:*चंद्रपूर लोकसभा १५उमेदवार निवडणूक रिंगणात*

*चंद्रपूर लोकसभा १५उमेदवार निवडणूक रिंगणात! निवडणूक चिन्ह वाटप.*

*दीपक देशपांडे मूल*

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी काल दिनांक  ३०रोजी उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले असून एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज परत घेतला नाही.. त्यामुळे  या सर्वांना निवडणूक चिन्ह वितरीत करण्यात आले....

या चिन्ह वाटपात  फार गंमतीदार असा विचित्र योगायोग बघायला मिळतोय, बघाच


 .......कुणाच्या वाट्याला आलाय हात,कुणी हातात घेतलीय बॅट,कुणी कुणाच्या स्वप्नांवर चालवला रोडरोलर ,कुणी वाजवली शिटी तर कुणी आणलाय गॅस सिलिंडर ,कुणी हत्तीवर स्वार तर  या दलदलीत ही कुणी फुलवलाय कमळ ,कुणी अंगठी घालून तर कुणी फळांची बास्केट घेऊन येतोय तर कुणी टायर घेऊन येतोय तर कुणी  कोट घालून तर कुणी आटो रिक्षा घेऊन शेवटी कुणी पेन आणि निब घेऊन... सप्तरंगी उधळण करण्याचा प्रयत्न करणार....शेवटी आपल्यालाच हे वृत्त लिहायचे आहे ह्याचे भान ठेऊन.... कुणी दूरदर्शन संचावर दाखवतोय आतापर्यंत च्या घडामोडी तर कुणी आरी ने कापायला निघालाय सगळीच स्वप्नं आपली आणि इतरांचीही..

मतदार राजा जागा हो , तुझ्यामुळे आणि तुझ्याचसाठी ही निवडणूक आहे त्याचा कुणाला गैरवापर करुन देऊ नकोस आणि,., मला काय त्याचे म्हणत मतदानाचा हक्क टाळू नकोस ...!

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*