*होलिकाधीश रंगराव तळकुटे विश्वविद्यापीठ मूल चा भव्यदिव्य पदवीप्रदान सोहळा*

 *होलिकाधीश रंगराव तळकुटे विश्वविद्यापीठ मूल चा भव्यदिव्य पदवीप्रदान सोहळा*


दीपक देशपांडे 

*होळीचा सण आपल्याकडे खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. होलिका दहनासोबत लोक आपल्या मनातील दुःख, नैराश्य, वाईट विचार जाळून टाकतात. आज या दिवशी सर्वांना चांगल्या शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस आनंदी करा. होळीच्या अग्नीत जळू दे दु:ख सारे, तुमच्या आयुष्यात येऊ दे, आनंदाचे क्षण सारे..*

त्यासाठीच आम्ही घेऊन आलोय,

*भव्य पदवीप्रदान समारंभ*

*होलिकाधीश रंगराव तळकुटे विश्वविद्यापीठ मूलचा पदवीप्रदान सोहळा*


मूल नगरीमधील,गुणवंत,प्रज्ञावंत, कलावंत, कीर्तीवंत ,नामवंत, यांच्या  कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी पदवीप्रदान समारंभ आज दिनांक २५/०३/२०२४ रोजी दुपारी ठिक १२वाजता धुळवडीच्या शुभमुहूर्तावर साजरा होत आहे 

या सोहळ्यात आपण अगत्याने आपापल्या घरी बसून आँनलाईन सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती.


*हेच निमंत्रण आणि हाच सोहळा...*


या सोहळ्यात खालील मान्यवर मंडळींना, ढोलताशांच्या गजरात, धुळवडीच्या रंगांच्या उधळणीसह पाण्याची  गंगा वाहवत वडा पुरणाच्या मेजवानीत *पाणी वाचवा* चा संदेश देत ,जाळलेल्या झाडांमुळे झालेली जंगलतोड थांबविण्यासाठी *वृक्ष लागवडीचा आणि संवर्धनाचा* संदेश देत  एक कश - झुरका मारत कालच रात्रीपर्यंत आणुन ठेवलेल्या मदिरेचा घोट घेत, *नशाबंदी-दारुबंदी* ची गरज बोलून दाखविणाऱ्या आणि जिवंतपणी कत्तल केलेल्या  अंडी,  मासे ,कोंबड्या आणि शेळ्या, बकऱ्यांसह, बड्याच्या मटनवर ताव मारत *गोधनाच्याही संरक्षणाच्या* बाता करणाऱ्या महानुभावांच्या उपस्थितीत पदवीप्रदान करण्यात येत आहे.

*स्थळ :-तुम्ही जिथे असाल तिथे.*

*अट:-तुमच्याजवळ मोबाईल फोन डाटासह उपलब्ध असावा., आणि तुम्ही व्हाट्सअप वर चॅटिंग करणे अत्यावश्यक*


*चला तर मग.......आपण पदवीप्रदान समारंभ सुरू करुयात....*

त्यापूर्वी एक जोरदार नारा देऊया...

*बूरा ना मानो होली हैं||*......*हम मतवालोंकी.... आणि.... आणि.......होऊ दे धिंगाणा.....५..४...३...२...१...

..... आणि पहिल्या पुरस्काराच्या मानकरी आहेत......ज्यांनी एकाच वेळी एकच नाहीतर दोनदोन पदवीधर होण्याचा मान मिळवला आहे....त्या आहेत....

१.*श्रीमती शोभाताई फडणवीस माजी मंत्री महाराष्ट्र:-अ)80+++अजून यौवनात मी., ! ब) मी नाही तर माझा शिष्य तरी...?*

२.*देवराव जी भांडेकर,माजी आमदार :- माझी इच्छा आहे,पण... तरुणांना संधी मिळाली पाहिजे.*

३.*प्रकाश पाटील मारकवार,माजी जि.प.अध्यक्ष:-तयारीला लागा , निवडणुका येताहेत*

४.*संतोष रावत,माजी जि.प. अध्यक्ष व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक अध्यक्ष :- त्यांनीदेखील एकाच वेळी एक नाहीतर दोन दोन पदव्या प्राप्त केल्या आहेत ,अ)हीच तर आपली हक्काची जागा*

