Posts

Showing posts from October, 2022

दिवाळी व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

Image
  दिवाळी व नववर्षाच्या, समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा. सुधीर मुनगंटीवार, मंत्री,वने, सांस्कृतिक मंत्रालय तवा मत्स्य व्यवसाय.महाराष्ट्. https://youtu.be/7pJnWVUQXWQ https://youtu.be/7pJnWVUQXWQ

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

Image
   दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दीपक देशपांडे ,  Ddbatmiportalm2M,   m2Mnewsportal   यांच्या वतीने समस्त चाहते ,वाचक आणि हितचिंतक व समस्त विरोधकांना दिपोत्सवाच्या व येणाऱ्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎉💐.

मालधक्का! मालधक्क्याचा धक्का की मालधक्क्याला धक्का!!*

 *मालधक्का! मालधक्क्याचा धक्का की मालधक्क्याला धक्का!!* * दीपक देशपांडे * * दिव्याखालीच अंधार भाग २* सुरजागड येथील लोहखनिज वाहतूक व मूल येथील मालधक्का व त्याविरोधात मूल येथील पत्रपरिषदेत जे रणशिंग फुंकले गेले होते त्याला व्यापक प्रसिद्धी मिळाली आणि मालधक्का हटाव  ही लोकचळवळ म्हणून पुढे आली आणि यात सर्वपक्षीय छोट्या मोठ्या नेतेमंडळींनी आपला सहभाग नोंदविला मात्र श्रेय नामावलीत आपले नाव पुढे यावे यासाठी *मार्निंग वाॅक गृप* सोबतच *मूल शहर बचाव संघर्ष समिती गृपची* निर्मिती झाली. या गृपची लिंक शेअर केली होती त्यामुळे उत्सुकतेपोटी अनेक जण या गृप मध्ये समाविष्ट झाले, काही जोडले गेले ,काही नवीन अॅडमीन बनवले गेले आणि नवनवीन सदस्य जोडले गेले व खरा संघर्ष सुरू झाला. मूल येथील मार्नींग गृपच्या सदस्यांनी घेतलेली भूमिका आणि मूल शहर बचाव संघर्ष समितीच्या सदस्यांनी मूल येथील *प्रस्तावित मालधक्का* तयार झाल्याने, लोहकण फुफ्फुसांवर घातक परिणाम करतील व  मूलच्या जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची  शक्यता  आणि मूल परिसरातील पर्यावरण प्रदुषणामुळे शेती उत्पादन व वृक्षवल्लींवर परिणाम होण्याची शक्यता आणि

मालधक्क्याला धक्का की मालधक्याचा धक्का?

Image
 * दिव्याखालीच अंधार* भाग १. सिमोलंघन .............! मालधक्क्याला धक्का की मालधक्याचा धक्का? मूल शहरात मागील काही दिवसांपासून एक विषय प्राधान्याने चर्चेत आला आहे, त्यांचे नाव आहे *मालधक्का*. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड खाणीतील लोहखनिज देशातील विविध भागात पाठविण्यासाठी ह्या लोहखनिजाची वाहतूक खाणीतून रेल्वे स्टेशन पर्यंत ट्रकद्वारे आणून तेथे डंपिंग यार्ड बनवून तेथून रेल्वेने पुढिल वाहतूक करण्याचे ठिकाण म्हणजे *मालधक्का*. रेल्वे मंत्रालयाने सुरजागड वरुन येणारे लोहखनिज वाहून नेण्यासाठी जवळचे स्टेशन म्हणून *मूल स्टेशनची* निवड केली आवश्यक ती सगळी कार्यवाही पूर्ण झाली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची वेळ आली, तोपर्यंत मूल नगरातील फारच थोड्या लोकांना याची माहिती असावी परंतू ती बाहेर पडली नव्हती की पडू दिली गेली नव्हती ? हा अभ्यासपूर्ण स्वतंत्र विषय आहे हे सांगणे तेवढेच महत्त्वाचे आहे. काही खाजगी कंपन्या आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी गावापासून थोडे दूर व डंपिंग साठी भरपूर जागा उपलब्ध असलेल्या मूल रेल्वे स्टेशन ला डंपिंग यार्ड बनविण्यासाठी काही दिवसांपूर्वी कामाला सुरुवात केली .ही बाब मूल रे

