*मूल येथे सूपरफास्ट गाड्यांना थांबा द्या, ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल शाखेची मागणी*

 *मूल येथे सूपरफास्ट गाड्यांना थांबा द्या, ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल शाखेची मागणी*

दीपक देशपांडे मूल.

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल  हे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर असून ,मूल ही तांदळाची मोठी बाजारपेठ आहे.  येथे वनसंपदा व गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असल्याने या नगरीचे महत्व फार मोठे आहे.

मूलपासून गडचिरोली ४०किमी,तर चामोर्शी २७किमी अंतरावर असून सिंदेवाही २७किमी अंतरावर आहे तर पोंभुर्णा सुद्धा २८किमी अंतरावर असून सावली तर अवघ्या १२किमी अंतरावर आहे ,म्हणजेच हे एक मध्यवर्ती ठिकाण असल्याचे वेगळे सांगण्याची गरज नाही.

मूल येथून  महाराष्ट्रातील वडसा, गोंदिया येथे,तर आंध्रप्रदेश व तेलंगणा येथे खरेदीसाठी व्यापारी मंडळी मोठ्या प्रमाणात  येजा करीत असतात  तर आंध्रप्रदेश कर्नाटक राज्यात कामाच्या शोधात मजूरही जात असतात तर छत्तीसगड , मध्यप्रदेश मधून मजूर इकडे कामासाठी येत असतात परिणामी  मूल शहरातून जाणाऱ्या सूपरफास्ट रेल्वेगाड्या जसे की, तिरुपती सुपरफास्ट एक्स्प्रेस , बल्लारपूर जबलपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस,यशवंतपूर कोरबा एक्स्प्रेस या गाड्या मूलमधून जात असल्याने या गाड्यांना मूलमध्ये थांबा मिळावा व जनतेला दिलासा दिला जावा अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल चे वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


केंद्रीय रेल्वेमंत्रालय,व विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना पाठविलेल्या पत्रातून ही मागणी करण्यात आली आहे.


मूलमधून दिवसभरात इतक्या मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असते , त्यामुळे नियमीत चालणाऱ्या बल्लारपूर गोंदिया व गोंदिया बल्लारपूर गाड्या कधीच आपल्या नियोजित वेळेत चालत नसल्याने या मार्गावर प्रवासी दिवसेंदिवस कमी होत चालले असून हा प्रवास सुखकर होण्याऐवजी तापदायक होऊ बघत आहे ,या गाड्याही नियोजित वेळेत चालवाव्या, तसेच किमान सुपरफास्ट गाड्यांना मूल येथे थांबा मिळाल्यास नियमीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लांबून येणाऱ्या प्रवाशांना लाभदायक  ठरेल ,अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे.



गरीबांची जीवनदायिनी म्हणून  प्रसिद्ध असलेल्या डेमो ,मेमो गाड्या सुद्धा वेळेत चालतील अशी व्यवस्था केली जावी व प्रवाशांना ही आपली गाडी आहे असे वाटावे , म्हणून प्रयत्न केले जावेत ,अशीही मागणी यानिमित्ताने प्रस्तूत पत्रातून करण्यात आली आहे.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*


Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*