*ब)मी दिवाणजीला पाठवतो तो बघून घेईल*

५.*संध्याताई गुरनूले,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष:-आता बढती तर मिळायलाच पाहिजे*

६.*विनोद अहिरकर,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष:-आपण करुन दाखवणारच*

७.*चंदू मारगोनवार,माजी पं.स.मूल सभापती:-आता लक्षात ठेवेन.*

८.*दशरथ वाकुडकर,माजी पं.स.मूल, उपसभापती:-सगळी सोय करतो, पण...*

९.*राकेश रत्नावार, सभापती, कृउबास  मूल:-एकट्यानेच दोन तास चालवली म्हणे*

१०.*राजेंद्र कन्नमवार, उपसभापती, कृउबास मूल:-तसा मी देत नाही पण..... सांगतो*

११.*चंदू पाटील मारकवार, उपसरपंच, राजगड:- माझ्यापासून सुरुवात..*

१२.*रविंद्र कामडी,सरपंच,कोसंबी:- शेवटी सारे काही गावासाठीच*

१३.*रत्नमाला भोयर,माजी नगराध्यक्षा मूल:-किती आहेत?*

१४.*नंदकिशोर रणदिवे,माजी उपाध्यक्ष,न.प.मूल:-तू फक्त कर*

१५.*प्रभाकर भोयर, शहराध्यक्ष, भाजप मूल:- करणाऱ्यांच्या मागेच लागते*

१६.*गुरु गुरनूले, तालुका अध्यक्ष, काॅंग्रेस कमेटी मूल, पत्रकार:-भाऊंचा आदेश, ....बातमी पाठव*

१७.*सुमित समर्थ, राष्ट्रवादी युवा काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष :-शेतात शेवगा बहरला*

१८.*मंगेश पोटवार,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे मूल तालुका अध्यक्ष:-निष्ठा दादांवर कर्तृत्व भाऊंचे, तरीही शेतकऱ्यांचा वाली कोण?*

१९.*प्रशांत गट्टूवार,उबाठा शिवसेना मूल तालुका अध्यक्ष :-निष्ठा आणि कार्यकुशलता यांच्या जोरावर*

२०.*मोती टहलियानी, माजी नगरसेवक तथा माजी मूल कृउबास. सभापती:-..... बातमीच्या अनुषंगाने कार्यवाही अपेक्षित आहे*

२२.*विजय सिद्धावार, सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार:-मी सांगतो, तुम्ही फारवर्ड करा*

२३.*संजय पडोळे, सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार:- मी...आणि हे....!  आम्ही सगळे एक(त्र)च आहोत*

२४.*महेश पानसे, पत्रकार:-घडवले आणि घडवतोय*

२५.*कुमुदिनी भोयर,पहिली महिला पत्रकार:-मंगलाताई....? मार्गदर्शकांचे सुचनेनुसार..!*

आणि विशेष पदवी प्राप्त विद्यार्थी आहेत,

१.चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ,मान.नामदार सुधीर मुनगंटीवार:-पक्षादेश मान्य!,मूल शहरात महाराष्ट्रातील सर्वोत्तम ते सगळे आणले.

२.आद. आमदार प्रतिभा पाटील:-मीच खरा पात्र उमेदवार! होळीच्या दिवशी विरोधक चारी मुंड्या चित.


ह्या प्रमुख मान्यवरांना या पदवीप्रदान समारंभात पदवी प्रदान करण्यात आली आहे,उर्वरितांना त्यांचें त्यांचे स्वतःचे महाविद्यालयात पदवी कासवगतीने!क्षमा करा, गोगलगाय गतीने रवाना करणार आहोत ,चिंता करावीच.

कसा वाटला? आमचा पदवी प्रदान सोहळा हे कळविण्यास नक्की विसराच . कारण आपण पुन्हा वर्षभरानेच भेटणार आहोत.

आपण आलात,या पदवीप्रदान सोहळ्याचा मनमुरादपणे आनंद घेतलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद!पण आभार  मानणार नाही, कारण आपली पुन्हा पुन्हा भेट होईलच.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*