कृषि महाविद्यालय मूल येथे हत्तीरोग निर्मूलन अभियान अंतर्गत औषधी वाटप.

 कृषि महाविद्यालय मूल येथे हत्तीरोग निर्मूलन अभियान अंतर्गत औषधी वाटप.



मूल,दीपक देशपांडे 


मूल : राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत कृषि महाविद्यालय, मूल येथे दिनांक २८ मार्च २०२४ रोजी हत्तीरोग निर्मूलन व त्यावरील उपायाचे आयोजन करण्यात आले होते.  राज्यातील पाच जिल्ह्यांना हत्तीरोंगाची लागण होण्याची शक्यता असल्याने, त्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रमा अंतर्गत नागरिकांना घरोघरी तसेच विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात जाऊन प्रतिबंधात्मक औषधीचे वाटप करण्यात येत आहे. ही मोहिम  भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नांदेड या ५ जिल्ह्यांत  राबविली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून कृषी महाविद्यालय,  मूल येथे प्रतिबंधात्मक औषधीचे वाटप करण्यात आले. हत्तीरोग निर्मूलन व त्यावरील उपाय कृषि महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. हत्तीरोग निर्मूलन व त्यावरील उपायाचे आयोजन करण्याचा उद्देश म्हणजे लोकांना हत्तीरोगाची लागन होऊ नये व लोकांमध्ये हत्तीरोगांबद्धल गैरसमज निर्माण होऊ नये हा होय.

      डॉ. लाडे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय  मूल व त्यांची चमु यांच्या सहकार्याने  हत्तीरोगांविषयी जागरूकता निर्माण करणयाकरिता आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सक्रिय योगदान दिले. या शिबीरा प्रसंगी महाविद्यालयातील रासेयो चे स्वयंसेवक  आणि प्राध्यापक यांनी उत्सफूर्तपणे प्रतिसाद दिला.

     या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.खुशाल राठोड,  इतर प्राध्यापक व रासेयो स्वयंसेवक यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*