Posts

Showing posts from March, 2023

संप, आंदोलन, तोडगा,कारणे, भाग २

Image
संप, आंदोलन, तोडगा,कारणे, दुसरी बाजू. भाग २ दीपक देशपांडे महाराष्ट्र राज्यात शासकीय, निमशासकीय कर्मचारी दिनांक १४ मार्च रोजी आपल्या काही मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संपावर गेले. संप सुरू झाला ,राज्यभरात तहसील कार्यालय आणि जिल्हा कार्यालयात कर्मचारी गोळा होऊन नारेबाजी ,गाणे गाणे ,थाळी वाजवणे ,निवेदने, भाषणे सुरु झाली. मागण्यांची यादी तयार झाली ,ब्यानर लागले ,आपापली कार्यक्षेत्र सोडून ,काही ठिकाणी अगदी वाऱ्यावर सोडून हे कर्मचारी तहमीलच्या दिशेने धावत पळत सुटले आणि तेथे पोहोचल्यावर सभामंडपात बसून त्रास आला म्हणून बाहेर चहाटपऱ्या आणि तहसील परिसरात भिरभिरु लागलेत .कुणी आपल्या पोराबाळांसाठी वेगवेगळी कागदपत्रे तयार करून घेण्यासाठी आपले सरकार केंद्रावरही गर्दी केली. कुणी शेतीभातीची कामे ,कुणी घराची कामे ,कुणी कुठली कामे तर कुणी सैर तर कुणी ट्रिप काढली, त्याची मजा घेतली तर कुणी बिअर बारची सैर केली. शाळेत शिक्षणाचे धडे घ्यायला येणारी मूलेमुली   गुरुजी शाळेत नाहीत म्हणून कुणी गावात उंडरली तर कुणी शेतात आईवडिलांना मदत करायला शेतात गेली तर काही ठिकाणी गावातील पालकांनी लोकप्रतिनिधींनी शिक्षणाची

संप,आंदोलन, तोडगा, कारणे.

Image
 संप,आंदोलन, तोडगा, कारणे भाग१ दीपक देशपांडे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतःराज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री  एकनाथ संभाजी शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे जाहीर केले. यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना व सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटनांच्या वतीने दिनांक १४ मार्च, २०२३ पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तसेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या वतीने देखील दिनांक २८ मार्च, २०२३ पासून संपावर जाण्याबाबत राज्य शासनाला नोटीस दिलेली आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्य सचिव व माझ्या स्तरावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला कर्मचारी व राजपत्रित अधिकारी संघटनांनी सक