नवनियुक्त उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी भगत यांची पत्रकारांनी घेतली भेट

 *नवनियुक्त उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी भगत यांची पत्रकारांनी घेतली भेट*

 दीपक देशपांडे 


मूल तालुका पत्रकार संघाचे वतीने नवनियुक्त उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी भगत यांची औपचारिक भेट घेऊन मूल तालुक्यातील वेगवेगळ्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली ,

याप्रसंगी मूल तालुक्यातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था व नवीन भागातील घरफोड्या वा चोरीचे प्रकाराबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली व शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आले.

या भेटीदरम्यान मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम, उपाध्यक्ष युवराज चावरे ,सचिव विनायक रेकलवार, चंद्रकांत मनियार व दीपक देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी मूल विषयी आपला अनुभव कथन करताना एकंदरीत मूल तालुका शांतताप्रिय असल्याने काम करताना आनंद वाटेल असे मत उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी भगत यांनी व्यक्त केले व  मूल तालुक्यातील विविध संघटना, वेगवेगळे पत्रकार संघाचे पदाधिकारी, भेट देऊन गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले व आपलेही सहकार्य लाभेल अशी अपेक्षा केली तसेच आम्हीही पूर्ण सहकार्य करु असे आश्वासन दिले.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*