दिनविशेष:-🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻 *स्वामीनिष्ठ हनुमान जन्मोत्सवाची*

 🚩⚜🚩🔆🕉🔆🚩⚜🚩

      दिनविशेष ....

🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻


        *स्वामीनिष्ठ हनुमान         जन्मोत्सवाची*

            🚩⚜🌸🙏🌸⚜🚩⚜

    *राम रसायन तुम्हरे पासा*

     *सदा रहो रघुपति के दासा*

     *तुम्हरे भजन राम को पावै*

     *जनम जनम के दुख बिसरावै*

     *.... संत तुलसीदास*

        *भारतीय संस्कृतीतील देशविदेशातील भक्तगण आज भल्या पहाटे उठून शुचिर्भूत होत मारुतीरायाच्या उपासनेत दंग आहेत. मारुती स्तोत्र.. हनुमान चालीसा पठन सुरू आहे.*

        *ज्यांच्या जवळ रामनामाचे रामबाण औषध आहे अशा हनुमानाची केलेली भक्ती ही रामापर्यन्त पोहोचते अन् जन्मजन्मांतरीची दुःख दूर होतात.* 

        *जिथे राम तिथे हनुमान आणि जिथे हनुमान तिथे राम कारण हनुमंताच्या हृदयातच राम आहे. पवनसुत हनुमान हे जीवनात उर्जा देणारे आदर्श असे दैवत.*

        *रुद्रअवतार रामभक्त हनुमान हे गुणसागरच. बल-बुद्धी संपन्न हनुमान हे मानसशास्त्र.. राजनीती.. साहित्य.. तत्त्वज्ञान यात पारंगत होते. अत्यंत विश्वासू असे स्वामीनिष्ठेचा आदर्श. रामराज्य हनुमंताशिवाय अशक्यच होते. हनुमान हे श्रीरामाचे निस्सिम भक्त.. सेवक.. सैनिक आणि सहयोगी होते. त्यांनीच प्रभू श्रीरामाची सुग्रिवाशी भेट घडवून वानरसेना मिळवून दिली. युद्धात बिकटप्रसंगी संजिवनी आणण्यास पर्वतही खांद्यावर वाहण्याचे सामर्थ्य हनुमंताचेच.*

        *बिभीषण या शत्रूच्या भावाला अनेकांच्या विरोधानंतरही आपल्या पक्षात घ्यावे हा सल्ला प्रभू श्रीरामाला दिला. हनुमानाची विश्वासपात्रता तर एवढी की श्रीरामांनी त्यांना शत्रूराज्यातही धाडले. तर भरताची राज्य परत करण्याची मानसिकता खरच आहे का हे तपासायला रामाने हनुमंतालाच पाठवले. प्रभूच्या शब्दाला जागणारे. बुद्धी आणि बल असूनही अहंकार, लोभ, मोह, माया, पदलालसा यापासून अलिप्तच होते.*

        *हनुमानाचे भक्तीसामर्थ्य असे की या नामयोगीचे साथीदारही रामनाम घेत सागर.. भवसागर पार करु शकले. लंकादहन करुन शत्रूत घबरहाट निर्माण करुन मनोधैर्य खच्चीकरणाने विजय सुकर करणारे हे हनुमान. दास्यभक्ती असावी तर हनुमानासारखी. विजयानंतर प्रभूंनी काय हवे विचारले तर रामभक्तीचे वरदान मागितले.*

        *अचाट बुद्धिमत्ता.. सामर्थ्य असूनही जेवढी कामगिरी दिली तेवढीच पार पाडली. त्यावर ना शंका ना प्रश्न. स्वतः हालअपेष्टा सहन करुन, दैवताला विश्वासाने हृदयी स्थान देत प्राणाची बाजी लावणारे स्वामीनिष्ठ जिथे.. तिथेच रामराज्य निर्माण होते, म्हणूनच हनुमानांसारखी बलोपासना करायला आणि तरुणांकडून गावाचे संरक्षण व्हावे, स्वराज्याचे सुराज्य व्हावे.. यासाठी या भक्त आदर्शाची हनुमान मंदिरे समर्थ रामदास स्वामींनी गावोगाव स्थापन केली.*

     *मनोजवं मारुततुल्यवेगं*

     *जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्* 

     *वातात्मजं वानरयूथमुख्यं*

     *श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये ॥*

        *जो मनाप्रमाणे कुठेही वाऱ्याच्या वेगाने भ्रमण करु शकणारा वेगवान, ज्याने इंद्रियविजय प्राप्त केला आहे, बुद्धिवंतांमध्ये श्रेष्ठ वानरसेनेचा प्रमुख हनुमंताला मी शरण आलोय.*

        *हनुमानांला लाभले तसे  रामनामाचे कवच आपणास लाभो. चिरंजीव रामभक्त हनुमान जन्मोत्सवाने आपली भक्ती व्दिगूणीत होवो, आपल्या जीवनात सर्व संकट निवारक हनुमान बळ लाभो हीच शुभेच्छा.. !!*

🌹⚜🌹🔆🙏🔆🌹⚜🌹

 *नाम घेता मुखी राघवाचे*

  *दास रामाचा हनुमंत नाचे*

  *अंजनी उदरी जन्मला*

  *भक्षिण्या रवि धावला*

  *धावणे वायुपरी ज्याचे*

  *रूप मेरूपरी घेउनी*

  *तरू पाहे सिंधू लंघुनी*

  *करुनिया दहन लंकेचे*

 *जमवुनी वानरे सारी*

  *बांधिला सेतू सागरी*

  *बळ महान बाहुबलीचे*

 *नित रमे राम जपतपी*

  *जाहला अमर तो कपी*

  *गुण गाता रघुसेवकाचे*

  🌺☘🥀🌿🌺🌿🥀☘🌺

 *🚩 बजरंगबली की जय 🚩*

                *२३.०४.२०२४*

       🌻🌸🌿🥀🌺🥀🌿🌸🌻

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*