*रेतीतस्करीला लगाम घालण्यासाठी पुन्हा एक धाडसत्र*

 *रेतीतस्करीला लगाम घालण्यासाठी पुन्हा एक धाडसत्र*

*सावली पोलिसांची कारवाई; एकूण १६ लाखांवर मुद्देमाल जप्त*

दीपक देशपांडे 

मूल पासून अवघ्या १२किलोमिटरवर असलेल्या सावली तालुक्यातील उसेगाव वैनगंगा नदी घाटावर अवैध्य रेतीची वाहतूक अनेक दिवसापासून सुरू होती. परंतु संबंधित विभाग डोळेझाक करीत असल्याचे चित्र दिसत होते. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका  सुदर्शन यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये वैयक्तिकरीत्या अवैध्य रेतीची वाहतूक करणाऱ्या रेती माफियाच्या विरोधात कारवाई करण्याचा धडाका सुरू केलाआहे.

दोनच दिवसांपूर्वी मूल तालुक्यातील गोंडसावरीत अंधारी नदिघाटातून रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या तिनं हायवासह एक बोलेरो आणि एक पोकलेन मशिनसह दिड करोडहून अधिकच्या वस्तू जप्त करण्यात पुढाकार घेतला होता .


त्यात  दि. २२ मार्चला सकाळी नऊच्या सुमारास सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी गस्त टाकली असता तीन रेतीने भरलेली ट्रॅक्टर आढळून आले, त्यात एमएच३४ एपी ०१२७ सुनील केशव बोमनवार राहणार सावली (मालक) ईश्वर जांभुळे (चालक) एमएच ३४ एम ५६ ७२ सतीश कोतपल्लीवार मालक दिलीप राऊत (चालक) एमएच ३४ बीआर ३९३२ सुजित भगवान दंडावर राहणार खेडी (मालक) नितीन गेडाम (चालक) संबंधित चालक- मालक यांचेवर आयपीसी ३७९ अंतर्गत गौण खनिजाची रेती चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, त्यात त्यांच्याकडून एकूण १६ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अशा या धाडसत्रामुळे  अवैधरीत्या रेतीतस्करीला चांगलाच लगाम लागणार असून याबाबत सखोल चौकशी झाल्यास मोठे मासेही गळफास लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर या कार्यवाहीमुळे रेतीतस्कर भयभीत झाले आहेत.

एका अधिकाऱ्याने ठरविले तर काय होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण असल्याची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली असून  या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. आजवर हे तस्कर कुणालाच कसे सापडत नव्हते याबाबत देखील संशय व्यक्त केला जात आहे , आणि मूलमधील बैलबंडीने अत्यंत चढ्या भावाने होणारी रेती वाहतूक सुद्धा या चमूने नजरेखालून घालण्यासाठी खरा प्रयत्न करावा अशी मागणी मूलमधील जनता करीत आहे.


सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांचे मार्गदर्शनात सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरू यांचे नेतृत्वात पीएसआय सचिन मुसळे हवालदार संजय शुक्ला, चंद्रशेखर विदुरकर द्वारे करण्यात आली.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*


Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*