निवडणूक समरांगणातील लढवय्ये!

 निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....१.

दीपक देशपांडे 


१३-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी १५उमेदवार दंड थोपटून समरांगणात उतरले आहेत , यापैकी केवळ ३ महिला उमेदवार म्हणून रिंगणात आहेत तर १२पुरुष उमेदवार रिंगणात आहेत. टक्केवारी काढायची ठरवलीच तर केवळ २०%.
एकीकडे महिला व पुरुषांना समसमान अधिकारांची मागणी केली जात असतांना  देशातील महिला (राखीव ) मतदारसंघाची गोष्ट थोड्या वेळासाठी बाजूला ठेवली तरी उर्वरित  मतदारसंघात समसमान संधी  असतांना या निवडणुक समरांगणात महिलांनी पुढाकार घेऊन निवडणूक लढण्याची तयारी कां करु नये? असा साधा सोपा सरळ प्रश्न विचारला गेला होता,त्याची आठवण झाली म्हणून हे लिहिणे गरजेचे वाटत आहे.

सत्ता आणि संपत्ती च्या विरोधात समरांगणात उतरलेल्या या १५ही उमेदवारांची या क्षेत्रात स्वतःची अशी ओळख असावी,ती त्यांच्या कार्यावरुन असा बऱ्याच मंडळींचा समज असावा,आहे ,पण तुमच्यासोबत कोण आहेत?हा प्रश्नही बऱ्याचदा तुमच्याकडे बघण्याचा सर्वसामान्य  जनतेचा दृष्टीकोन बदलायला भाग पाडतो, हे विसरून चालणार नाही.


या निवडणुक काळात तुम्ही व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात काय करता?,काय बोलता ,कसे बोलता? कसे वागता? यापैकी प्रत्येक गोष्टीवर दिसत नसेल  तरीही मतदारांची बारीक नजर असते ,हे विसरता कामा नये... आणि म्हणूनच तुम्ही उमेदवार म्हणून केवळ तुम्ही आजवर काय केलं , भविष्यात तुम्ही काय करणार आहात?हे पटवून देता आले तर बघणे ही महत्वाचे आहेना ? की दुसऱ्यांचे दोष दाखवत आपल्याच चुकांवर पांघरूण घालत‌ केवळ दुसऱ्यांवर आरोपांची तोफ डागत फिरायचे?

आम्ही मार्ग दाखवू शकतो त्या मार्गावर चालायचे की त्याला ठोकर मारत आपल्याच गुर्मीत राहायचे हे ज्याचे त्यांनीच ठरवायचे ,पण....

मतदार राजा जागा हो.

अशा लबाड आणि अविश्वासू उमेदवारांवर कितपत विश्वास  ठेवायचा आणि आपलीच फसवणूक  आपणच करुन घ्यायची?.....................

...विचारपूर्वक निर्णय घ्या.

पैसा, सत्ता  आणि समाजहित यांपैकी समाजाला काय हवंय?आपला निर्णय आपल्यालाच घ्यायचाय.

खरंय ना? भेटू लवकरच,दूसऱ्या भागात.....


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*






Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*