह इतरही स्पर्धात्मक परिक्षांचे   निकाल जाहीर होताच, टाॅपर विद्यार्थी हा आमच्‍याच क्‍लासचा असल्‍याचा दावा अनेक खासगी कोचिंग क्‍लासचालक करतात. खोट्या जाहिरातीमुळे विद्यार्थी व पालकांची फसगत होते. त्‍या पार्श्वभूमीवर आता खोट्या जाहिरात करणाऱ्या कोचिंग क्‍लासेसवर ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या अंतर्गत कारवाई होणार आहे. . ग्राहक संरक्षण नियामकाने कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी मसुदा मार्गदर्शक तत्त्वांवर १६ मार्चपर्यंत सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. ग्राहक संरक्षण नियामकाने कोचिंग संस्था, कायदा संस्था, सरकारी आणि स्वयंसेवी ग्राहक संस्थांसह सर्व भागधारकांशी तपशीलवार सल्लामसलत केल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा तयार केला आहे. मार्गदर्शक तत्त्वे कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून ग्राहकांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने आहेत. कोचिंगमध्ये गुंतलेल्या कोणालाही ते लागू होतील. कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचे निय

आरसा...@विनोद देशमुख -नेहरू-गांधी अन् राज्यसभा

Image
  🍳आरसा...@विनोद देशमुख --------------------------------------नेहरू-गांधी अन् राज्यसभा काँग्रेसच्या राजकारणात आणि देशाच्या सत्ताकारणात जास्तीत जास्त काळ हुकमत गाजविणाऱ्या नेहरू-गांधी घराण्याच्या वारसानं राज्यसभेच्या "मागच्या दारानं" संसदेत जावं, हे योग्य झालं का ? अशी पाळी त्यांच्यावर का यावी ? काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी राजस्थानातून राज्यसभेवर अविरोध निवडून गेल्यामुळं हे प्रश्न राजकीय अभ्यासकांना पडले आहेत आणि त्यातून काँग्रेस पक्षाच्या दु:स्थितीबद्दल अनेकांना चिंता वाटू लागली आहे. सोनिया गांधी या नेहरू-गांधी घराण्याच्या थेट वंशज नसल्या तरी, सून आहेत आणि त्याच अधिकारातून काँग्रेसच्या कर्त्याधर्त्या आहेत. गेली २५ वर्षे त्या लोकसभेच्या सदस्य आहेत. घराण्याच्या परंपरागत अमेठी मतदारसंघातून पहिल्यांदा आणि नंतर रायबरेलीतून चारदा त्या निवडून आल्या. येत्या लोकसभा निवडणुकीतही त्या तेथूनच लढतील, असं वाटत असतानाच, अचानक राज्यसभेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर झाली; तीही उत्तर प्रदेशाऐवजी राजस्थानातून आणि अविरोध निवडून येत त्या पुन्हा, सहाव्यांदा खासदारही बनल्या. पण हा बदल दिसतो तेवढा सर