उन्हामुळे मतदानाची टक्केवारी घसरली???

 उन्हामुळे मतदानाची टक्केवारी घसरली???

दीपक देशपांडे 



चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५९.०६%मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यांतही नेहमीप्रमाणे स्त्री मतदारांनी आघाडी घेतली असून ५९.३२%मतदान केले आहे,तर पुरुष मतदारांनी केवळ ५८.८१% मतदान केले आहे.


मतदार यादीत नाव न मिळणे ,एकाच कुटुंबातील व्यक्तींचे वेगवेगळ्या बुथवर नाव समाविष्ट असणे , शोधूनही नाव न मिळणे अशा अनेक कारणांमुळे मतदार ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत अनेक समस्यांना सामोरे जात मतदानासाठी घराबाहेर पडला पण मतदान न करताच माघारी फिरल्याचे वास्तव समोर आले असून शहरी भागातील मतदार उन्हामुळे मतदान केंद्रावर पोहोचलाच नाही असेही चित्र समोर आले आहे.

राजकीय मंडळी दुपारी तीन नंतर सक्रिय झाली असून मतदान प्रक्रिया संपेस्तोवर ही आकडेवारी सत्तर टक्क्यांपर्यंत किंवा  अधिकही पोहोचली तर वावगं वाटू नये अशी चिन्हे दिसू लागली आहेत ,कारण नाही म्हणायला...... .....दूपारपर्यंत वाट बघणारी मंडळी दूपारनंतर ,आपली  महत्त्वाची कामे पार पाडून  हाती पडलेल्या  *त्या... श्रमपरिहारा* मुळे एकदम उत्साहीत होऊन मतदान केंद्रावर  दाखल होत आहेत असे  वृत्त हाती येत आहे.

काही वेळातच अंतिम आकडेवारी जाहीर होईल आणि शेवटी किती मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला हे कळेलच. पण  मतदानाप्रती अनुत्साह आणि मतदानाच्या उत्साही पर्वाची पहिल्या टप्प्यातील सांगता जवळ येऊन ठेपली हे मात्र खरे.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*



Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*