मूल शहरात संथपणे मतदान सुरू ,संथ मतदानाचा फायदा कुणाला?

मूल शहरात संथपणे  मतदान सुरू , संथ मतदानाचा फायदा कुणाला?

दीपक देशपांडे 

चंद्रपूर वणी आर्णी मतदार संघातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या- मूल शहरात विविध केंन्द्रावर मतदानाला सकाळी ७ वाजता पासून सुरूवात झालेली असून दुपारी १२.३० पर्यंत विविध केंन्द्रावर २०-ते२५ टक्के पर्यंत मतदान झाले असल्याचे निर्देशनात आले आहे. मूल मधील १०१ क्रमांकाच्या मतदान केंन्द्रावर मतदान मशीन काही तांत्रीक कारणास्तव बंद पडल्याने साधारण १ते१.३० तास मतदान प्रक्रिया खोळबंली होती त्यामूळे केंन्द्रावर बरीच गर्दी दिसून येत होती.

इतर केंन्द्रावर संथ गतीने मतदान सुरू होते.  कृषी उत्पन्न बाजार समिती येथील बुथ्र क्रमांक ११० वर  ताराबाई तुकाराम कस्तुरे वय ११०यांनी मतदान केले ,  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  गांधी चौक मूल येथे नव- मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यांत काजल बारसागडे व,प्रजोती भडके यांनी केंन्द्र क्रंमाक ११६ वर तर आचल गरीपत्ते हिने केंन्द्र क्रमांक १०९बाजार समिती मूल येथे पहिल्यांदा आपल्या मतांचा हक्क बजावला.  केंन्द्र क्रमांक ११५ वर १२०० हून अधिक मतदारांची नोंदणी असून हे केंन्द्र अडचणीच्या ठिकाणी असल्याने मतदारांना दाटीवाटीने उभे राहावे लागत असून या केंन्द्रावर   पंखे नसल्र्याने गर्मी व  पाण्याची कमतरता या मूळे मतदारांना त्रास होत होता व पाण्याची  मागणी करीत होते ,ही बाब आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून देताच तातडीने पाण्याची सोय करुन देण्यात आली मात्र प्रशासनाच्या वतीने जाहीर केलेल्या स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारची फोटोसाठी व्यवस्था नसल्याने मतदार नेमका फोटो कुठे काढायचा या संभ्रमात होते ,तशी आम्हाला बऱ्याच ठिकाणी विचारणा झाली .

बाकी प्रशासकीय भवनात नियंत्रण कक्षात सर्व अधिकारी निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचे निदर्शनास आले.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*