: *ब्रेकिंग* *ही लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची* प्रतिभा धानोरकर

*ब्रेकिंग*

*ही लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची* प्रतिभा धानोरकर

मूल दीपक देशपांडे


लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटनासाठी  मूल शहरात आगमन होताच स्थानिक  गांधी चौकात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन प्रचार कार्यालयाचे  उद्घाटन प्रसंगी बोलताना *ही लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची* आहे त्यामुळे  पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपापसातील भेदभाव विसरुन एकदिलाने प्रचार करुन महाविकास आघाडीचे उमेदवार यांचे पाठीशी उभे राहून मला भारताच्या सर्वोच्च सभागृहात आपली सेवा करण्याची संधी द्यावी त्यासाठी १ल्या क्रमांकाचे बटन दाबून मतदान करण्याचे आवाहन याप्रसंगी बोलताना रात्री उशिरा प्रतिभा धानोरकर यांनी केले.

प्रतिभा  धानोरकर यांचे मूल तालुका प्रचार कार्यालयाचे आज दिनांक ३१मार्च रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता उद्घाटन स्थानिक काॅंग्रेस भवन मूल येथे उद्घाटन करण्यात आले , याप्रसंगी कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यकर्ते संवाद कार्यक्रमात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत,माजी आमदार देवराव भांडेकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार, विनोद अहिरकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ सदस्य बाबासाहेब वासाने,यांचेसह कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना,आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते  भेदभाव विसरुन मोठ्या संख्येने उपस्थित होते,हे विशेष.

काॅंग्रेसच्या गटातील मतभेद आणि मतभेदाला फाटा देत झालेल्या या सभेमुळे नगरांत वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला असून याचा वेगवेगळा अर्थ काढला जातो आहे,त्याचा परिणाम मात्र काही दिवसांनी प्रत्यक्ष अनुभवता येईल अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*