*आंधळ्या प्रशासनाची ही गोंधळी गाथा!*

 *आंधळ्या प्रशासनाची ही गोंधळी गाथा!*

*लुटारु लुटताहेत, सर्वसामान्य हतबलतेने लुटवून घेताहेत?*

दीपक देशपांडे मूल 


आँनलाईन आपले सरकार सेवा  (सीएससी) केंद्रातून बेकायदेशीर वसुली-???

मूल तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर अनेक ठिकाणी सीएससी सेंटरला मंजुरी मिळालेली असून त्याची संख्या  शंभराहून अधिक असून या सीएससी सेंटरमधून शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजनासाठी के. वाय. सी त्याच बरोबर ऑनलाइन दाखले व अनेक कायदेशीर दस्तावेज मिळतात. कारण डिजिटल इंडियाचा तो पायाच आहे.

या दस्तऐवजांसाठी ग्राहक सेवा केंद्र  शेतकऱ्यांची लूट करीत असून एका केवायसीसाठी शंभर रुपये चार्ज आकारला जात असल्याची माहिती पुढे आली आहे, मात्र काही मिळविण्यासाठी काही गमवावे लागतेअसे म्हणत   *लुटारु लुटताहेत, सर्वसामान्य हतबलतेने लुटवून घेताहेत?* हे म्हणने खरे ठरत आहे,   त्यामुळे   शासकीय योजनांसाठी अर्ज करणाऱ्यांचे हाल होत असून, डिजिटल इंडियाचा हा पायाच ढासळत चालला आहे आणि प्रशासन त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नसल्याच्या अनेक  तक्रारी  नागरिक करीत आहेत.     म्हणूनच तर आम्ही म्हणतोय , *आंधळ्या प्रशासनाची ही गोंधळी गाथा!*

 पंतप्रधान किसान सन्मान योजना त्याचबरोबर दुष्काळी अनुदान योजनेसाठी केवायसी करण्याच्या सूचना शासनाकडून सातत्याने येत आहे. प्रत्येकवेळी सीएससी सेंटर चालकांकडून शंभर रुपये  मागणी केली जात आहे,ही मागणी रास्त आहे काय? असा प्रश्न ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल च्या मासिक सभेमध्ये दिनांक २९मार्च रोजी उपस्थित करण्यात आला, आणि त्यावर कठोर कारवाई करावी असे ठरविण्यात आले.

सामान्य लोकांच्या सोयीसाठी उघडलेल्या कॉमन सर्व्हिस सेंटर/अटल सेवा केंद्र CSC मध्ये लोकांकडून बेकायदेशीर वसुली केली जात आहे. अनेक केंद्रांवर १० ते २० रुपयांमध्ये होणारी कामे होत नाही, उलट थेट १०० ते २०० रुपयांची मागणी करुन फसवणूक,लुबाडणूक केली जात आहे.मात्र सीएससी ऑपरेटर्सवर दर निश्चित करण्याबाबत प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत एवढेच नाही तर  बऱ्याच केंद्रावर दरपत्रकही लावलेले नाहीत,त्यामुळे  लोकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. सीएससीच्या आत आणि बाहेर कोणत्या सुविधांसाठी अर्ज करता येईल हे लिहिलेले आहे, परंतु दरपत्रकच उपलब्ध नाही, त्यामुळे दरच माहीत नसल्याने लोकांना  मागणी केल्याप्रमाणे जास्त पैसेही मोजावे लागत आहेत , आणि कुणी याबाबत बोललेच तर "कुठे जायचे तिथे जा" या शब्दात अप्रत्यक्ष  धमकीही दिली जाते आहे.

या तक्रारीच्या अनुषंगाने अधिक चौकशी अंती *जर कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटर, अटल सेवा केंद्रात सरकारने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे आकारले जात असतील तर........आणि तक्रार आल्यानंतर त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशी आणि के. वाय. सी साठी एकही रुपया शेतकऱ्यांनी देऊ नयेत अशा सर्व सेंटर चालकांना सूचना दिल्या आहे.* अशी माहिती मिळाली आहे.

 लोकांना माहिती मिळावी यासाठी दरपत्रकही लवकरच प्रसिद्ध केली जाईल ,अशीही माहिती मिळाली आहे.

एकीकडे हा प्रश्न सोडविण्याचा  प्रयत्न  करतांना सीएससी  सेंटर चालकांकडून शेतकऱ्यांची लुट सुरु असल्याची आणि दुसरीकडे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींकडे डेटा ऑपरेटर उपलब्ध असतांना देखील डेटा ऑपरेटर शेतकऱ्यांचे कोणतीही कामे करीत नाहीत,  तर हे डेटा ऑपरेटर  त्यांचे नियोजित  स्थान सोडून ग्रामपंचायतीच्याबाहेर मूल शहरात  जाऊन  खासगी  दूकाने थाटून कामे करून पैसे कमवत आहेत , परिणामी ग्रामपंचायत मधील सर्व ताकझाम हे पांढरे हत्ती  पोसल्यागत असल्याच्या तक्रारी आणि त्याची चौकशी  करता वास्तवता पुढे आली आहे.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल चे वतीने, *आम्ही कुणाच्याही विरोधात नाही पण अवैधरीत्या  लुबाडणूक करणाऱ्यांचे  विरोधात नक्कीच असून  डोळे  आणि कान  बंद करुन झोपेचे सोंग  घेतलेल्या प्रशासनाला या कथीत  सीएससी चालकांना सूचना देऊन सर्वसामान्य ग्राहकांची सुरू असलेली लूट तातडीने थांबविण्याची आणि असे गैरव्यवहार करणाऱ्या सीएससी चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी* करण्यात  आली आहे . आतातरी प्रशासन डोळे उघडून काय कारवाई करणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*