*निवडणूक समरांगणातील लढवय्ये...२०*

 *निवडणूक समरांगणातील लढवय्ये...२०*

*ईव्हीएम सज्ज पण...*

*दीपक देशपांडे*

लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी आटोपून आता उद्या १९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून लगबग पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाचे कर्मचारी नियुक्त केलेल्या मतदान केंद्रांमध्ये पोहोचून उद्या होणाऱ्या मतदानासाठीची व्यवस्था करत आहेत.मतदानासाठी निवडणुकीचं साहित्य घेऊन मतदान अधिकारी दाखल झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १३- चंद्रपूर वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाची निवडणूक १९ एप्रिल २०२४ रोजी ३६१ मतदान केंद्रावर होणार असून सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. लोकसभा निवडणुकीसाठी  प्रशासन पूर्णपणे तयार आहे. 

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी ७२-बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील बल्लारपूर, पोंभूर्णा , चंद्रपूर आणि मूल तालुक्यातील एकुण ३६१ मतदान केंद्रावर १४४४ मतदान अधिकारी आणि कर्मचारी सुखरूप पोहोचले असून प्रशासन सज्ज झाले आहे.
जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांचे नेतृत्वात उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणुक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. मूल, पोंभूर्णा  आणि बल्लारपूर येथील तहसिलदार यांचेसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी सहायक म्हणून सहकार्य करीत आहेत.

 मूल प्रशासकीय अधिकारी कार्यालयामधून १४४४ अधिकारी आणि कर्मचारी वेगवेगळया वाहणांने मतदार संघातील ३६१ मतदान केंद्रावर पोहोचले असून राखीव असलेले १४४ कर्मचा- यांचे ३६ मतदान पथक मतदानाची प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत. ७५० पोलीस व होमगार्ड कर्मचारी सुध्दा शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सज्ज झाले आहेत. ४२ झोनल अधिकारी ३६१ मतदान केंद्रावर लक्ष ठेवणार आहेत. होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा मतदार संघात ३ लाख १ हजार २४२ मतदारांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. 

८५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या एकुण मतदारांपैकी केवळ २४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नव मतदार असलेल्या ४३२६ युवा मतदारांपैकी किती मतदार लोकशाहीच्या उत्सवात मतदानाचा अधिकार पहिल्यांदा पार पाडतात. हे ही तेवढेच महत्वाचे राहणार आहे.

ईव्हीएमसह मतदान अधिकारी मतदान केंद्रावर पोहोचले असून उद्या मतदारांना ईव्हीएमनेच मतदान करावयाचे आहे, आजपर्यंत कोणी त्याचा विरोध केलेला नाही मात्र उद्या मतदान प्रक्रिया आटोपताच याच ईव्हीएमवरच  आक्षेप घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही , त्यामुळे .......

यानिमित्ताने सर्वांना विनंती….

मतदानाच्या दिवशी, मतदान करताना आपण ज्या पक्षाला मतदान केले आहे त्या पक्षाशी चिठ्ठी आपल्याला व्हीव्हीपॅटमध्ये दिसणार आहे, आणि ती खाली पडेपर्यंत तिथून हटायचं नाही…

जर चिठ्ठी खाली पडताना आपल्याला दिसली नाही तर, तिथे आपण ऑब्जेक्शन घ्यायचा आहे की माझी चिठ्ठी पडली नाही, आणि ती काळजीपूर्वक बघायची आहे…

आपण ज्याला मतदान केलेलं आहे, त्याच पक्षाचं चिन्ह आपल्या त्या व्हीव्हीपॅटमध्ये दिसते का आणि ती व्हीव्हीपॅटची टीप तुटून खाली कापून पडलेली आहे की नाही आहे तोपर्यंत आपण तिथून हटायच नाही…

आणि जर इथे आपण ऑब्जेक्शन घेतलं नाही, तर इथेच गोंधळ होणार आहे एवढं लक्षात ठेवा…!

मतदान हा आपला हक्क आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे , त्याचप्रमाणे ..... 

.......मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅटची टीप तुटून खाली कापून पडलेली आहे की नाही आहे हे बघितल्याशिवाय  आपण तिथून हटायच नाही…........ एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*