*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*

 *चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात  काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*

दीपक देशपांडे.



भाजपाने माजी खासदार हंसराज अहिर यांच्या ऐवजी सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची घोषणा केली आणि चंद्रपुरात एक विजयी बाॅंब टाकला आणि ......

काँग्रेसच्या उमेदवारीला घेऊन चंद्रपुरात अक्षरश: रान पेटविल्या जात आहे एवढेच नव्हे तर हा प्रश्न आता दिल्ली दरबारी पोहचवला गेला आहे.

चंद्रपुरातील प्रसार माध्यमे आणि समाजमाध्यमांनी आलटून पालटून  प्रतिभा धानोरकर,शिवानी वडेट्टीवार ,सुभाष धोटे, विजय वडेट्टीवार यांची नाव समोर आणली. अन् यातूनच प्रचंड संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे चंद्रपुरात "ताई" कि "दादा" असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता या मुद्यावरून काँग्रेसच्या दोन्ही गटातील समर्थकांत अक्षरशः राजकीय तुंबळ युद्ध पेटलंय ,कारण चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना धानोरकर आणि वडेट्टीवार गटातील शीतयुद्ध चांगलेच ठाऊक आहे.

प्रतिभा धानोरकरांच्या प्रबळ दावेदारीनंतर विजय वडेट्टीवारांच्या कन्येचे शिवानी वडेट्टीवार  यांचे नाव पुढे करुन या शीतयुद्धाची सुरुवात केली होती मात्र पक्षातील समर्थकांनाही ते पटले नव्हते परिणामी समोर आले, सुभाष धोटे यांचे नाव, आणि आता विजय वडेट्टीवार यांचे पुढे आलेले नाव हि सारी परिस्थिती बघता आता काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाजपचे  नेते, कार्यकर्ते विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी जाहीर झाल्याचा मेसेज  समाजमाध्यमातून फॉरवर्ड करीत आहेत.


चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीला घेऊन निवडणुकीच्या आधीच निवडणुकीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. वरोरा भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात कमालीची रस्सीखेच सुरु आहे.एकीकडे भाजपने राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. सुरवातीला लोकसभेचे तिकीट,"नको रे बाबा" म्हणणारे मुनगंटीवार आता पक्षादेश  म्हणत फुल्ल फॉर्म मध्ये आहेत. त्यांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. प्रचाराचा  नारळ फोडून ते जनतेला आजवरच्या आपल्या कार्याचा  पाढा वाचून लागले आहेत तर काँग्रेसने अद्यापही या जागेवर आपला उमेदवार घोषित केला नाही.निवडणुकीचा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होऊनही काँग्रेसमध्ये "शोध उमेदवाराचा" ही मोहीम राबविणे सुरु आहे.अशातच हा मुद्दा थेट दिल्लीत पोहचला आणि सगळी सुत्र दिल्ली हायकमांडच्या हातात गेली आहेत.


काल सायंकाळपासून विविध माध्यमातून विजय वडेट्टीवार,प्रतिभा धानोरकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यांची सूत्रांची माहिती असल्याच्या बातम्या प्रसिध्द करण्यात आल्या.यानंतर दोघांच्याही समर्थकांत अक्षरशः चढाओढ सुरू असून चंद्रपुरातील उमेदवारीला घेऊन काल दिल्लीच्या काँग्रेस दरबारी विचार मंथन झाल ,पण अद्यापही कुणाचेच नाव निश्चित झाले नाही मात्र आजच  काँग्रेस हायकमांड चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार जाहीर करणार  असल्याची माहिती आहे.


समाजमाध्यमातून *लढाई आणि चढाई*


काँग्रेसची तिकिट कुणाला मिळणार या मुद्द्यावरून वडेट्टीवार,धानोरकर समर्थकांनी अक्षरशः रान पेटवल आहे. काँग्रेस च्या अनेक गृपवर तर दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडत आहेत.  मात्र काल रात्री उशिरापर्यत हा प्रकार सुरू होता.


 एकीकडे प्रतिभा धानोरकर छातीठोकपणे म्हणतात...पुनरावृत्ती होणार आणि  ही उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची काँग्रेसची उमेदवारी आपणालाच मिळणार याचा आमदार प्रतिभा धानोरकरांना पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे समाजमाध्यमातून त्यांनी  २०१९ ची यंदाही पुनरावृत्ती होणार असा संदेश दिला आहे ,तर तुल्यबळ प्रतिस्पर्धी म्हणून विजय वडेट्टीवार हेच योग्य असल्याचे  विजय वडेट्टीवार गटातील कार्यकर्ते सांगत वडेट्टीवार यांनाच उमेदवारी दिली जावी यांची वरिष्ठांकडे मागणी करीत आहेत.

कदाचित आज रात्रीपर्यंत ह्या वादावर तोडगा काढला जाऊन उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल पण ,या वादाची ठिणगी मात्र धुमसत राहणार हे निश्चित असून त्याचा परिणाम निवडणुकीत यशावर होणार ह्याबाबत कुणाच्याही मनात संशय नसणार आहे , परिणाम निवडणूक निकाल एकतर्फी जाऊ नये यासाठी परत एकदा  मोडतोड केली जाईल हे तर कुणीही नाकारू शकणार नाही.

काॅंग्रेसच्या गोटात वादळ निर्माण झाले असून उमेदवारी कुणालाही मिळाली तरीही शीतयुद्धाची ठिणगी धुमसत राहणार आहे तर भाजपच्या गोटात ४००पारची तयारी सुरू करण्याची शक्यता ऐनवेळी अंतर्गत वादळात सापडू नये यासाठी प्रयत्न केले जात आहे.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात अर्जाच्या छाननीनंतर १५ उमेदवार वैध....