मूल नगर प्रशासनाचे स्मशानभूमीतील विद्यूत व्यवस्थेकडे दूर्लक्ष?*

 * सिमोलंघन * * मूल नगर प्रशासनाचे स्मशानभूमीतील विद्यूत व्यवस्थेकडे दूर्लक्ष?* मागील वर्षी कमीअधिक याच दिवसांत श्रेयनामावलीत अग्रेसर असणाऱ्या एकातरी स्थानिक नेत्याला आजच्या दिवशी मूल नगरातील लाखो रुपये खर्च करून विकसित केलेल्या उमा नदी किनाऱ्यावरील स्मशानभूमीकडे लक्ष द्यायला वेळ आहे काय? स्मशानभूमीत असलेल्या विंधन विहिरी सभोवती वाढलेल्या गवतामुळे त्याचा वापर केला जातो काय? लाखोंच्या घरात खर्च करून मागील वर्षी आरडाओरडा झाल्यावर सुरू करण्यात आलेल्या विद्यूत व्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ आहे काय? मागील वर्षी नवीनच आलेल्या मुख्याधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन साफसफाई करून घेतली होती आता दरवर्षी यांची आठवण मीच करुन द्यावी अशी तर नगरप्रशासनाची इच्छा नसेल ना? खरं तर आता निवडणुका तोंडावर आल्या असताना या अशा छोट्या वाटणाऱ्या परंतू जनहिताच्या समस्या कुणालाच दिसू नयेत आणि त्या सुटाव्यात म्हणून प्रयत्न केला जाऊच नये ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. नगरांत बऱ्याच समस्या असतील आणि त्या सुटाव्यात म्हणून प्रयत्न करणारेही अनेक आहेत पण गावापासून दूर असणाऱ्या या स्मशानभूमीत असलेल्या दुरावस्थेकडे कुणितरी लक्ष द

*विजयादशमी, दसरा आणि सिमोलंघन*

* विजयादशमी * आणि......  * सिमोलंघन * साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. आजच्या दिवशी मी फक्त विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 देतोय. आजच्या स्थितीत मर्यादा पाळण्याचा प्रयत्न. असत्य आणि दूराचारावर सत्य आणि प्रामाणिकपणाचा विजय दिवस,या दिवशी सिमोलंघनाचीही मर्यादा पाळण्याचा प्रयत्न . संस्कृती आणि संस्कार यांचे पालन करणे आवश्यक आहे. दीपक देशपांडे.

सिमोलंघन

  सिमो लंघन आम्ही उद्या दिनांक ५/१०/२०२२रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर आमच्या प्रत्येक कार्याचे *सिमोलंघन* करुन त्यातून मिळालेल्या अनुभवाची दारे उघडीत , आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत सडेतोड भाषेतील  आमच्या शैलीत लिखाणाला नवीन आयाम देत आपल्या सेवेत पुनरागमन करणार आहोत. आमचे पुनरागमन कुणाला कसे वाटणार याची आम्ही काळजी करणार नाही पण समाजात सुरु असलेल्या अनेक चांगल्या वाईट घटना आणि प्रसंग , व्यक्ती आणि विशेष आयोजन यांची खबरबात तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आम्ही करीत राहायचं असा निर्णय घेतला आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ह्या सिमोलंघनातून एक नवीन विचारप्रवाह आणि सामाजिक जाणीव आपल्या समोर ठेवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. दीपक देशपांडे. दिनांक ४ऑक्टोंबर २०२२