अनिश्चिततेच्या सावटाखाली जगताना...

 दीपक देशपांडे.

मागील वर्षी कोरोना (कोविड१९) चा प्रादुर्भाव झाल्यावर जगभर एक अनामिक भिती प्रत्येकाच्या मनात घर करून बसली होती.परिणामी नेमकं काय करायचं, आणि निघणारा उद्याचा दिवस काय घेऊन पूढे येणार हे माहितच नव्हतं मात्र जणूकाही अचानक होत्याच नव्हत झालं आणि कुणाजवळ खाण्यापिण्याची काही सोय नसल्याप्रमाणे जो तो मदतीचा हात पुढे करून आपल्या सामाजिक दायित्वाची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत होते.

शासनाने सुद्धा आपली कोठारे अशी काही रिकामी करायला सुरुवात केली की लाभार्थ्यांना मिळणारे धान्य कुठे ठेवू आणि त्यांचे काय करु असा प्रश्न काही दिवस निर्माण झाला होता.एकएक दिवस पुढे ढकलत होता कोरोनाचे संकट अधिकाधिक तिव्र व्हायला लागले बाधितांची संख्या वाढली त्यांच्यासाठी नवनवीन सुखसुविधा युक्त रुग्णालये ,मोफत औषधोपचार, खाण्यापिण्याची सोय करण्यात आली.

याही परिस्थितीत रुग्णालयात उपचार घेणारे जणूकाही सैर करायला गेल्याप्रमाणे रुग्णालयात दाखल होऊ लागले मात्र त्यांच्या निवासस्थानी घरची मंडळी आणि त्या परिसरात निवास करणारी व त्यांच्या संपर्कात आलेली मंडळी मनात भिती बाळगून तपासणी केंद्रावर दाखल होऊ लागली होती, त्यावेळी सगळ्यांनी जणू बाधित झालेल्या व्यक्तीने फार मोठा गुन्हा केला आहे अशा नजरेने बघायला सुरुवात केली.प्रसार माध्यमातून सुद्धा भरभरून लेखन केले जाऊ लागले आणि शेवटी वर्तमानपत्रांवर छपाई व वाटपावरही बंधन आणले होते, परिणामी या वर्तमानपत्रात काम करणाऱ्या छोट्या मोठ्या पत्रकारांवर ही संक्रांत आली आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या नौकरी वर गदा आली.

एकीकडे ही स्थिती तर दुसरीकडे घरापासून शेकडो मैल दूर असलेल्या आपल्या कामाच्या ठिकाणी अडकलेल्या कामगारांना आता खऱ्या अर्थाने राहण्याची खाण्याची सोय करणे कठीण होऊ लागले व नाईलाजाने आपल्या कच्च्चा बच्यांना घेऊन घराच्या दिशेने कूच करणे भाग पडले.

याही परिस्थितीत मार्गस्थ पथिकांना भोजनाची व निवासाची व्यवस्था काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन केली होती तर काही ठिकाणी अन्नपाण्याविना कित्येक किलोमीटर अंतर हे पथिक अहोरात्र मजल दर मजल करीत कापणी राहीले.मुख्य मार्गावर पहारा असल्याने आडमार्गाने हे पथिक चालतच राहिले. गाठी बांधलेला पैसाअडका संपेपर्यंत ते वाटचाल करीत राहिले,कुठे प्रशासन कुठे गावकरी तर कुठे सामाजिक संस्था मदतीला धावून आल्या तर कुठं हीच मंडळी रस्ता रोको करीत मार्गातील अडथळा बनली.

दिवस पुढे पुढे सरकत होते शासनव्यवस्था पुरती कोलमडून जाते की काय असे वाटत असतानाच विरोधक अधिक आक्रमकपणे शासन, शासकीय निर्णय यांवर टिका करत यातही राजकारण करु लागले तर काही मंडळी शासकीय मदत जणू ते स्वतः करीत असल्याच्या थाटात फोटो सेशन करीत चमकोगिरी करीत करु लागली होती.

रुग्णालयात दाखल बाधित रुग्ण कुठल्याही प्रकारची औषधी न देता घेता काढा ,गरम पाणी, पॅरासिटॅमाल गोळ्या घेऊन बरी होऊन घरी  जणू पाहुणचार घेऊन परतू लागली होती तिथेही औषधोपचार झाले नाही,जेवणाखाण्याची , राहण्याची सोय चांगली नव्हती वगैरे प्रतिक्रिया उमटतच होत्या.

भारतीय वातावरण व उन्हाळ्यात उष्ण वातावरणात कोरोनाचे विषाणू टिकूच शकणार नाही हा भ्रम आहे असे दृश्य बघायला मिळू लागले, रुग्णालयात जागा कमी पडू लागली व बाधितांची संख्या वाढली तसतसे मदतीसाठी पुढे सरसावलेली मंडळी कमीकमी होऊ लागली सारी अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे अशा स्थितीत पावसाळ्यात तर ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती.

ग्रामीण भागातील जनता कुठचा करोना आणि कुठचा काय?तो करोना शहरात आहे, आमच्याकडे नाही म्हणत ह्या रोगाची टिंगल टवाळी केली जात होती. हळूहळू पावसाळ्यात सगळे जण शेतीच्या कामात व्यस्त होते आणि याचदरम्यान पून्हा बाधितांची संख्या वाढली मात्र लाकडाऊन संपून अनलाॅकला सुरुवात झाली होती. यादरम्यान बरेच संशोधन झाले व यावर लस व औषधोपचार उपलब्ध झाल्याचा दावा केला गेला होता. 

उर्वरित पुढिल भागात....


Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

गावातील वादातून वाघाचा शिकारी अडकला जाळ्यात!