*निवडणूक समरांगणातील लढवय्ये...२३*

 *निवडणूक समरांगणातील लढवय्ये...२३*

*मतदार राजा*


*दीपक देशपांडे*

निवडणुकीच्या रणधुमाळीत खरा राजा असणाऱ्या मतदाराची चिंता कुणाला नसावी असे चित्र काल पार पडलेल्या निवडणुकीत समोर आले आहे.

निवडणूक समरांगणात दोन्ही पक्षांतील मातब्बर मंडळी संपूर्ण तनमनाने सहभागी झाली होती असे आश्वस्तपणे कुणी सांगू शकत नव्हते , ज्यांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा दिली गेली होती ती मंडळी या संपूर्ण प्रक्रियेत अनवधानाने दृष्टीस पडत होती.

परिणामी निवडणुकीत कोण मतदान करण्यासाठी आले, कोण नाही आले ,ते कां नाही आलेत ह्याबाबतीत लक्ष ठेवायला बुथनिहाय तर सोडाच वार्डनिहायही कुणी पुढाकार घेऊन सक्षमपणे कार्यरत दिसले नाहीत.याचा फटका पारंपरिक मतदारांना बसला कारण एका यादीत नाव नाही सापडले तर दुसऱ्या यादीत नाव शोधण्याचे आणि धावपळ करुन दुसरे केंद्र गाठण्याचे महाकष्ट कुणी घेतलेच नाही आणि म्हणूनच मतदान केंद्रावर येऊनही असे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले , त्यामुळे केवळ एकाच पक्षाचे उमेदवारांना नाही तर बहुतेक सगळ्यांनाच यांचा फटका बसला आहे.  नाहीतर मतदानाची टक्केवारी ७५-८०% निश्चीतच जाऊ शकली असती,असे जाणकारांचे मत आहे.

नवमतदार पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावत असताना जबाबदारी ची जाणीव होत असल्याचे सांगत असले तरीही त्यात भविष्यात येणाऱ्या संकटांची चाहूल दिसत नव्हती ,तर ते आश्वस्त होते , शेतकरी आशावादी असला तरी पूर्ण समाधानी नव्हता , श्रीमंत व गरीबांना मतदानाचा हक्क बजावत असताना यांमुळे फारसा फरक पडणार नसल्याची खात्री होती तर महिलांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सगळ्या पोकळ घोषणा म्हणजे  आश्वासनांचे गाजर असावे अशी दाट शंका होती ,एकुण सर्वसामान्य माणूस आवश्यक  ते गरज असताना मिळत नसल्याची खंत आणि मिळत असल्यास व मिळतेय त्याबाबत परिपूर्ण समाधानी नसल्याने वेळीच यशस्वी होता येत नसल्याचे शल्य बाळगूनच मतदानाला आला होता. नौकरदार जून्या नव्या पेन्शनच्या वादात भविष्याची चिंता घेऊनच मतदानाला आला होता.युवा वर्ग मात्र खात्री आणि विश्वासाचे हिंदोळे घेऊन मतदान करीत होता.व्यापारी व छोट्या मोठ्या दूकानदारांचे आपले आपलेच गाऱ्हाणे होते ,प्रवासी ,चालक मालक, टॅक्सी चालक सगळेच आपापल्या समस्या मांडत होते तर फुटपाथवर छोटे व्यवसाय करणारे अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात आपली व्यथा मांडत होते.

एक वर्ग असाही दृष्टीस पडला जो जातीपातीच्या राजकारणाचा शिकार ठरला होता , गुणवत्ता असूनही जातीयवादाच्या भोवऱ्यात सापडला होता , आणि आपल्या जीवन जगण्याची संकल्पनाच बदलण्याची भाषा बोलू लागला होता, परिणामी ह्या राजव्यवस्थेवर नाराज होता ,त्याचाच परिपाक म्हणून शासकीय *आरक्षण* या  शब्दावरून आक्षेप व्यक्त करीत ७५वर्षांच्या राजकीय कारकीर्दीनंतरही खऱ्या गुणवंतांची कदर कधी करणार?हा प्रश्न उपस्थित करीत होता.तर एक वर्ग सारे काही  फुकट मिळावे ही इच्छा व्यक्त करीत होता तर एक वर्ग , प्रवास ,आरोग्य ,शिक्षण मोफत मिळावे ही इच्छा व्यक्त करीत होता. 

व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणून आम्ही सत्तारुढ शासनाच्या काही चांगल्या योजना जाणून घेण्याचा प्रयत्न केला ,असता विद्यमान शासनाच्या सगळ्याच योजना चांगल्या आहेत मात्र त्या पारदर्शी झाल्या पाहिजेत आणि वारंवार एकाच कारणाने माराव्या लागणाऱ्या हेलपाट्यांपासून सुटका होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन बहुसंख्य शेतकऱ्यांनी व मतदारांनी केले आहे.

गावात सेतू सुविधा केंद्र असूनही प्रत्येक कामासाठी मूलला जावे लागत असल्याची जणू तक्रारच कित्येक गावखेड्यातून ऐकायला मिळत होती ,आणि ग्रामस्थ रोष व्यक्त करीत होते.ही बाबही प्रशासनाने दखल घेण्यासारखी असल्याचे लक्षात आले.

