*निवडणूक समरांगणातील लढवय्ये...२२**जागृत मतदार*

 *निवडणूक समरांगणातील लढवय्ये...२२*

*जागृत मतदार*

*चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात ६७..५७ टक्के मतदान*

*उन्हाच्या तडाख्यातही तीन टक्क्यांची वाढ*


चंद्रपूर, दि. २० : दीपक देशपांडे 

उन्हाच्या तडाख्याने मतदान प्रभावित होऊन मतदानाची टक्केवारी घसरणार काय?असे चित्र दिसत असताना आज अंतिम टक्केवारी समोर आली आणि बऱ्याच जणांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे , आणि जयपराजयाची गणिते बदलली जात असल्याचे प्रतिपादन राजकीय , सामाजिक गोटातून ऐकायला मिळत आहेत.

१३ - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण  ६७.५७ टक्के मतदान झाले. १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी ६७.५७ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे गत आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा ४२-४३अंशावर असतांनासुध्दा मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत मतदानाचे कर्तव्य पार पाडले. त्यामुळेच २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या निवडणुकीत तीन टक्क्यांची वाढ झाली आहे.  

शुक्रवारी झालेल्या लोकसभा निवडणुकी- साठी राजूरा विधानसभा मतदार संघात ७०.०९ टक्के, चंद्रपूर ५८.४३ टक्के, बल्लारपूर ६८.३६ टक्के,वरोरा ६७.७३ टक्के, वणी ७३.२४ टक्के तर आर्णि विधानसभा मतदारसंघात ६९.५२ टक्के मतदान झाले. 

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लक्ष ३७ हजार ९०६ मतदार आहे. यात ९ लक्ष ४५ हजार ७३६ पुरुष मतदार, ८ लक्ष ९२ हजार १२२ स्त्री मतदार तर ४८ इतर मतदार आहेत. यापैकी ६ लक्ष ५८ हजार ४०० पुरुष मतदारांनी (६९.६२ टक्के), ५ लक्ष ८३ हजार ५४१ स्त्री मतदारांनी (६५.४१ टक्के) तर ११ इतर नागरिकांनी (२२.९२ टक्के) असे १२ लक्ष ४१ हजार ९५२ (६७.५७ टक्के) मतदारांनी मतदान केल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

विशेष म्हणजे यावेळी दूपारी पाचपर्यंत स्त्रिमतदारांचे अधिक असणारे प्रमाण अंतिम आकडेवारी आल्यानंतर कमी झाले असून शेवटच्या टप्प्यात निर्णायक मतदान पुरुष मतदारांनी केले असावे अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*