*चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार ??*

*चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार ??*


*वंचितच्या बेलेंमुळे फायदा कुणाला? प्रतिभाताई धानोरकर की सुधीर मुनगंटीवार...!!??*

नामांकन अर्ज सादर करण्याची मुदत संपली.

दीपक देशपांडे मूल, चंद्रपूर 

 *चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता ३६उमेदवारांचे एकूण ४८अर्ज*

*शेवटच्या दिवशी २९ उमेदवारांचे ३७ नामनिर्देशन पत्र दाखल*

 १३ – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरिता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (२७ मार्च) २९ उमेदवारांनी ३७ नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अर्ज भरणा-या एकूण उमेदवारांची संख्या ३६ तर दाखल नामनिर्देशनपत्रांची एकूण संख्या ४८ झाली आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात मंगळवारी २६ मार्च रोजी ७ उमेदवारांनी ११ अर्ज दाखल केले होते.

२०२४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्व.खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेची उमेदवारी शेवटच्या क्षणी जाहीर केलेली असून त्यांनी  प्रचंड मोठी रॅली काढत आज दिनांक २७ मार्च २०२४ रोजी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे , एका दृष्टीने हे शक्तिप्रदर्शन होते म्हणायला वाव आहे.

यापूर्वी २०१९ च्या  सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत देशभरात मोदी लाट असतांना बाळूभाऊ धानोरकर यांनी शेवटच्या क्षणी शिवसेना सोडून काॅंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून सुद्धा महाराष्ट्रात एकमेव चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघ काँग्रेसने, जिंकला होता मात्र त्यावेळेस काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या  रणनीतीमुळे व  अंतिम  क्षणी भाजपातील दुहीमुळे कार्यकर्त्यांना बरोबर  मतदारांपर्यंत पोहचता आल्यामुळे , तसेच  भाजपाच्या अंतर्गत कलहात आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या संघटित भाजपविरोधी संघर्षामुळे काँग्रेसला बाळू धानोरकर यांच्या रूपाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ जिंकता आला होता.बाळू धानोरकर यांनी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा ४४,००० मतांच्या फरकांनी पराभव केला होता.


 बाळू धानोरकर हे राज्यातील एकमेव खासदार म्हणून दिल्ली दरबारात पोहोचले होते मात्र  ३० मे २०२३ रोजी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे  एका वेगळ्याच संघर्षात  अल्पशा  आजाराने निधन झाले होते, त्यानंतर मात्र पोटनिवडणूक होईल असा अंदाज  लावत प्रतिभा धानोरकर यांनी तयारी केली होती मात्र पोटनिवडणुकच झाली नाही आणि त्यांची इच्छा अपूर्णच राहिली होती,ती आता पूर्ण करण्यासाठी जवळचीच माणसं विरोधात उतरुन काम करु लागली होती,त्यावर होलिका दहनाच्या दिवशी पहिला विजय मिळवून उमेदवारी प्राप्त केली होती.


भाजपाने महाराष्ट्र सरकार मधील प्रभावी नेते सुधिर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली असून त्यांनी  प्रचंड शक्तिप्रदर्शन करत काल दिनांक २६ मार्च रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे , त्यामुळे आज त्यांचे प्रत्यूत्तर देणे गरजेचे होते म्हणून आजही प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत प्रतिभा धानोरकर यांनी नामांकन पत्र सादर केले.


मात्र त्यांचा संघर्ष  वाढवित वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राजेश बेले यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


वंचित आघाडीची मागील निवडणुकीएवढी ताकत राहिली नाही हे दिसत असले तरीही अटीतटीच्या लढतीत वंचित आघाडी सोबत नसण्याचा तोटा हा महाआघाडीलाच बसणार आहे. त्याची भरपाई करण्यास महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाने तयारीत असणे गरजेचे आहे.


 जनतेशी जुळलेली नाळ आणि सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात  मोठ्या प्रमाणावर विकास कामे  केली आहेत आणि अंतर्गत विरोध तेवढ्या प्रभावीपणे नसणार हे गृहित धरता  प्रतिभा धानोरकर यांचेसमोर खुप मोठे आव्हान उभे राहणार आहे कारण यावेळी काॅंग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचाही पहिला फटका त्यांनाच बसणार असून वंचितच्या बेलेंमुळे तर  अजून एक नवीन आव्हान उभे राहिले आहे.


वंचित आघाडीचे बेले  नेमकी किती मते घेणार यावर काँग्रेस आणि भाजप यांचे भवितव्य अवलंबून आहे असे समजून पुढे जातो म्हंटले तर ज्या कुणबी समाजाचे भरवशावर प्रतिभा धानोरकर यांची उमेदवारी निश्चित झाली तो कुणबी समाज यावेळी कितपत काॅंग्रेसच्या पाठीशी उभा राहणार हाही एक महत्त्वाचा मुद्दा ठरु शकतो तसेच वंचितच्या सोबतीला एससी एसटी ओबीसी समाज यापैकी कोण कधी कसा पाठिंबा देणार हेही तितकेच महत्त्वाचे आहे.


सुधीर मुनगंटीवार एक मजबूत उमेदवार असले तरीही त्यांना पक्षाअंतर्गत विरोध कसा कमी करता येईल  हाही कळीचा मुद्दा ठरु शकतो ,कारण केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांची प्रबळ इच्छा  असताना त्यांना उमेदवारी न मिळणे,२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात  हंसराज अहिर यांना कमी  मत मिळणे हा जनतेतील चर्चेचा विषय आहे.


भाजपाची बूथलेवलपर्यंत मजबूत बांधणी आणि  काॅंग्रेसची उमेदवारी पासून  सुरू असलेली कुरघोडी ,मध्येच वंचितची उडी ह्या लोकसभा निवडणुकीत जनतेला म्हणजेच मतदारराजाला  आपल्या राजा असण्याची  जाणीव करुन देत त्याच भावनेने मतदान करुन सिद्ध करण्याची संधी यानिमित्ताने पुढे आली आहे , याशिवाय नोटाचा पर्याय सुद्धा या मतदारराजा साठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेला आहे ,हे विसरून चालणार नाही.



*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*