Skip to main content

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ अखेर प्रतिभा धानोरकरच काँग्रेसच्या उमेदवार !

 *बिग ब्रेकिंग*

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ अखेर प्रतिभा धानोरकरच काँग्रेसच्या उमेदवार !



अखेर आमचेच वृत्त  व माहिती खरी ठरली.
दीपक देशपांडे
गेल्या पंधरा दिवसांपासून चंद्रपूर मतदारसंघात लोकसभेच्या उमेदवारीवरून  सुरु असलेल्या  "तिकिट"नाट्याला आज पूर्णविराम मिळालाय.विरोधकांना "विजय" मिळवून देण्यासाठी सुरु असलेले "मनसुबे" गारद करीत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी उमेदवारी मिळवलीय. काँग्रेस कडून नुकतीच त्यांच्या  नावाची घोषणा करण्यात आली. 
याबाबत आम्ही कालच वृत्त प्रकाशित केले होते व ते खात्रीलायक  वृत्त आज खरे ठरले आहे., यादरम्यान हे वृत्त असे कां प्रकाशित केले म्हणून विचारणा करणारे काही कमी नव्हते , त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देता देता आमची पुरेवाट होतं होती आणि कुणावरही विश्वास ठेवू नये असे क्षणभर वाटू लागले होते .
मात्र चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीवरून अक्षरशः रान पेटविण्यात आलं होत. आमदार प्रतिभा धानोरकर यांची प्रबळ दावेदारी असतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पक्ष संधी देईल तर आपली लोकसभा निवडणूक लढवू, असे भाष्य केले होते.यानंतर  त्यांची कन्या शिवानी यांनी युवा नेतृत्वाचा दाखला देत उमेदवारी मागितली. दरम्यानच्या काळात  प्रतिभा धानोरकर यांची उमेदवारी डावलण्यासाठी पक्षातील अनेक नेत्यांना प्रोत्साहन देण्यात आले. चंद्रपूरातील हा वाद विकोपाला पोहचला अनं उमेदवारीसाठी अनेकांनी दिल्ली दरबारी हजेरी लावली. माध्यमांनी  आलटून पालटून वडेट्टीवार,धानोरकरांना उमेदवारी मिळाल्याच्या बातम्या सूत्रांचा आधार घेत चालविल्या. यामुळे कार्यकर्त्यात कमालीचा संभ्रम निर्माण झाला.काँग्रेसच्या अनेक गृपवर दोघांचेही समर्थक चांगलेच भिडले. अशात काँग्रेसची उमेदवारी नेमकी कुणाला मिळेल.याबाबत उत्सुकता ताणली होती.
आज दिवसभर तर थोड्या- थोड्या अंतराने -धानोरकर , -वडेट्टीवार, -धानोरकर यांना उमेदवारी मिळाल्याच्या,------------यांनाच मिळावी,-------यांना नको चा लुटूपूटूचा खेळच सुरू होता .
दरम्यान नुकतीच काँग्रेस पक्षाने चंद्रपूर  लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. चंद्रपूरातील उमेदवारी प्रतिभा धानोरकरांना जाहीर करण्यात आली.विरोधकांचे सर्व प्रयत्न हाणून  पाडत धानोरकरांनी बाजी मारली.खासदार पती बाळू धानोरकर यांच्या आकस्मिक निधनानंतर आमदार प्रतिभा धानोरकर यांनी संयम दाखवीत  उभारी घेतली.  खरेतर मध्यावधी  निवडणुका होतील आणि आपण त्यासाठी  योग्य असल्याचे स्पष्ट करीत त्या अनेक महिन्यापासून  लोकसभा मतदारसंघात सक्रिय झाल्या होत्या. ओबीसीबहुल मतदारसंघात प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू नये असे काँग्रेस मधील विरोधकांसह भाजपच्या अनेकांनी प्रयत्न  चालविले होते.पण शेवटी काँग्रेसने प्रतिभा धानोरकरांवर विश्वास दाखविला. 

सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे तगडे भाजपचे उमेदवार समोर असतांना धानोरकरच त्यांना मात देऊ शकतात असा  प्रचार सुरु झाला होता तोच विश्वास आता काँग्रेस गोटात उमटत आहे.त्यांना उमेदवारी जाहीर होताच आता काँग्रेस गोटात कमालीचा उत्साह पसरला आहे , तरीही  अंतर्गत विरोधक कधी दगाफटका करतील हे सांगता येत नाही,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुनगंटीवार व वडेट्टीवार यांच्यातील सख्य ! व वैरभाव ?  सगळ्यांना चांगलाच माहिती असल्यामुळे आता या मतदारसंघाकडे केवळ मतदारसंघातील मतदारांचेच नाही तर संपूर्ण, विदर्भ व महाराष्ट्राचे आणि देशाचे ही लक्ष असणार आहे,कारण या एकमेव सिटमुळे  महाराष्ट्रातील मोठमोठे  दिग्गज  धाराशायी झाले असतांनाच लोकसभेत   महाराष्ट्राचे काॅंग्रेसचे अस्तित्व  टिकवता आले होते. हेही विसरून चालणार नाही.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*


Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*