*००- क्रांतिकारी निर्णय -००*

 *००- क्रांतिकारी निर्णय -००* 

*Supreme Court : खटल्यांची माहिती मिळणार व्हॉट्सॲपवर ; सर्वोच्च न्यायालयाचे डिजिटल पाऊल*

दीपक देशपांडे 


सर्वोच्च न्यायालयाने आज डिजिटायझेशनच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकताना संबंधित खटल्यावर कधी सुनावणी होईल? तो खटला कधी दाखल करण्यात आला? याची माहिती व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विधिज्ञांना पाठविण्यात येईल अशी घोषणा केली आहे.

यामुळे न्यायालयीन कामकाजाच्या प्रक्रियेत मोठी सुधारणा होईल तसेच कागदाची देखील बचत होईल.

सर्वोच्च न्यायालयाने तयार केलेल्या 'इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी (आयसीटी) सर्व्हिसेस'सोबत व्हॉट्‍सॲपला जोडण्याची घोषणा सरन्यायाधीशांनी आज एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान केली. सरन्यायाधीशांनी या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा व्हॉट्सॲप क्रमांकदेखील शेअर केला.


*आदेश, निकालही कळणार*

सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यांची नोंद आहे असे वकील आणि याचिकाकर्ते यांना संबंधित खटल्याची सुनावणी कधी होईल? तसेच तो खटला नेमका कधी दाखल करण्यात आला? महत्त्वाचे आदेश आणि निकाल यांचा तपशील व्हॉट्‍सॲपवरून पाठविण्यात येईल. बार कौन्सिलच्या सर्व सदस्यांनादेखील रजिस्ट्रीच्या माध्यमातून हे संदेश पाठविण्यात येतील. एखाद्या खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर त्याचा तपशील व्हॉट्‍सॲपवरून पाठविण्यात येईल. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे म्हटले आहे.

यामुळे काय होणार?

*न्यायालयाचा वेळ अन् कागद वाचणार*

*अधिकाधिक लोकांपर्यंत कोर्ट पोचेल*

*दुर्गम भागातील लोकांनाही सहज ॲक्सेस*

*जिव्हाळ्याचे विषय नागरिकांना समजतील*

*क्लाउड'वर सर्व काही मिळणार*

न्यायालयाच्या सगळ्या सेवा आता 'मेघराज क्लाउड २.०' येणार आहेत. 'नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर'ने (एनआयसी) हे क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले आहे. आता न्यायालयाचा डेटा या क्लाउडवर येणार आहे.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*