ग्रामीण भागातील लोकांना घरकूल मिळाल्याचा आनंद की , वेळेत  न मिळणारे अनुदान, बांधकाम साहित्य खरेदीसाठी आवश्यक अनुदान ,व साहित्य उपलब्धता , शेतकऱ्यांना सिंचन विहीर योजनेचे अनुदान मिळण्यास विलंब ,शेती साहित्य उपलब्धता ,बी बियाणे वाटपात  अनदेखी खतांचा योग्य प्रमाणात पुरवठा न होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते तर विद्यार्थ्यांना बसची सोय ,शिक्षणाची सोय , आरोग्यसेवा उपलब्ध होण्यातील अडचणी ग्रामस्थ पोटतिडकीने पुढे मांडत होते.

मोफतच्या धान्यवाटपावर अंकुश लावून खऱ्या गरजवंताला त्यांचे वाटप करण्याची मागणीही या निमित्ताने केली गेली आहे ,कारण एकत्र कुटुंब व्यवस्था यामुळे मोडकळीस येऊन कुटुंब विभक्त होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे व शासन एकीकडे गरीबी हटविण्याचा प्रयत्न करीत असतांनाच दरिद्री रेषेखालील कुटूंबाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे वास्तवही पुढे आले आहे , यामुळे शासनाच्या तिजोरीवर भार वाढत असल्याचेही जागृत मतदारांनी उदाहरणांसह दाखवून दिले आहे.

राजकीय पक्षांनी जाहीर केलेल्या जाहिरनाम्याबाबत मात्र जनता संभ्रमात असून याबाबत मोठ्या प्रमाणात अज्ञात असून ही निव्वळ घोषणाबाजी असते असे प्रामाणिकपणे कबूल करणारे काही कमी नव्हते तर शेतकऱ्यांचा कुणी वाली नसल्याचे स्पष्टपणे ग्रामस्थ बोलून दाखवत होते.

 यानिमित्ताने आम्ही महामंडळाकडे नोंदणी करुन धान्य विक्री करो वा ना करो शासनाने हेक्टरी २०,०००₹ प्रमाणे अधिकतम ४०,०००₹शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याचे सांगताच मात्र शेतकऱ्यांचा पारा एवढा वाढला की या शासन कर्त्यांच्या खिशातून हा पैसा वसूल केला जावा पर्यंत शेतकऱ्यांनी मागणी करुन टाकली यांचे कारण जाणण्यासाठी आम्ही काही समजदार शेतकऱ्यांशी संपर्क साधला व त्यांचे मत जाणून घेतले तेव्हा ते म्हणाले , साहेब,  इथे सर्वसामान्य शेतकरी पीक हातात येईल केंव्हा आणि माझे देणे देऊन मी कर्जातून मुक्त होईल केंव्हा यांची वाट बघणारा शेतकरी  कधीतरी  यांचा लाभ मिळवून शकतो काय?  मग तो महामंडळात जाऊन नोंदणी  करुन  महामंडळाला धान विक्री कधी करणार? त्यासाठी अनावश्यक नोंदणी करणार कोण? याचा अभ्यास करा म्हणजे समजेल या योजनेचा फायदा कुणाला मिळाला?अशा योजना सरकारने ताबडतोब बंद करायला पाहिजे, आणि शेतकऱ्यांचा पुळका असेल तर बाजार समितीत धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ द्यायला पाहिजे. याबाबत खरेच विचारपूर्वक निर्णय झाला पाहिजे.

निराधार योजना श्रावणबाळ योजनांचा लाभ देतांना लाभार्थ्यांना वारंवार चकरा माराव्या लागू नये अशी इच्छा बऱ्याच मतदारांनी साळसुदपणे मांडली आणि बॅंकेच्या काऊंटर वर बसलेल्या चपराशापासून तर अधिकारी वर्गापर्यंत सगळेच तुसडेपणाने आणि इर्षेने वागत असल्याचे डोळ्यात अश्रू आणून कथन केले, याबाबत निश्चितच योग्य निर्णय घेतला जाणे आवश्यक आहे.

तुम्ही फुकटात काही देण्याऐवजी आमच्या धान्याला योग्य भाव द्या ही मागणी करणारे पुष्कळ  शेतकरी होते  आणि शासकीय योजना गरजूंपर्यंत कुणी पोहोचवून  त्याबाबत आम्हाला योग्य मार्गदर्शक करणारे नसल्याने आमची आबाळ होते असेही अनेकांनी पोटतिडकीने मांडले ,कृषी अधिकारी  कधी येतात कधी येत नाहीत गावातील श्रीमंत  लोकांना योजनांचा लाभ मिळतो पण सर्वसामान्य  शेतकरी यापासून वंचितच राहतात ,त्यांना योजनांची निट माहिती  दिली जात नाही हीच आमची प्रगतीतील बाधक व्यथा असल्याचेही अनेकांनी स्पष्ट केले.

बघा,विचार करायला लावणाऱ्या या बोलक्या प्रतिक्रिया आम्ही खास तुमच्यासाठी उन्हातान्हात भटकंती करुन, सर्वसामान्य नागरिक,मतदार राजासाठी , आया बहिणींसाठी, देशातल्या समृद्धतेच्या आणि संपन्नतेच्या बाता करणाऱ्या नागरिकांसाठी आव्हान म्हणून प्रस्तुत करीत आहोत.

पटलं तर घ्या.....नाहीतर........!

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*


Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*