*निवडणूक समरांगणातील लढवय्ये...२४* भाजपचा पहिला विजयोत्सव!

 

*निवडणूक समरांगणातील लढवय्ये...२४*

भाजपचा पहिला विजयोत्सव!


दीपक देशपांडे 

स्वतंत्र  भारताच्या संसदेत १८व्या लोकसभेसाठी पहिला खासदार भाजपाचा!


*भाजपाची  विजयी दौड सुरु...*🚩🚩

*सुरत(गुजरात) लोकसभा क्षेत्रातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी*

मुकेश दलाल यांना विजयी प्रमाणपत्र प्राप्त झाले असून ते सुरतमधील नामवंत व्यक्ती आहेत आणि भाजपचे महासचिव आहेत.

सुरतच्या या जागेवर कांग्रेसचला मोठा झटका बसला असून पार्टी चे उमेदवार निलेश कुंभानी यांचे नामांकन रद्दबातल करण्यात आले, यासाठी कांग्रेस तर्फे असाही आरोप लावण्यात आला आहे की हे सारे भाजपच्या इशाऱ्यावर केले गेले आहे.

जेंव्हा की बीएसपीचे प्यारेलाला भारती यांनी आपली उमेदवारी परत घेतली,आणि इतर उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज परत घेतले आणि मुकेश दलाल यांचा मार्ग मोकळा झाला.

मुकेश दलाल यांचे विजयाचा आनंद व्यक्त करताना सीआर पाटिल यांनी सोशल मीडिया एक्स वर अशी प्रतिक्रिया दिली आहे की,सुरत ने पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना पहिले कमळ निवडून दिले असून भाजपा उमेदवार मुकेश दलाल यांचे अभिनंदन केले आहे.

१९८९पासून भाजपा सुरत मतदार संघात विजय मिळवून देत असून गुजरात हा भाजपाचा गड असल्याचे मानले जात आहे.

मागील निवडणुकीत भाजपाने गुजरात मधील सर्व २६जागा जिंकल्या होत्या,आता यावेळी उर्वरित २५जागांसाठी ७मे ला मतदान होणार आहे.

संपूर्ण भारतातून पहिला निकाल लागला, आता प्रतिक्षा  ४००ची बाकी  ती कळेल ४ जुनला*

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*