*सावधान* मूल शहरात चोरांचा प्रवेश ? शेजाऱ्यांनी सहकार्य केले म्हणून..!*

 *सावधान* मूल शहरात चोरांचा प्रवेश ? शेजाऱ्यांनी सहकार्य केले म्हणून..!*

 मूल शहरातील एक गृप ,*समस्या मूल शहराच्या* त्यावर वायरल होतोय एक संदेश.........

दीपक देशपांडे 

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील मूल शहरातील नवीन वस्तीत आज  दिनांक २२मार्च पहाटे  २ ते २:३० च्या दरम्यान आदिवासी मुलांच्या वस्तीगृहाच्या  बाजुला श्री सुरेश कोलप्याकवार (कोर्टात क्लर्क आहे) यांच्या घरी प्रवेश करून समोरील मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यांना आवाज येताच त्यांनी समयसूचकता दाखवत श्री आकेवार सर व अजून  दुसऱ्या शेजाऱ्यांना फोन केला व दरवाजा आत मधून दाबून धरून ठेवला होता. 

 त्याच क्षणी श्री आकेवार सर बाहेर येऊन आवाज दिल्या बरोबर चोर पळून गेले,ते पळून जातांना आकेवार सर यांनी प्रत्यक्ष बघितले ते चार लोक होते. तरी मूल वासीय जनतेने सावध राहावे. असे आवाहन एका व्हाट्सअप  गृपवर करण्यात आले असून 

त्यांचे घराला लागून असलेला तिरणकर सर यांच्या सुध्दा घरी प्रवेश करून मुख्य दरवाज्याची कडी लावून ठेवले होते व खिडकी  उघडून खिडकी वर ठेवलेले दोन्ही मोबाईल चोरून नेले अशा आशयाच्या समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या पोस्ट त्यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांच्या मनातील भाव मूलमधील *समस्या*  गृपवर फिरत आहेत. 

मुळात या गृपचे नावच बोलके आहे , त्यामुळे समस्यांची मांडणी तर या गृपवर होणारच आहे ,दखल घेण्यासाठी आजी,माजी नगरसेवक , नगरसेविका अधिकारी, पदाधिकारी , पत्रकार, समाजसेवक,राजकारणी मंडळी हेदेखील असावेत ,असा अंदाज बांधायला हरकत नसावी ,

आणि....... तरीही समस्या समस्याच कां राहतात हे कळायला मार्ग नाही.

माझ्यासाठी प्रश्न हा नाही तर प्रश्न असा आहे ,काही महिन्यांपूर्वीही याच भागात चोरीचा प्रयत्न झाला होता , तेंव्हा पोलिस प्रशासनाने अशाच बातम्या समाजमाध्यमांवर वायरल झाल्या असतांनाच ,असे नाहीये म्हणून वेळ निभावून नेली होती आणि पून्हा तोच तो प्रकार झाल्यावर या भागातील गस्त वाढविली आणि नंतर हा चोरीचा प्रकार बंद झाला होता , आता प्रकार पुन्हा सुरू झाला आहे , पोलिसांना याची माहिती मिळाली असणारच आहे ,मात्र आता आचारसंहिता लागू झाली आहे आणि चोरांनी पुन्हा एकदा घरात धडकच दिली नाही तर घरात लोक असतांनाच दार ठोठावले आहे , शेजाऱ्यांनी आवाज दिला म्हणून चोर पळून गेले, परंतू त्यापूर्वी घरातील वास्तव्यास असलेल्या व्यक्तीला सूचले आणि त्यांनी शेजारच्यांचा फोन वाजवला आणि त्यांनी तो उचलला म्हणून हे सहज शक्य झाले नाहीतर......आज केवढा अनर्थ झाला असता ...क्षणभर विचार करावा,काय घडले असते?

ही घटना दिसते तेवढी सहजसाध्य नाही, त्यामुळे प्रत्येकाने विचार करावा. सुचना देऊनही जाग न आलेल्या पोलिस विभागाच्या पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी रेतीतस्करीला लगाम घालण्यासाठी मूल तालुक्यातील गोंडसावरीत धडक दिलीच आहे ,आता मूल पोलीस यावरही कार्यवाही करणार नसतील तर .... नागरिकांना जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे ........धाव तर घ्यावी लागणार नाही ना?

मी या गृपचा सदस्य नाही पण.... जनतेचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचवला आहे त्या गृपवरच्या जनतेनेच म्हणून.....

एवढं लिहायचं कारण घटना घडतात आहे परंतू वेळीच घटनेचं  गांभीर्य ओळखून तातडीने त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जावी ही जनतेची किमान अपेक्षा आहे, त्याकडे कुणी लक्ष पुरविणार आहे काय?


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात अर्जाच्या छाननीनंतर १५ उमेदवार वैध....